Skip to main content

मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना?

लेखक रसप यांनी मंगळवार, 12/06/2012 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना? नव्हतीस कधी तू माझी पण मी तुझाच होतो ना ? "चल विसरुन जाऊ झाले-गेले, जगू नवे आता" म्हटलेस तरीही गुरफटून मी उगाच होतो ना ? तुज बरेच काही दिले सुखी करण्याला नशिबाने पण मनात गुपचुप जपलेली मी व्यथाच होतो ना ? मज वेडा मानुन सोडुन जा, हरकत नाही माझी 'तो' प्रेम तुझ्यावर करणारा मी खुळाच होतो ना? माझ्या पायाशी हरून ही दुनिया लोळण घेवो तू समोर माझ्या आल्यावर मी खुजाच होतो ना ? तुला नेहमी तुझ्या घराची चौकट प्यारी होती केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ? ....रसप.... ११ जून २०१२ http:

एका वेश्येचे मनोगत..............

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 12/06/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

" | पालखीच्या सोहळ्यात | "

लेखक विदेश यांनी मंगळवार, 12/06/2012 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
"| पालखीच्या सोहळ्यात |" नामामधे रंगलो मी, ध्यानामधे गुंगलो मी माउलीत दंगलो मी, पालखीच्या सोहळ्यात | ओठी विठ्ठलाचे नाम, पाठी विठ्ठलाचे धाम चित्ती विठ्ठलच ठाम, पालखीच्या सोहळ्यात | कुणी गातसे अभंग, कीर्तनास चढवी रंग तो सुटेना संतसंग, पालखीच्या सोहळ्यात | एकमेका आलिंगूनी, सर्व जाऊ आनंदूनी भक्तिरसात न्हाऊनी, पालखीच्या सोहळ्यात | धावे सांजवेळी गाय, तैसे ओढतात पाय डोळ्यांपुढे विठूमाय, पालखीच्या सोहळ्यात ||

येणार

लेखक शकु गोवेकर यांनी मंगळवार, 12/06/2012 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
डा.मंग ला पुरंद रे या सिद्ध हस्त लेखिका.त्यांनी लिहिलेले एक पुस्तक परवा वाचनात आले. त्या पुस्तकाला डा.जयंत नार ळी करांनी प्रस्तावना लिहिली आहे, साधार ण पणे अनिवासि भार तिया ना NRI किंवा Non Resident of India अशी उपाधी लाव ण्यात येते पण मंगला ताईनी व डां.

विचित्र....

लेखक स्वतन्त्र यांनी सोमवार, 11/06/2012 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण महिन्यापूर्वी भावाचा गाडी स्किड होऊन अपघात झाला.जरा मानेला मार आणि खरचटणे या पलीकडे विशेष काही झाले नाही.अचानक त्याला १० दिवसानंतर जीभ जड होऊन बोलायला त्रास होऊ लागला. लगेच CT स्कॅन आणि MRI करण्यात आले.मानेतल्या शिरेवर दाब आल्याने जिब जड झाल्याचे निदान झाले.ह्या सर्व तपासण्यांसाठी त्याला हॉस्पिटलात Admit करावे लागले.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी हि बातमी आमच्या नातेवाईकांच्या कानावर पडलीच. मग काय रोजच त्याला भेटण्यासाठी रीघ लागू लागली. प्राथमिक चौकश्या सुरु झाल्या. पहिले जेमतेम १० मिनटे,भावाची विचारपूस करण्यात जात होती.

मी आणि चित्रकला.

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 11/06/2012 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे वावडे. अशा ह्या अनाडी विद्यार्थ्याचे चित्रकले-बाबतीत काही प्रश्न आहेत.कूणी उत्तरे देवू शकतील काय? १. चित्रकलेचा कागद कसा निवडायचा? २. ब्रश कसे निवडायचे? ३. रंग कसे निवडायचे? ४. चित्रकला हे शास्त्र आहे की कला आहे? ५. माझ्या सारख्या "ढ" विद्यार्थ्याला पण ही कला आत्मसात करता येईल का? की मुळातच ही देवाची देणगी आहे? तसे असेल तर नादी न लागलेलेच उत्तम.

