Skip to main content

लेकीची फरमाईश

लेखक जयवी यांनी बुधवार, 30/05/2012 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीची नवी फरमाईश ....... :) DSC00729-001" alt="" />

नई दिल्ली पहायचीय ?

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 30/05/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यानंतर दिल्ली तिल वास्तुकला - सुप्रसि ध्द फोटोग्राफर मदन मह्ट्टा यांनी १९५७ मधे घेतलेल्या या फोटोत नव्या दिल्ली तिल सरकारी माल किच्या होटेल अशोका ची ही इमारत दिसत आहे ,मदनजी चा जन्म काश्मिर चा , फोटोग्राफिचे शिक्ष ण इंग्ल् ड येथे घेवुन भार् तात आले,उत्तर हिन्दुस्तानात नामंकित स्टुडिओ पैकी त्यान्चा एक,त्यांनी तेन्व्हा अतिशय सुरेख फोटो काढ्ले आहेत २)इंडियन इंस्टिटूट ऑफ टेक्न्नालोजी -आय आय

माहिती हवे आहे.. पेट्रोल फ्रॉड पुणे - हिंजवडी

लेखक किशोरअहिरे यांनी बुधवार, 30/05/2012 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हिंजवडी येथे फेज १ ला जो इंडियन ओईल चा पेट्रोल पम्प आहे तिथे पेट्रोल च्या ठिकाणी हवा भरण्यात येते आणि मीटर चालू राहते :( ह्या बद्दल कोणी काही मदत करू शकेल का? किंवा कोठे आणि कशी तक्रार करायची हे तरी सांगू शकाल का? जर पेट्रोल ४०० रु. च्या वर भरायचे असेल तर असा अनुभव येतो.. तिथले काम करणारे लोक.. २००-३०० रु. होई पर्यंत मीटर चालु राहिल आणी पेट्रोल पडतच नाही अश्या प्रकारे पेट्रोल टाकले जाते.. :( आणी थोड्या वेळाने बरोबर सर्व मिटर बंद होते आणी कारण सांगतात लाईट गेली आणि आता जनरेटर वर चालु करणार.. मग ऊरलेल्या पैशाचे पेट्रोल टाकले जाते.. म्हणजे जर तुम्ही १०००रु.

वेगळे आवाज

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 30/05/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
'ए हं आली हं, आता हे यडं बघ जाईल तिच्या मागे!', आमच्या कॉलेजात, नेहमीच्या बस स्टॉपवर, चैतन्यकांडीचा आस्वाद घेत असताना बरेचदा बोलला जाणारा हा डायलॉग. यातला 'हे यडं' म्हणजे आस्मादिक आणि हं म्हणजे निलम बाळ. हा डायलॉग मारला जावो अथवा न जावो, आपसूकच मी तिच्या मागे जात असे. हं नितांत सुंदर होती हे तर सत्यच पण मी तिच्या मागे जाण्याचे कारण तिचे दिसणे नव्हते, ते होते तिचा आवाज, 'वेगळा आवाज'. तिचा आवाज अगदी वेगळा होता. थोडासा रफ, घोगरा म्हणावा असा पण नेमका घोगरा नाही. त्या आवाजामुळेच तिला हं हे नाव पडले होते.

सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ "

लेखक रघु सावंत यांनी मंगळवार, 29/05/2012 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ " तुझ्याकडे पाहून तुला हवय काय माझ्या शिवाय कुणाला कळेल काय डोळ्यातले भाव ह्रदयातील ताना माझ्या शिवाय कधी कळतील काय ओझरता स्पर्श अनं भरलेले ऊर माझ्या शिवाय कधी मिळतील काय जाशील तू दूर पण सवयीचा श्वास माझ्या शिवाय कुठे मिळेल काय असशील सुखात पण प्रेमाची शाल माझ्या शिवाय कुणी पांघरेल काय येताजाता तुझ्या प्रेमाचा कटाक्ष माझ्या शिवाय कुणी झेलेल काय ते आसुसलेले ओठ ती प्रेमाची भूक माझ्या शिवाय कुणी क्षमवेल काय रुपगव्रीते तुझ्या तारुण्याची तारिफ माझ्या शिवाय कुणी करेल काय रंगल्या रात्री तुझ्या प्रेमाचा मिलाप माझ्या शिवाय कुणी करेल काय तुझ्या ह्रदयाला हाक प्रेमाची
काव्यरस

एन डी तिवारींची सत्वपरीक्षा

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 29/05/2012 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, आंध्रचे माजी राज्यपाल एन डी तिवारी (वय ८६) यांची आग्नि परीक्षा होते आहे. याबाबतची हकीकत अशी रोहित शेखर यांच्या पितृत्वाच्या वादावरून डीएनए चाचणीस नकार देणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या रक्ताचे नमुने आज (मंगळवार) डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने तिवारी यांना डीएनए चाचणीसाठी आजपर्यंत रक्‍ताचे नमुने देण्याचा आदेश दिला होता.

दूर-आशा

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 29/05/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
पापण्यांचे सोस माझ्या पंजरी बिलगून हे अंतरी ओल्या खळ्याचे श्वास अजुनी नागवे अंकुरे खडकातही; ध्यासातले आलेख हे खोल रुतलेले; कळे ना कोण संधी जागवे ओतणे निर्व्याज पाणी आणि अगणित जोगवे थेंब थेंबाचा उसासा शार माती जोजवे गुदमराला एक रेषेचे उताविळ घर नवे दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे .................................अज्ञात

विद्वानाची* लक्षणे

लेखक आबा यांनी मंगळवार, 29/05/2012 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका : हा लेख मार्गदर्शनपर व्हावा, अशी आमच्या संपादकांची (म्हणजे आमची) इच्छा आहे. कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी त्या विषयातले कळावे लागते, हा एक सार्वजनिक गैरसमज आहे. आपल्याला ज्या विषयातले काडीचेही ज्ञान नाही, त्या विषयावरही बोलता येते. फक्त त्यासाठी विद्वान असावे लागते. आजकालची सामाजिक परिस्थिती पाहता, प्रत्येकाला कोणत्याही विषयावर बोलता येणे ही एक प्रातिनिधिक गरज बनली आहे. (फक्त पुण्यातच नाही, कोठेही.) अभ्यास करून विद्वान होणे हे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे झटपट विद्वान होण्याची सोय ही एक अत्यावश्यक गरज झाली आहे.