Skip to main content

जात जात जात

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 29/05/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे तिथे चहुकडे आम्हा लिहावी लागते जात. जन्म घेतल्याक्षणीच आमच्या मागे लागते जात. जन्म नोंदणी करतेवेळी लिहावी लागते जात. शाळेत दाखल करताना लिहावी लागते जात. फी भरतानाही शाळेत पुन्हा पाहिली जाते जात नोकरीसाठी वणवणताना लिहावी लागते जात. ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात. नालायकांच्या नालायकीची आधार असते जात. अपयशाला नि न्यूनाला पण लपवून ठेवते जात लायकीला पण बंधन नसते, नसते कुठली जात बढतीसाठी हापिसात रांगा, सांगा पुन्हा जात तुमची आमची रांग वेगळी, वेगळी तुमची जात दहावी, बारावीत बोर्ड सांगतं, वेगळी तुमची जात सैनिकांच्या पलटणीतूनही दिसून येते जात इलेक्शनच्या फडी उतरता, लिहावी लागते ज
काव्यरस

(नग्न सत्य)

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 29/05/2012 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदर सध्या मिपावरचे लेखन, त्यातील बाष्कळपणा, फालतु ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, निरर्थक काथ्याकुट, बालीश कलादालने, सुमार कथा आणि बरेच काही चिल्लर आणि थिल्लर पहाता सध्या आम्ही आमचे ढुंगण वर करुन झोपून गेलो आहोत. डोन्ट डिस्टर्ब !!! :)

लाच लाच लाच

लेखक निश यांनी मंगळवार, 29/05/2012 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
लाच लाच लाच... जिथे तिथे चहुकडे द्यावी लागते लाच. जन्म घेण्यासाठी मुलगा की मुलगी ह्याची द्यावी लागते देवाला नवसाची लाच. जन्म नोंदणी करण्यासाठी लागते द्यावी लाच. शाळेत दाखल करण्यालापण द्यावी लागते लाच. पोरग परीक्षेत पहिल याव म्हणुन आई बापाची पोराला बक्षिसरुपी लाच. नोकरी लावायला मग घेतो साहेब लाच. काम करुनही ओफीसात चांगली मिळत नाही बढती , बढती साठी मग द्यावी लागते लाच. देवाच्या देवळात वियापी स्पेशल पासाची लाच. डॉ़क्टररुपी देवालाही हवी असते लाच. सैनिकांच्या शवपेटीत असतेकी हो लाच. गांधी टोपी खाली दडलेली असते की हो लाच. टीव्ही असो कि पेपर असो मिडियावाल्याना बातमी लपवायला किंवा दुसर्‍याची

पुणेरी दुकानदारीचा एक नमुना

लेखक बाळ सप्रे यांनी मंगळवार, 29/05/2012 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील एका पॅटीससाठी प्रसिद्ध बेकरीवजा दुकानातील हा किस्सा. माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या काउंटरवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता. एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक गिर्‍हाईक आलं पॅटीस घ्यायला. "पॅटीस आहेत का?" - गिर्‍हाईक "संपले" - काउंटरवरील इसम गिर्‍हाईक निघून गेलं. "आज लवकर संपले वाटतं पॅटीस?" - मित्र "छे!! संपले नाहीत अजून. संपतील थोड्या वेळात" - काउंटरवरील इसम "मग त्या माणसाला का सांगितलत की संपले म्हणून?" - मित्र "अहो सारखे लोक येत असतात काही ना काही घ्यायला. आम्हाला जरा विश्रांती नको ?" - काउंटरवरील इसम :-)

Graphic Design,Photoshop,Illustartor यासंबंधी मदत हवि आहे .

लेखक गोंधळी यांनी मंगळवार, 29/05/2012 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
मला Graphic Design(Photoshop,Illustartor)चा कोर्स करायचा आहे. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. तरि यासंबंधि मदत हवि आहे. मुंबई मधे Graphic Design(Photoshop,Illustartor) साठी चांगल्या प्रशिक्शन देणाय्रा संन्था, केंद्र कोणती आहेत ? तसेच या मध्ये करीयर साठी किती स्कोप आहे? यासंबंधि रोजगार पुरवणाय्रा व चांगले वेतन देणाय्रा कुठल्या कंपन्या आहेत मुंबई?

टोमॅटोच्या रश्यातील मटण

लेखक जागु यांनी मंगळवार, 29/05/2012 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ किलो मटण ३ ते ४ टोमॅटो ४ कांदे लसुण पाकळ्या ५-६ वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या. हिंग अर्धा चमचा हळद १ ते दिड चमचा मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता) गरम मसाला १ चमचा मिठ २ चमचे २ मोठे बटाटे २ ते ३ पळ्या तेल

ऐन वसंतात ....

लेखक मनिषा_माऊ यांनी सोमवार, 28/05/2012 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ || भरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा कोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा झुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१|| मेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला नवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला हळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२|| मन कावरं बावरं , मन केवड्याच रान किती सावरू आवरू आज सुटले हे भान किती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३|| नाही संपला अजुनी सये तुझा वनवास तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४|| सनईचा सूर का गं असा बेसूर लागला वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला किती दाबला हु
काव्यरस

ईस्टन ए़क्सप्रेस हायवे

लेखक निश यांनी सोमवार, 28/05/2012 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ मुलुंड चेकनाका , रात्रीचे १२ वाजत आले होते. राजु रिक्षा वाला चेंबुरला जाणार कोणी गिर्‍हाइक मिळत का ? ते बघत होता. पावसाळी रात्र त्यात आमावस्या त्यामुळे शेवटचे भाडे मिळाले कि तो ते भाडे चेंबुरला सोडुन परत गोवंडीला घरी जाणार होता. बराच वेळ कोणीच येईना म्हणुन तो एका टपरी वर पान खायला गेला. पान घेउन पानवाल्याकडुन उरलेले पैसे न घेताच परत तो आपल्या रिक्षात यायला निघाला. पाउस थोडा चालु होताच. तेवढ्यात त्याला मागुन कोणी तरी आवाज दिला. त्याने मागे वळुन पाहीले तर एक सुटात असलेला मनुष्य त्याला पैसे पानवाल्याकडे राहीले आहेत ते सांगत होता.

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 28/05/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
.
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी