लेखकबहुगुणीयांनी रविवार, 17/06/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
अटरली बटरली.....
मला खात्री आहे की वरचं शीर्षक वाचून संपता-संपताच तुम्ही नकळत मनात ते पूर्ण केलं असेल....... डेलिशस! :-)
जितकी ही जिंगल तब्बल पाच दशकं भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे, तितकीच त्या अमूल होर्डिंग्जवरची 'अमूल गर्ल'!
काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं.
लेखकप्राजुयांनी रविवार, 17/06/2012 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आहेस तू जगी हे दाखव कधी कधी
दगडास अंतरीच्या जागव कधी कधी
होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा
वठल्या मनास होते पालव कधी कधी
नुसत्या हताशतेला गोंजारसी किती?
अंगार अंतरीचा पेटव कधी कधी
का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते
तूही करून बघ ना आर्जव कधी कधी
स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा
बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी
मी एरवी तशीही, असतेच शांत पण
नसते विचार करती, तांडव कधी कधी!
आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!
ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी
जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी
-प्राजु
लेखकशकु गोवेकरयांनी रविवार, 17/06/2012 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका लग्नाला जायचा योग आला.
वर वधु या दोन्ही कडची मंडळी सुशिक्षित व समंजस होती परंतु मला वाट्ते की काही छोट्या कारणांमुळे दोन्ही घरांमधील नारा़जी व रुसवे पणा दिसुन आला
तर मग रेशिमगाठी म्हणजे काय हो ?
लेखकश्रीरंग_जोशीयांनी शनिवार, 16/06/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते.
लेखकसोत्रियांनी शनिवार, 16/06/2012 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो,
अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
जुन्या मिपाकरांच्या लेखांवर तुम्ही अगदी मिटक्या मारून प्रतिसादावर प्रतिसाद देता, पण नवोदीत लेखकांना फाट्यावर मारता.