Skip to main content

मी व शेअर बाजार

लेखक सदानंद ठाकूर यांनी शुक्रवार, 01/06/2012 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक व बहुतांशी व्यक्ती कोणाच्या तरी सांगण्यावरुन अथवा उत्सुकता म्हणून शेअर बाजारात पडतात (दोन्ही अर्थाने). मग पस्तावतात, नाद सोडून देतात. पण खरच शेअर बाजार माझ्यासाठी उपयोगी आहे काय? मी यातून संपत्ती निर्माण करु शकतो काय? या बाबत किती लोकं सिरिअसली विचार करतात. तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुम्हाला हा लेख उपयुक्त आहे.

थंडीची पहिली भेट - रोहीडा

लेखक जातीवंत भटका यांनी शुक्रवार, 01/06/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीची पहिली भेट - रोहीडा १ ऑक्टोबर २०१०, शुक्रवार, ऑफिसमधली कामं आटपून घरी यायला रात्रीचे १२ झाले आणि तेव्हाच दुस-या दिवशीच्या जीवधन-नाणेघाटाच्या ट्रेकची नकारघंटा वाजली. अखेरीस शनिवारी संध्याकाळी किल्ले रोहीडाला मुक्कामास जाण्याचे नक्की केले. ऑक्टोबर हीट सुरु झाली होती म्हणून रात्रीच किल्ला चढायचं ठरवलं होतं. दुपारचे ४ म्हणता म्हणता निघायला ५.३० झाले. यावेळेस विजया आणि दिपकने उशिर केला. राहूल अगदी आयत्यावेळी गोटात सामिल झाला होता.

गाय कोडे २

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 01/06/2012 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
गाय कोडे २ : एका माणसाकडे १७ गायी असतात. त्याला ३ मुले असतात तो मरण्यापूर्वी मृयुत्युपत्रात खालीलप्रमाणे वाटप करतो.. पहिल्या मुलाला १/२ गायी दुसर्‍या मुलाला १/९ गायी आणि तिसर्‍याला १/३ गायी द्याव्यात.. गायी पूर्ण द्यावात. कापू नयेत. तर गायींचे वाटप कसे करावे?

प्रॉन्स बिर्याणी

लेखक मृगनयना यांनी शुक्रवार, 01/06/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : कोळंबी - १/२ किलो लिंबाचा रस केशर २ टीस्पून गुलकंद आलं - लसून पेस्ट १ चमचा ३-४ कांदे बारीक चिरलेले ४-५ टोमॅटो बारीक चिरलेले २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या कढीपत्ता काही पाने १ टेस्पून कसूरी मेथी बारीक चिरलेली कोथींबीर बारीक चिरलेला पुदिना २-३ टेस्पून साजूक तूप १/२ टीस्पून लाल तिखट १/४ टीस्पून हळद १/२ टीस्पून गरम मसाला पावडर लवंग , काळी मिरी आणि दालचिनी मोकळा शिजवलेला भात. मीठ चवीनुसार पाककृती : कोळंबीला लिंबाचा रस आणि मीठ लावून मॅरीनेट करण

माझ्या निसर्गास..

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 01/06/2012 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
विषादाने मन ओतप्रोत भरलेलं असताना, अंगावर येणारी झुळूक, तुझं आस्त्तित्व जाणवून देणारी.. तुझं सुंदर हिरवंगार, रूप पाहून मळभाने दूर सरावंच! निराशा झटकण्यासाठी, नव्या जोमाने लढण्यासाठी, चैतन्याला जिवंत ठेवण्यासाठी, खरं तर- जगण्याचंच बळ मिळवण्यासाठी, पुन्हा तुझाच आधार, तुझीच गरज...! कधी कधी मग आपसूकच मिळतं उत्तर- का तुझ्या इतकी जवळ आहे ते.. फक्त, तू प्रलय घडवून आणू नकोस...!

बुवांचा जन्म

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 01/06/2012 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका वाचनमात्र मिपासदस्याकडून इमेलवर मिळालेली कथा. त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करत आहे. प्रेरणा/मूळ कथा: भुताचा जन्म. लेखक - द. मा. मिरासदार
-------------------------
गेले चार दिवस भिंतीला तुंबड्या लावत होतो. काय करणार? मी सतत मिपावर पडीक. कामाच्या नावाने बोंब. **वर एक सणसणीत लाथ मारून साहेबांनी हाकलला मला. तेवढीच एक बसली असती तर ठीक पण साहेब भारदस्त त्यांची लाथ त्यांच्याहून भारदस्त. मी जो कोलमडलो तो थेट डोक्यावर जाऊन पडलो. तेव्हापासूनच थोडासा बदलत चाललो होतो हे लक्षात येत होते. त्यातच देशमुख्याचा फोन आला. देशमुख्या म्हणजे बापमाणूस. नै नै तसा बाप नाही.