Skip to main content

एक पत्रकथा: भाग दुसरा

लेखक वेणू यांनी गुरुवार, 17/05/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
पत्रकथेच्या पहिल्या भागाची लिंक : http://www.misalpav.com/node/21677 ---------------------------------------------------------- १३ ऑक्टोबर १९९१ अरे बापरे... चिडलात? मला वाटतं माझ्या सहज लिहीण्यात तुमची सलती नस दुखावली गेलीये.

(स्त्री मन)

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 17/05/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/21683 वळवळण्याने तिच्या जाग आली मला, जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके वळवळायला?' शिरली अलगद केसात माझ्या, लागली कचकचून चावायला, कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला, थापटून डोक्याशी थोपटले किंचीत इथे तिथे, राहिचना, शेवटी मस्त खाजवून डोक्यावर, थोपटले जरा मानेवर, जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो, . . . . . .'अग! डोक्यात उवा झाल्यात माझ्या, शिकेकाईने जरा घासून दे'..
काव्यरस

स्त्री मन..

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 17/05/2012 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मुसमुसण्याने तिच्या जाग आली मला, जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके मुसमुसायला?' शिरली अलगद कुशीत माझ्या, लागली हमसाहमसून रडायला, कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला, कवटाळून हृदयाशी थोपटले किंचीत इथे तिथे, राहिचना, शेवटी मस्त चुंबून गालावर, थोपटले जरा कुल्ह्यांवर, जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो, . . . . .'अग! सांभाळ जरा आपल्या छकुलीला, दुपटे बदल तिचे'..
काव्यरस

मी किल्ल्यांवर का भटकतो ?

लेखक जातीवंत भटका यांनी गुरुवार, 17/05/2012 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगायचं तर या उत्तराच्या शोधात मी सुद्धा आहे. त्यामुळेच हा प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीबद्दल मला प्रचंड सहानभूती वाटते . आत्तापर्यंतच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम मी या सह्याद्रीवर केलं, त्याच्या अंगाखांद्यावर पहुडलेल्या किल्यांवर केलं. (मला खात्री आहे माझ्या या विधानाचं, माझ्या बायकोलाही वाईट वाटणार नाही. ती ही माझ्यासारखीच भटकी आहे !) गेल्या सोळा वर्षांत अनेक किल्ल्यांच्या, घाटवाटांच्या अनेकदा वार्‍या केल्या. कोणताही किल्ला कितीही वेळा पाहिला असला तरी परत तिथे गेल्यावर तो वेगळाच का भासतो ? हे एक प्रकारचं गूढ आहे माझ्यासाठी. सह्याद्रीच्या सगळ्या भेटी कायमच अविस्मरणीय असतात.

महेश्वरचा किल्ला: अहिल्याबाई होळकरांचे मूळ दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावरः कुणी वाचवू शकेल का?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 16/05/2012 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या फेब्रुवारीत अहिल्याबाईंच्या महेश्वरास गेलो होतो. अतिशय सुंदर जागा. नर्मदाकाठी किल्ल्यावर अहिल्याबाईंचा वाडा जसाच्या तसा जतन केलेला आहे. मी अनेक वर्षांपूर्वी इथे गेलेलो असताना ज्या स्थितीत किल्ला व गाव होते, जवळ जवळ तसेच अजून असल्याचे पाहून बरे वाटले. मात्र पूर्वी किल्ल्याच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या अहिल्याबाईं च्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर व सज्जात जाता यायचे, तिथे आता प्रवेश प्रतिबंधित आहे.

सांगे वडिलांची कीर्ती.....

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 16/05/2012 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ.

वेताळाचे प्रश्न

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 16/05/2012 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच काळाने आमचा नान्या सक्रिय राजकारणात परत आला, आणि आमचा आनंद बाटलीत मावेनासा झाला. तोबताबड आम्ही आमच्या चौपाटीवरती प्यार्टी आयोजीत केली. सगळी चौपाटी सजली होती, बार टेंडर, कॅप्टन, वेटर सगळे नवीन धुतलेले कपडे घालून सेवेला हजर झाले होते, मात्र नान्याच्या चेहर्‍यावरती उदास उदास भाव दाटून राहिले होते. गप्प गप्प नान्या काय मला बघवेना. शेवटी गुमसुम मध्ये २ पेग झाल्यावरती मी नान्यावरती सरळ डाफरलोच. मी :- नान्या, काय मयतीला जौन आला बे ? असा का बसला आहेस ? नाना :- पर्‍या काय सांगू तुला ? मला ४ दिवस झाले वेताळाने पकडले आहे.

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

लेखक स्पा यांनी बुधवार, 16/05/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-…) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा