Skip to main content

कुछ मीठा हो जाय..

लेखक गवि यांनी रविवार, 03/06/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
गोड खाण्याचं टेम्प्टेशन एकदा का झालं की ते जाम जोरात होतं. सध्या अधूनमधून खाण्यावर कंट्रोल ठेवण्याचं भूत मानगुटीवर बसत असल्यामुळे गोडाशी संबंध संपल्यात जमा आहे. हो.. मोडायचाच निग्रह तर मासेमटणासाठी मोडावा, गोडासाठी नको.. पण आज पोराचा बालहट्ट झाला.. मुळात झालं असं होतं की मी माझ्या शाळकरी वयात रुचिराकृपेने एक चॉकलेटची पाककृती करायचो. ती एकदम जमून गेली होती. माझे बाबा मी बनवलेल्या चॉकलेटचं ताट रिकामं करुन टाकायचे. मग माझी कॉलर ताठ. बाबा गेल्यावर बरीच वर्षं, बरीच म्हणजे वीसेक वर्षं हे बनवलंच नाही. मग मलाच पोरगं झालं तेव्हा बनवलं.

मराठीतील भाषा सौंदर्य.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 03/06/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/21806 " दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या त-हा" या लेखावरील माझी प्रतिक्रिया म्हणून आणि आंतर्जालातील इकडून तिकडून आलेले खालील इ पत्र. मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसाअसणार? थोडं शिकवल्यावर मी तिला कही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.तीन चार शब्दांचे अर्थ सगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे. मी तिला म्हटलं, 'अगं, वाक्य लिहूनआणायचंस,नुसता अर्थ कसा सांगू?

मेसोअमेरिका(४.१) – माया ( Mysterious Mayans)

लेखक किलमाऊस्की यांनी शनिवार, 02/06/2012 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People) जगाच्या पाठीवर एकाच वेळी ठिकठीकाणी अनेक संस्कृती नांदल्या, बहरल्या. काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही आपला वारसा पुढच्या पिढीला देऊन लुप्त झाल्या. मेसोअमेरीकेच्या इतिहासातील माया संस्कृती ही अशीच एक. ‘२०१२ - जगाचा अंत – माया कॅलेंडर“ या तीन गोष्टींच्या परस्पर संबंधामुळे आजच्या जगाला माहित असलेली. बरीचशी गूढ आणि रहस्यमय अनेक दंतकथांमधून अजरामर झालेली. युरोपात रोमन साम्राज्य लयास जात असताना जगाच्या दुसर्‍या टोकाला अमेरीका खंडात प्रगत “माया” संस्कृती” बहरास येत होती.

(कोणत्या मिपापटुला मिपारत्न द्यावे?)

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 02/06/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्या मिपापटुला "मिपारत्न" द्यावे? हा काथ्या कुटताना कामगिरी मधील सातत्य लक्षात घ्यावे. उगाच गेले नउ महीने काहीही लिहीले नाही आणि एखाद दुसरा प्रतिसाद देणार्‍या ना ह्या उपाधी साठी लक्षात घेउ नये. उपाधी देताना "का"? ची चर्चा अपेक्षित.

कोणत्या भारतीय क्रिडापटूला भारतरत्न द्यावे?

लेखक सदानंद ठाकूर यांनी शनिवार, 02/06/2012 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
जर एखाद्या भारतीय क्रिडापटूला भारतरत्न द्यावयाचे झाले तर ते प्रथम कोणाला द्यावे? पर्याय - १ : हॉकीचा जादुगार ध्यानचंद (२९-८-२००५ ते ३-१२-१९७९) क्रिकेट मध्ये जेवढा डॉन ब्रेड्मन ग्रेट व अव्दितीय तसाच हॉकीत ध्यानचंद. त्याचे गोल करण्याचे कौशल्य वादातीत होते. त्याने एकूण कारकिर्दीत १००० पेक्षा जास्त गोल केले. यापैकी ४०० गोल त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात केले होते. असे वाचले व ऐकले आहे कि तो सामन्यात सहभागी असेल तर ध्यानचंदचे जादूचे प्रयोग पहावयास अवश्य मैदानात या अशी जाहिरात त्या काळात केली जात असे.

इंटरव्हेन्शन

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 02/06/2012 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं. पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात.

खंडित दोरखंड

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 01/06/2012 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
१. एका माणसाकडे १ मी. लांबीचे दोराचे अनेक तुकडे आहेत. समजा प्रत्येक तुकड्याचे अजून दोन तुकडे केले आणि त्यातला छोटा एका डब्यात टाकला (ह्या डब्याला धा(कला) म्हणू) आणि मोठा दुसर्‍या डब्यात (ह्या डब्याला थो(रला) म्हणू या). आता गणिती सोयीसाठी असे समजू की प्रत्येक १ मी तुकडा, कुठे कापला जाईल ह्याला काही नियम नाही. ० मी. पासून १ मी. पर्यंत कुठेही तो कापला जाऊ शकेल. (uniformly distributed random variable from 0 to 1) आता धा डब्यातल्या तुकड्यांची सरासरी लांबी काय असेल? आणि थो डब्यातल्या तुकड्यांची सरासरी लांबी काय असेल? २. आता समजा प्रत्येक १ मी. दोराचे दोन ऐवजी तीन तुकडे केले.

अगतिक

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 01/06/2012 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी बंगलोरला काही कामानिमित्त गेलो असताना अंकित घाटपांडेशी ओळख झाली, ऑफिशियल नाही पण एक जिंदादील माणूस म्हणून एकदम आवडून गेला तो. तो आलेला एका सॉफ्टवेअर कंपनीतून म्हणजे बंगलोरच्या त्या कंपनीत सॉफ्टवेअर अपडेटींगचं काम चालू होतं. एक एक कंप्युटर फ़ॉरमॅट करून मग अपडेट करायचं फारच कंटाळवाणं काम ते. त्या टीम मधला हा अंकित.