Skip to main content

धर्म आणि लोकसंख्या

लेखक मराठे यांनी मंगळवार, 22/05/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला जर कोणी विचारलं की धर्माचा आणि लोकसंख्या वाढीचा संबंध आहे का? आणि कसा? तर मला वाटतं बरीच लोक एका क्षणाचाही विलंब न लावता तावातावाने कसे क्ष धर्माचे लोक लोकसंख्या वाढीस कारणीभूत आहेत यावर तावातावाने बोलायला लागतील. काही जरा जास्त समजूतदार लोक लोकसंख्या धर्मावर नव्हे तर आर्थिक स्थानावर अवलंबून आहे असं म्हणतील. पण जर एकून जागतीक लोकसंख्या, धर्म, लोकांचं सरासरी उत्पन्न या सगळ्या गोष्टी विचारात घेउन एक तक्ता आखला तर एक वेगळंच चित्र डोळ्यापुढे येतं. हँस रॉसलिंग हा अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स मधे रमणारा एक अवलिया.

(मिपासहीत मराठी संस्थळांवर लेखन-प्रतिसाद देण्याचे नक्की फलीत काय?)

लेखक विकास यांनी मंगळवार, 22/05/2012 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
या चर्चेची प्रेरणा :-) सर्वप्रथम, कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. मिपा सहीत अनेक मराठी संस्थळांवर अनेकजण सातत्याने लेखन करत असतात, आपले विचार मांडत असतात, आदान-प्रदान करतात आणि वादही घालत असतात! या सर्वाला वाचन, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, नियोजनपूर्वक वादविवाद कौशल्य असे बरेच काही लागते. तरी देखील अनेक प्रश्न मनात उद्भवतात, त्यावर चर्चा घडावी हा या धाग्याचा हेतू आहे.

तांबट...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/05/2012 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल काही तांबटचे फोटो मिळाले. ह सहसा बाहेर येत नाही व ओरडतांना मानेची फार मस्त हालचाल करतो. तांबट टाके भांड्यावर टाके मारताना ज्या तालात आवाज येतो तसा काहिसा याचा आवाज आहे.... १ ४ चतूर.. आशा आहे हे तुम्हाला आवडतील. जयंत कुलकर्णी.

एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 22/05/2012 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणं कफ्युज होऊन काकू टाकतोय. एव्हरेस्ट सर करुन आपले (महाराष्ट्रातले) वीर परततील. त्यातले दोघे परिचयाचे आहेत. एव्हरेस्ट मोहिमेबद्दल ऐकलं होतंच. त्याला झालेल्या खर्चाचे आकडे देखील सर्वसाधारणपणे बर्‍याच जणांना ठाऊक असतील. बर्‍यापैकी मोठी असलेली ही रक्कम ह्या वीरांनी लोकवर्गणीतून (बरीचशी) गोळा केली. सकाळी नाष्टा करताना चर्चा सुरु झालेली... (कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. एव्हरेस्ट सर करणं ही अत्यंत धाडसाची, चिकाटीची , नियोजनपूर्वक, अत्यंत संयमानं केलेली तसंच आणखी बरंच बरंच साध्य करवणारी गोष्ट आहेच.

राजीव इंदिरायुगीन भारतवर्ष

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 22/05/2012 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी ह्यांना सध्या भावपूर्वक श्रद्धांजली सध्या सर्वत्र वाहिली जात आहे. कदाचित भविष्यात राजधानी राजीव गांधी टर्मिनल मधून दिल्लीकडे कूच करेल.

आता फाशीची काय गरज?

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 22/05/2012 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानातून शांतिसंदेश घेऊन आलेले लोकोत्तर पुरुष जनाब अजमल कसाब ह्यांची बिर्याणी नुकतीच बंद झाल्याचे दु:खद वृत्त कळले. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13343396.cms आपल्या जनजागृतीच्या प्रयत्नाला अनवधानाने किंचित हिंसक स्वरुप लाभून त्यात किरकोळ लोकांची हानी झाली त्याबद्दल ह्या महात्म्याला मृत्युदंड झाला म्हणून ह्या देशाचे शांतिप्रिय पिते स्वर्गात तळमळले असतील ह्यात शंका नाही. पण सरकारने आपल्या परीने ह्या क्रूर शिक्षेला पुढे ढकलून आपले शांतिपूर्ण हेतू सिद्ध केले आहेतच.

सर्च इंजिन - कसे चालते रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 22/05/2012 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझ्या मोठ्या मुलाला शाळेत मांसाहारी फुलाबद्दल (व्हिनस फ्लायट्रॅप) माहिती दिली होती पण त्याचे जे फोटो दाखवले ते ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होते. रंगीत फोटोसाठी तो माझ्यामागे लागला होता. त्याला फक्त फोटो बघायचे होते. मग त्याला मी म्हटले गुगल वर शोधुयात ना! गुगलच्या चित्रविभागाला साकडे घालून त्या फुलाची आणि त्यासारख्या दुसर्‍या फुलांचीही चित्रे त्याला दाखवून गुगलच्या शोध जगताची अलीबाबाची गुहा त्याला उघडून देली. काहीही शोधायचे असल्यास गुगल मध्ये सर्च करून माहिती मिळवता येते, ह्या कल्पनेने तो एकदम खुष झाला.

समाजसेवा

लेखक विकास यांनी सोमवार, 21/05/2012 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्यमेव जयते" या आमीर खानच्या मालीकेवरून टिका करणार्‍यांचा एक मुद्दा हा त्या मालीकेतून होणार्‍या उत्पन्नाविषयी आहे. अंदाजे तीन कोटींची मालीका तयार करून आमीर केवळ पैसे मिळवतोय आणि दुसरीकडे जनजागृती/लोकशिक्षण/सामाजीक प्रश्नांस वाचा फोडणे, जे काही असेल त्याचा नुसता देखावा करत आहे... मला तसे वाटत नाही हे त्या चर्चांमधून सांगून झाले आहेच तसेच इतरांचे पण या मालीकेसंदर्भात आणि आमीरसंदर्भात समान अथवा विरोधी विचार समजले आहेत. त्यामुळे ह्या चर्चेचा विषय कृपया आमीर कस्सा चांगला आहे अथवा किती चालू आहे या विषयी नसावा. त्याच्याशी आपले कुठल्याच अर्थाने देणेघेणे नाही... त्यावर चर्चा नको.

टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप.

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 21/05/2012 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार.. माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती, आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत....