Skip to main content

गोवा रंगीला रे...

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 14/06/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं.

कमळ

लेखक जागु यांनी गुरुवार, 14/06/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो. काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्‍या पाट्या दिसल्या.

बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट - 'बिग फिश'

लेखक प्रास यांनी गुरुवार, 14/06/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी जीवनशाळेमधला सर्वात जास्त कठीण विषय कोणता असेल तर तो आहे नात्यांचं व्यवस्थापन. कदाचित मी जे काही लिहितोय ते सगळं कुणाला पटेल की नाही याची मला कल्पना नाही पण मला स्वतःलाही, आपल्याला नात्यांचं योग्य व्यवस्थापन करता आलंय की नाही याची शंका सतत भेडसावत राहते. मूळात एकत्र कुटुंबात वाढलेल्याला नाती आणि त्यांच्या व्यवस्थापनामधलं ज्ञान मिळण्याची सोय घरातच मिळालेली असते. विभक्त कुटुंबामध्ये मात्र अशी परिस्थिती नसते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गोष्टी-वेल्हाळ असेल तर त्याने सांगितलेल्या त्याच्या आयुष्यातल्या गोष्टींमधून त्याला ओळखण्याची वेळ आपल्यावर येते.

ईंग्रजी बाळ्या आणि देशी कार्टं

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 13/06/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;) ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;) आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो. १.

(किल्ले विसापूरः एक वेगळा अनुभव)

लेखक sagarpdy यांनी बुधवार, 13/06/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज हा धागा वाचला आणि माझ्या विसापूर च्या भटकंतीच्या आठवणी ताज्या झाल्या. किस्सा तसा मोठा असल्याने वेगळा धागा काढला. (फोटो सापडल्यास नंतर डकवण्यात येतील) जेव्हा पुण्यात शिकण्याच्या निमित्ताने नुकताच आलो होतो, तेव्हाचा हा किस्सा, मी आणि माझा एक वर्गमित्र, दोघानाही गिर्यारोहणाची चढलेली नवखीच हौस! दोघंच जण कुठेही भटकायला जायचो, स्पोर्ट्स शूज वगैरे लाड कधी झाले नव्हते, तेव्हा चप्पल घालून जगभर भ्रमंती. (असे करता करता घोरोडेश्वर बरोबर तळेगाव, देहूरोड च्या जवळचे बहुतेक सगळे डोंगर, त्यावरील कोणत्या जगावेगळ्या वाटांनी भटकून झाले होते).

एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 13/06/2012 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात. सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.

मेहदी हसन यांना श्रद्धांजली!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 13/06/2012 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध गायक मेहदी हसन यांचे निधन झाले आहे अशी बातमी नुकतीच समजली. त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली! या निमित्ताने त्यांनी गायलेल्या गझलांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल चर्चा व्हावी ही अपेक्षा! माझ्याकडून हे... सुरूवातीचा संवाद ऐकण्यासारखा आहे. ***

का लिहितो मी कविता?

लेखक रसप यांनी बुधवार, 13/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
का लिहितो मी कविता? कारण 'ती' लिहित नाही.. तीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो किती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो ती हसत राहते मनातल्या मनात कुणालाच न सांगता मी तेच मोती वेचतो आणि गुंफतो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'तो' लिहित नाही.. तोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही, पण दु:ख उगाळायला आवडतं त्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते काहीच न बोलता.. मी तेच शब्द टिपतो आणि गातो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'तो' लिहित नाही.. तोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो पुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो तो खवळतो, आतल्या आत खदखदतो.. कधीच न थकता मी तोच उत्साह चोरतो