फोटोशॉपची किमया- फोटो धुरकटला ? नो प्रॉब्लेम !

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 11/06/2012 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रानो, आपल्या कॅमेर्‍यात मॅन्यूअल कंट्रोल असतात. पण बर्‍याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा " त्यापेक्शा आटो बरा , आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशेबाने मॅन्यूअल कंट्रोल वापरण्याचे आपण सर्व जण ( त्यात मी ही आलो) टाळतो. आपला फोटो भुरकट येणे व धुरकट येणे या वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्याला फोकस जमला नाही की फोटो भुरकट येतो. पण फोटोत वातावरणातील दोषांमुळे एक धुरकट रंगाचा पातळ थर फोटोवर येतो. बहुतेक वेळा उन्हाकडे तोंड करून स्नॅप घेतला तर हा प्रकार घडतो. असा फोटो आपल्या डोळ्याला त्रासदायक वाटतो.

तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 11/06/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - तुकाराम पिच्चरवरील अनेक समीक्षा वाचून आमची झालेली कुंठितावस्था आणि एक सर्वाना परिचीत असलेले गाणे. निवेदन - उगा छंद, यमक, मात्रा, वगैरे चूका काढू नयेत. भावनाओंको समझो !! :) समिक्षेच्या वारीत मिळेना वाट हो... कुणी म्हणे छान कुणी पुचाट हो... आपली माणसं आपलीच नाती तरी लेखकाची वाचकास भीती तुकोबा.. कोणता झेंडा घेऊ हाती || आजवर ज्यांची वाचली समीक्षा भलताच त्यांचा चेव होता… पुरे झाली आता उगा माथेफोडी तुकोबात माझा जीव होता कळावा पिच्चर म्हणूनिया किती लेखकच्या झूंडी इथे येती वैरी कोण आहे इथे कोण साथी तुकोबा ..

चीजाळलेले अंडे (अर्थात झटपट वैदिक आम्लेट)

लेखक सुनील यांनी सोमवार, 11/06/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - १) अंडे - एक २) चीज स्लाइसेस - दोन ३) झाकण असलेली मायक्रोवेव्-सेफ प्लेट वा बाऊल ४) मायक्रोवेव ओवन ५) मीठ आणि मीरपूड - चवीपुरते कृती - १) प्लेट वर एक चीजची स्लाइस घ्या. २) त्यावर अंडे फोडून घाला. ३) त्यावर चीजची दुसरी स्लाइस ठेवा. ४) प्लेटवर झाकण ठेवा. ५) प्लेट मायक्रोवेवमध्ये ठेऊन ४०-४५ सेकंद शिजवा. वितळलेल्या चीजमध्ये नखशिखांत भिजलेले अंडे तयार आहे. त्यावर चवीपुरते मीठ आणि मीरपूड भुरभुरवा आणि आस्वाद घ्या! टीपा - १) अंडे मायक्रोवेवमध्ये फुटते तेव्हा उघड्या प्लेट अथवा बाऊलमध्ये हा पदार्थ करू नये.

आपण सारे अर्जुन...

लेखक वेणू यांनी सोमवार, 11/06/2012 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक खळाळती नदी तिचे रम्य दोन्ही काठ, दोन तिरी दोन मन माना दोघांच्याही ताठ! ऐलतिरी पैलतिरी दोन्ही बाजू दोन मन, एक होकार भरितो दुजा नकार घोकून... वाटे निर्मळ वहावे अडता, मना पुसावे, त्याने संभ्रम सारावे आपणास सुखवावे! प्रत्यक्षात असे नाही मने धरी भिन्न तान एक मी, मी, मी म्हणे दुजा म्हणे मी महान..! संभ्रमाने गोंधळावे असा अजब प्रकार, इथे मत एक नाही म्हणे जगा निर्विकार!! मग सहजच वाटे सारे आपण अर्जुन, त्याचे प्रश्न मोठे होते आणि संभ्रम कठिण..!! इथे प्रश्न इवलाले करी आपणा अर्जुन, संभ्रमात जग म्हणे- नाही सुटका ह्यातून! त्यास कृष्ण तरी होता योग्य अयोग्य सांगाया, इथे आपणच खरे नसे कुणाचीच माया!