Skip to main content

आनंद भवन : नेहरू स्मृतीभवन , इलाहाबाद (उत्तर प्रदेश )

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 27/05/2012 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी.....त्यांना विनम्र अभिवादन..... काही कामानिमित्त इलाहाबाद शहराला भेट देण्याचा योग आला होता...इलाहाबाद हे शहर नेहरू घराण्याची कर्मभूमी आहे...स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्या काळात याच शहरातून कार्य सुरु केले होते...इलाहाबादमधील पंडित नेहरूंच्या आनंद भवन या Musiemला भेट दिली ...त्यातील काही फोटो इथे upload करीत आहे.... १. पंडित नेहरूंचे निवासस्थान पंडित नेहरूंचे निवासस्थान २.

टीम चा आरोप

लेखक शकु गोवेकर यांनी रविवार, 27/05/2012 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज च्या पेपरात टीम अण्णाच्या पंत प्रधानावरील आरोपाची बातमी आपण वाचलीत काय ? खरे तर किसन बाबुराव हजारे ज्याना लोक प्रेमाने अण्णा म्हणतात हा एक साधा सच्चा माणुस्,गरिबीमुळे जेम तेम आठवी पर्यन्त शिक्षण ,परंतु भल्याभल्या न्ची झोप उडविणारा,यांनी रामलिला मैदान ते जन्तर मन्तर या सुमारे आठ कि.मि.च्या अन्तरामधे आठ लाख लोकांची टीम उभि केलि हे आठ्वले काय ? हजारें च्या वरुन एका इंग्रजी सिनेमाची आठ्वण झाली, Clint Eastwwod हा माझ्या आवडत्या नटांपैकी एक -- आणी हिंदी मधले कोणकोणते ? ई,नको ग बाई - काय एकेक नावे वाचुन किंवा ऐकुन च शिषारी येते हो हल्ली इतके विषारी आहेत का हो अलीकडील हिन्दि सिनेमे ?

आजच्या राजकारण्यांचा महागुरू

लेखक शरद यांनी शनिवार, 26/05/2012 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या राजकारण्यांचा महागुरू आजचा कोणीही राजकारणी पुढारी घ्या. तो काय करतो ? निवडणुका जवळ आल्या की मत मागावयास जनतेकडे जातो व भरपूर आष्वासने देतो. मते मिळून निवडून आल्यावर जनतेला विसरून जातो. त्याच्याकडे जाऊन " कामाचे काय झाले ? " विचारले की तो म्हणतो " पुढील वर्षी नक्की होणारच !" मग एकवचनी राहून हीच रेकॉर्ड परत परत लावतो व फारच अंगावर येते आहे असे वाटले तर दुसरे एखादे काम करून मुख्य विषय बाजूला सारतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे असेच का वागतात ? कारण त्यांचा महागुरू एकच आहे, हरिश्चंद्र. तुम्ही म्हणाल " ऑं, हे काय सांगता.

रंगात रंगलो मी - रंगाविना

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/05/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मित्रहो, नव्या तंत्रज्ञानाच्या युगाने आपल्याला अनेकविध साधने आपल्या मनोरंजनासाठी दिली, आपल्या आनंदाच्या निधानाच्या निकट जाण्याची संधी दिली. संगणक क्षेत्रात सहा फूट बाय चार फूट बाय तीन फूट या आकाराच्या संगणकावर कामाची संधी मिळाली.पण तेथे आजच्या हपिसांसारखी " चंगळ" करण्याची संधी नव्हती. एकाच रंगाचा मॉनिटर, एकच ओळ दुरूस्त करता येणारा " एडीटर" व आठ एम बी च्या दोन हार्डडिस्क ई च्या दिव्य कॉनफिगरेशन वर काम करता करता पी सी एक्स टी आला. मग क्विक बेसिक मधे रनिंग लाईट , गणपतीची आरास ,बीप चा वापर करून जन गण मन ई. उद्योग इतकी तरी " चंगळ" वाट्याला आली. मग आपल्या घरी पी सी आला रे आला .

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 26/05/2012 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
थोडीशी पार्श्वभूमी: सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.