Skip to main content

रावडी राठोड

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 07/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे.

सोनसळी

लेखक जयवी यांनी गुरुवार, 07/06/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
सोनसळी रंगातली ही आणखी काही डिझाइन्स :) DSC00785-001" alt="" /> DSC00794-002" alt="" />

मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात?

लेखक जोयबोय यांनी गुरुवार, 07/06/2012 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
ंमराठी वर्तमान पत्रात सर्रासपणे हिन्दी शब्दांचा वापर संपादक करतात. मला समजत नाही की मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात? जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ? मराठी भाषेच्या ह्रासाला मराठी प्रसारमध्यमे मोठ्याप्रमानात ़जबाब्दार आहे असे वाटते. मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे

देह

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 07/06/2012 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू या लेखावर बरीच चर्चा झाल्यानं हा लेख इथे देतोय.

आमचा दुष्काळ

लेखक भरत कुलकर्णी यांनी गुरुवार, 07/06/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा साला पाऊस बरोबर सुरू होतो उगाचच आपला टँकरचा हप्ता चुकतो. या वर्षीदेखील पाऊस वेळेवर सुरू होईल. चार्‍यासाठी अनुदान, दुष्काळी मदत, दुष्काळग्रस्त भागाला भेटीची बिले हे सारे बंद होईल; अन वरकमाईदेखील चुकेल इतरांचा पाण्याचा दुष्काळ संपेल पण आमचा पैशांचा दुष्काळ आता सुरू होईल. पावसा, का रे बाबा तू वेळेवर येतोस अन आम्हाला दुष्काळात लोटतोस?

दुष्काळ

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 06/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोरड्या विहरीतुन आटलेला दुष्काळ, रस्त्यातल्या पाईपातुन फुटलेला दुष्काळ, गळत्या टँकरमधुन गावकीला तुडवत, सोन्याच्या मोलाने लुटलेला दुष्काळ. पंचायतीत मंजुरीला आलेला दुष्काळ, मंत्रालयातुन पास केलेला दुष्काळ, टक्क्याच्या हिशोबाने चोख वाजवुन, आपापल्या घरी नेलेला दुष्काळ. टग्यांनी बघ्यांचा चोरलेला दुष्काळ, रिकाम्या पोटातुन कोरलेला दुष्काळ, हिरव्या वावरांतुन, पाटाच्या कडेने, भरपाईच्या पाण्याने पेरलेला दुष्काळ. खादीतुन बोलणारा प्रागतीक दुष्काळ, एन्जीओतुन खर्चलेला जागतीक दुष्काळ, भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला, लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ
काव्यरस

...पाऊसगाणे...

लेखक विदेश यांनी बुधवार, 06/06/2012 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
धरतीची आस होउनी उदास अंतरी भकास प्रार्थिते देवास हजार डोळे आभाळास पहाती निष्प्राण होउनी केविलवाणे होती आस ती मनास गावे पाऊसगाणे मनांत रोजचेच पाण्याचे रडगाणे मना लागलीसे धरतीची ओढ कोसळे आभाळ पाऊस होऊन

चित्रपटात सर्वप्रथम!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 06/06/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी.
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!

मेसोअमेरीका(४.२) - माया (The Mathematicians)

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 06/06/2012 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
"Nature to him (Newton) was an open book, whose letters he could read without effort." - Albert Einstein
आल्बर्ट आईन्स्टाईनचं हे वाक्य मायन्सना तंतोतंत जुळणारं. आपल्या आसपास असणारा निसर्ग आपला गुरू. तो आपल्याला दोन्ही हातांनी भरभरुन देतो. पण त्याच बरोबर त्याची विविध रुपं, नाना छटा, एक ना अनेक तर्‍हा. निसर्गातील सूक्ष्मातीसूक्ष्म फरक अचूक मोजून मापून नोंदवण्याची मायन्सची धडपड. एक झपाटलेपणच म्हणा ना! मग त्यातूनच जन्म झाला त्रिकालाबाधित कालमापन पद्धतीचा, अदभूत खगोलशास्त्राचा आणि अमेरिका खंडातल्या पहिल्यावहिल्या प्रगत अंकपद्धतीचा.