Skip to main content

शार्दूलविक्रीडित

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 04/06/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे. त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते.) कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित वृत्त : शार्दूलविक्रीडित कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ.

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार ह्यांच अभिनंदन

लेखक निश यांनी सोमवार, 04/06/2012 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
दोनच दिवसाआधी पेपरात एक बातमी वाचली, की विकासाच्या क्षेत्रात बिहारने इतर सगळ्या राज्याना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. एक वेळ अशी होती की लालु गुंडाराज व बाहुबली राज मुळे बिहार देशात विकासात एकदम मागे होता. अतिशय गरीबी, बेकारी , गुंडगिरी , लाचखोरी, अपहरण, स्त्रियांविरोधी वाढते अत्याचार याने बिहारच नाव भारतात व जगातही अतिशय बदनाम झाल होत. अश्या वेळी २००५ मध्ये नितिश कुमार ह्यानी बिहारमध्ये लालु प्रसाद यादवांचा न भुतो न भविष्यति असा निवडणुकीत पराभव केला व बिहारची सत्ता संपादीत केली. मग त्यानी धडाडीने एक एक वि़कासाच्या योजना राबवायला सुरुवात केली.

तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता?

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 04/06/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
Operations Research च्या पुस्तकातील एक वाक्य - Optimized utilization of resources is service to humanity. महानिर्मिती कंपनीचे (पूर्वीच्या मराविमचा एक तुकडा) घोषवाक्य - 'ऊर्जेची बचत हिच ऊर्जेची निर्मिती'. दैनंदिन जीवनात आपण सगळेच पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपापल्या परीने काही उपाय करीत असतो. यामुळे कधी कधी आपले व आपल्या लोकांचे / कंपनीचे पैसेही वाचत असतात. सन्माननीय मिपाकरांना विनंती आहे की आपण वापरत असलेल्या क्लुर्प्त्या / उपाय येथे सांगाव्यात जेणेकरून इतरांनाही नवे काही तरी करता येईल. माझी काही उदाहरणे. १. अत्यावश्यक गरजा सोडून छपाई न करणे - या द्वारे कागद, शाई, वीज यांची बचत होते.

Blood Hymns - 1

लेखक हरवलेल्या जहाजाचा कप्तान यांनी सोमवार, 04/06/2012 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
ही माणसं एकत्र का रहातात? कपल्स म्हणुन? कुटुंब बनवुन? शहरं वसवुन? देश, धर्म?? पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा जाणवलं, जिथे जिथे पोकळी आहे, तिथे कुंटणखाने निपजलेले आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन? कुणास ठाऊक पण, पोकळीला पर्याय नव्हते संदर्भ नव्हते तिथे आतमध्ये खुप सोप्पंय किंचाळू नका श्वास घ्या धपापु नका हपापुन घ्या पाऊस पाडा पिकं घ्या एकबारी, दुबारी..कितीही.. एक स्तन वासनेचा दुसरा स्तन मायेचा बाहेर व्यवहार - अर्थहिन आतले व्यवहार - अर्थपुर्ण? तशात मोकळी दारं घेऊन एक नाशवंत बाई माझ्या पायथ्याशी येते येळकोट येळकोट स्तनाग्र दिठी, स्नायुंची मिठी मासावरच्या त्वचेसकट थरारते मांडी शल्याचे अर्थ ख

'चटका' लावणारा चंदेरी किल्ला

लेखक बज्जु यांनी रविवार, 03/06/2012 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
'चटका' लावणारा चंदेरी किल्ला ऐन उन्हाळ्यात शरीराचे हाल हाल करायला कुठल्या किल्ल्यावर जायचं असा विचार करत होतो तेवढ्यात लक्षात आलं, अरे बरेच वर्षात चंदेरीला भेट झाली नाही, ठरलं तर मग या शनिवारी चंदेरी करून टाकू. मी आणि सुजित तर तयार होतोच पराग आणि भूषण सुधा येतो बोलले, मग काय शनिवारी पहाटे ७ वा. कर्जत local पकडली आणि ८.०० च्या सुमारास वांगणी स्टेशनला उतरलो. आमच्या पाठीवरच्या ओझ्यांकडे पाहून रिक्षावाल्यांमध्ये एकदम चलबिचल झाली. वांगणी स्टेशन बाहेरच वडापाव आणि चहा घेतला, तोपर्यंत रिक्षावाला हजर.

सहज सुचलं म्हणून

लेखक अन्तु बर्वा यांनी रविवार, 03/06/2012 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुलंचं व्यक्ती आणी वल्ली वाचतोय. कितव्यांदा? माहीत नाही, खरच. पुलं वाचतो, भीमसेन ऐकतो नेहमी. आणी कधी कधी वाटून जातं- आपण कालचक्रातील एक चुक ठरलो आहोत. आम्हाला ना पुलं ना प्रत्यक्ष अनुभवता आलं ना भीमसेन जोशींच्या मेहेफीलीं मधे दैवी सुरांच्या पावसात भिजता आलं. आपला सभोवताल किती बिघडलाय. काहीही चांगलं किती दुर्मिळ झालय. जगण्याच्या 'बेसिक नीड्स' पूर्ण करण्यातच आम्ही इतके दमतोय की साधं पुस्तक वाचण्यासाठी 'वीकेंड' ची वाट बघावी लागते. पर्याय मिळाला तर कधीही सवाई मधले भीमसेन, निवेदक पुलं निवडीन. एफबी, मोबाइल पेक्षा.

१. शाफहाउसन

लेखक दादा कोंडके यांनी रविवार, 03/06/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्याखाली रोममध्ये जायचं होतं म्हणून आंतरजालावर मराठी काही माहिती आहे का ते शोधत होतो. अपेक्षेप्रमाणे एक-दोन ब्लॉग तेही युरोप पर्यटनावर सोडले तर काहिच मिळालं नाही. दुसरं म्हणजे पुर्वी जाउन आलेल्या ठिकाणाबद्दल कुणी काही माहिती विचारली तर फोटो सोडले तर माझ्याजवळ काहीच नसतं. मग ठरवलं की आपल्या संदर्भासाठी आणि आठवणीसाठी (इमोशनल कॉलबॅक, यु नो! :)) प्रवासवर्णनं लिहुन ठेवायची. आता लिहिलंच आहे तर मिपावर टाका म्हणून टाकतोय. :) १. शाफहाउसन खूप दिवस कुठे फिरायला गेलो नव्हतो, त्यामुळे ह्या विकांताला कुठेतरी जायचं ठरवलं. जवळपासची सगळी ठिकाणं फिरून झाली होती.

काय चुकतंय ?

लेखक वैशाली . यांनी रविवार, 03/06/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
हि कायाच नकोशी झालीये आता.. वाटतंय सगळी काढून टाकावी ह्या मनावरून.. तसंच हे आयुष्य!! ह्यात नेमका कसूर तो कुणाचा ?? आज काढला राग त्या आईन्यावर.. माझी मीच नावडले मला.. आज परत वाटून गेलं.. कि काहीतरी चुकतंय..