Skip to main content

माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते

लेखक रसप यांनी रविवार, 10/06/2012 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते माझ्या दु:खाने माझे अंगण कधीच न्हाले होते मी कोरडवाहू मातीमध्ये बाग फुलवला हसरा तू फुले वेचता केवळ काटे मला मिळाले होते क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते आयुष्य असावे कसे मला ही जाणिव झाली जेव्हा तोपर्यंत 'जीतू' जीवन माझे जगून झाले होते ....रसप.... १० जून २०१२ http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_10.html

पराभूत थोरवीच्या शोधात

लेखक रमताराम यांनी रविवार, 10/06/2012 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात? एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सागितले होते की एका महानायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले 'जर हे गाणं बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता.' माहागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते.

रुढी परंपरा अंधश्रध्दा शकूण अपशकून

लेखक भिकापाटील यांनी रविवार, 10/06/2012 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या समाजात अनेक रुढी परंपरा आढळतात. त्यात अनेक अंधश्रध्दा आहेत हे माहीत असुनही अनेक सुशिक्षीत मंडळी त्यांचे अणुकरण करताणा दिसतात. मांजर आडवे गेले की अपशकून झाला म्हनुण पाच पावले माघारी जानारे महाभागही आहेत. आपल्याकडे मुंगुसाचे दर्शण झाल्यास 'मिष्टाण्ण भोजण' मिळेल असे मान्यता आहे तर राजस्थानात मुंगसाचे दर्षण अशूभ शगुण मानला जातो. शेतत जाताणा भाकरीबरोबर काही तेलकट असेल तर हमखास कोळस्याचा खडा भाकरीबरोबर बांधूण दिला जातो. अन्यथा भूतबाघा होन्याची शक्यता असते. घराबाहेर पडताणा उजवाच पाय प्रथम टाकावा अषी माण्यता आधळ्ते. उंबर्‍यात पाल चुकचूकली तर पानी टाकावे अषी धारना आहे.

काट्यानं काटा

लेखक बब्रुवान यांनी रविवार, 10/06/2012 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
'बब्र्या, कामुन आसा गपचिप बसलास ?' सडनमदी यंट्री घेत दोस्त म्ह्न्ला. आडनिड टाईमाला आलेल्या दोस्ताला बघुन म्या म्हन्लं. 'पेपरवाले - च्यानेलवाले कवाधरनं त्या कसाबच्या नावानं दांगुडा घालुन र्‍हायलेत, त्याला जिता ठिवलाय, बिर्यानी खातो, खर्चा होतो. या ब्याग्राउंडवर काल त्या पुन्याच्या पोराने आजुक यका कसाबचा जीव घेत्ला, सिद्दीकी की कोन त्यो, अन तेबी डायरेक्ट अंडासेलमदेच ! कॉमन म्यान म्हन्तो बरच झालं, कसाबसारखं यालाबी सांबाळण्यापेक्षा काट्यानं काटा गेला. तिकल्ड्या साईडला फिलॉसॉफर लोकांनी तर ह्ये चुक हाये म्हन्तान्ना पार ह्युम्यानिटीलाबी क्वैश्वनमदे घेतलय.

नवरा नाही काही कामाचा

लेखक भरत कुलकर्णी यांनी रविवार, 10/06/2012 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझा नवरा नाही काही कामाचा माझा नवरा आहे बिनकामाचा सकाळी सकाळी पिवून येतो संध्याकाळी झोकून घेतो बिनघोर पडतो रात्रीचा दारू प्यायला मागतो पैसे पैसे मी आणावे कुठून कसे त्यासाठी कायम करतो घोशा फाटक्या संसारात पडला पाय तुम्हीच सांगा मी करावं काय त्याला पायपोस लागेना कशाचा दुसर्‍या बायांकडे बघते जेव्हा आनंद होतो मनात तेव्हा संसार तसा होवो माझा सुखाचा

डास व त्याचे चावणे

लेखक भरत कुलकर्णी यांनी रविवार, 10/06/2012 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका. डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात.

एक पत्रकथा: संपूर्ण (अंतिम भागासहित)

लेखक वेणू यांनी शनिवार, 09/06/2012 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
१३ जून १९९१ आदरणीय (की प्रिय?)__, संबोधन काहीही वापरले तरी पुढे नाव काय लिहू? कारण, "अस्तित्व" हे एखाद्या माणसाचं नाव असतं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. असो. हे पत्र सदर तारखेला लिहीलं असलं तरी, ते तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल किंबहुना पोहोचेल का, असा प्रश्न आहे, आणि समजा पोहोचलेच तर एक प्रसिद्ध लेखक, हे पत्र वाचून किमान पोचपावती तरी देतील का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे. तुमच्या लिखाणाने कधी मला आपलसं केलं, कळालं नाही, मात्र तुमचं प्रसिद्ध झालेलं प्रत्येक पुस्तक माझ्या संग्रही आहे- प्रत्येक! तुमचं हर एक पुस्तक वाचल्यावर मला त्याबद्दल जे वाटलं ते मी एका डायरीत लिहीत आलेय...