"...कविता कविता कविता..."
इकडे कविता तिकडे कविता
बघावे तिकडे कविताच कविता
पेपरच्या पुरवणीत कविता
मासिकाच्या गदारोळात कविता
रद्दी कागदावर दिसते कविता
कवितेच्या रद्दीवर कविता
सुटका नाही बजावतात कविता
संमेलनात सतावतात कविता
ऑर्कुट कविता सर्किट कविता
ब्लॉग कविता फेसबुक कविता
चितेवर कविता चिंतेवर कविता
उन्हावर कविता पावसावर कविता
गारांसारख्या आदळतात कविता
धबधब्यासारख्या कोसळतात कविता
तहानभूक विसरून कविता
उठता बसता पाडतात कविता
शब्दांपुढती शब्द कविता
वेळही जातो बनते कविता
काव्यरस
ते म्हणले
ते म्हणले शोधा चर्च, मशिदी, नी देवळे
दिसली फक्त प्रतिके आणि शोधकांचे थवे
थवे, आत असताना डोळे मिटून बसणारे
बाहेर तुझी शिकवण नजरेआड करणारे
ते म्हणले भेटण्या देवा, गरीबांची कर सेवा.
भेटले. भेटले अनेक सन्धीसाधू बगळे
पुढ्यात वाढलेले झटक्यात मटकावर
बाजुच्या भुकेल्यांचा घास हिरावणारे
ते म्हणले, अरे देव म्हणजे निसर्ग!
किल्ले माहुली (कल्याण दरवाजाच्या खडतर वाटेने)
माहुली किल्याच्या विविध आठवणी आणि अनुभव लिहायचे म्हटले तर एक वेगळ पुस्तकच होईल. किती वेळा आणि कसा कसा गेलो असेन, कधी एकटाच, कधी कुण्या सवंगड्या बरोबर तर कधी ४०-५० जणांच्या टोळ्क्या बरोबर, कधी आषाढ घनातून बरसणा-या सहस्त्राधारा अंगावर झेलत, तर कधी ग्रीष्माच्या उन्हातले चटके खात, कधी कुडकुडणा-या थंडीतून चांदण्या रात्री पायाखालची वाट तुडवत, कधी पहाटेची पहिली कसारा लोकल पकडून, कधी बाईक वरून सुसाटत तर कधी कारमधून डुलत डुलत. इतके वेळा आणि इतके वर्ष माहुलीला भेट द्यायचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग गिरीभ्रमण (नि.गी.) या आमच्या संस्थेतर्फे गेली काही वर्षे माहुली किल्ल्यावर नियमित गडसेवा केली जात असे.
बापुजींच्या चेहर्यावरील हास्य मावळणार..?
नोटांवरची गांधींची मक्तेदारी आता संपण्याची चिन्ह दिसतायंत..
आणि बर्याच वर्षांनी रिजर्व बँकेलाही पटलंय की बापुंव्यतिरिक्तही महापुरुषांनी भारतात जन्म घेतला होता आणि त्यामुळेच शिवाजी महाराज आणि आंबेडकरांनापण राष्ट्रीय चलनावर झळकण्याची संधी मिळतेय पण ....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्याबरोबर सोबत अजुन दोन गांधी आहेतच,
.
.
जाउद्या उशिराने सुचले तरी ते शहाणपणच म्हणवेल निर्णयाबद्दल खुद्द आम्ही रिजर्व ब्यांकेचे ऋणी राहु...
काही विभाज्यतेच्या कसोट्या
नमस्कार मंडळी,
या लेखाचा विषय आहे विभाज्यतेच्या कसोट्या. २/३/५/९/१० या संख्यांनी एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो का याविषयीच्या विभाज्यतेच्या कसोट्या सगळ्यांनाच माहित असतात.पण त्यापुढे जाऊन ७/११/१३/१७ यासारख्या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या हा या लेखाचा विषय आहे.
साखर
संत सोशी अंगी घावा, वाटी दार्यात साखर
उसा चिरडूनी चक्री, येते फेर्यात साखर
नेत्याच्या वल्गना, कधी जेत्याची पुंडाई
देते खावया गोग्रासा, जैशी चार्यात साखर
जणू नित्याची वंचना असा छळे मधुमेह,
तोंडी लागले ते काढे, म्हणे सार्यात साखर
डोळे लागेनात मूळी, होता कडू बाळझोप,
दूधा फुंकरे आई जे, तीच्या वार्यात साखर
घाली गुंजारव भुंगा, फूल नि:शब्द स्तब्ध
घट्ट बन्द पंखुड्या, ठेवी पहार्यात साखर
रुसलेली साजणी, तिचे बिंब कसे गोड?
आरश्याच्या जणु पाठी होती पार्यात साखर
मेसोअमेरिका(४.३) - माया (The Architects)
मेसोअमेरीका(४.२) - माया (The Mathematicians)
" How much human life lost in wait" या वाक्यावर Indiana Jones (& the kingdom of Crystal Skull) येऊन थांबतो. सिनेमागृहाबाहेर पडताना स्टिवन स्पिलबर्गसारख्या दिग्दर्शकाने एकाच सिनेमात इतक्या घोडचुका कराव्या याचंच राहून राहून आश्चर्य वाटू लागतं? त्याची बखोट पकडून विचारावंसं वाटलं, "बाबा रे, पेरुवियन जंगल दाखवलंस, त्यात तुला केचुआ बोलणारी लोक कुठे भेटली?" पेरुच्या जंगलात हवाईयन धबधबे, माणूस खाणार्या मुंग्या आणि सुप्रसिद्ध नाझ्का (Nazca) लाईन्ससुद्धा?
मिसळपाव