मस्करी
तसा मी शक्यतो कूणाची मस्करी करायला जात नाही.कारण कधी-कधी मस्करी मूळे पार वाट लागते.पण कधी-कधी काही जण असे काही बोलून जातात, की मग त्यांची थोडी मस्करी केल्याशिवाय राहवत नाही.
मागच्या आठवड्यात पण असेच झाले.मी आणि मूलगा इंटरनेट थ्रु गप्पा मारत होतो.
...म्हणजे मी परदेशात नौकरी करण्याइतपत माझे शिक्षण झाले असून, दोन्ही घरातील इंटरनेटचा खर्च मी भागवू शकतो, हे तूमच्या लक्षांत आले असेलच.बायकोला घाबरून पळून गेलो, हे जगमान्य सत्य माझ्या आयुष्यात पण सत्य झाले, हे देखील लक्षांत आले असेलच...
तेव्हढ्यांत मूलाचा मित्र आला.
...तो कसा आला? बेल वाजवून की कडी वाजवून?
रमतारामाची आरती
वडिलांची किर्ती गाऊ नये, धर्माच्या फुकाच्या गप्पा मारु नये, सारासार विचार करुन वागावे असा आम्हा रात्रंदिन उपदेश करणार्या रमतारामांचे आमच्यावर थोर उपकार आहेत.
आम्हास ज्ञान देणारा आम्हाला देवासमान असतो.
त्यामुळे रमताराम आमचे देव आहेत.
साहजिकच त्यांची आरती करणे अतिशय गरजेचे आहे.
आरतीनंतर प्रसाद मिळेल.
प्रसादासाठी कोणतीही गडबड करु नये.
देव रागवतो.
शिस्त ही आवश्यक आहे.
चला तर आरती करुया...
काव्यरस
आयुष रिसॉर्ट
मागिल गुरुवारी कंटाळा आला म्हणून ऑफिसला दांडी मारली. मिस्टरांना वेळ होता तसेच मुलीला, भाचे कंपनीला सुट्टी पडलेली. मग दिवस सार्थकी लावू म्हणून कुठेतरी फिरायला जायचा बेत आखत होतो. बेत करता करताच १ वाजला. रोज रोज आसपासची स्विमिंग पुल आणि गार्डन पाहून मुले कंटाळली होती मग म्हटल चला आज पनवेलला जाऊया आयुष रिसॉर्टला.
जेऊन निघता निघता ३ वाजले. गाडी घेतली आणि बच्चे कंपनी सकट आमची स्वारी आयुष रिसॉर्ट कडे वळली. गेट मधून आत गेलो. गुरुवार असल्याने गर्दी आजीबात नव्हती हे पाहून अजून समाधान झाल. मिस्टरांनी जाऊन आधी तिथले चार्जेस भरले. तस ते महागडच आहे.
मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People)
मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप
मेसोअमेरिका (२) - ओल्मेक (Mother Culture)
१६ व्या शतकात स्पॅनिशांनी, आपण जिंकलेल्या मेसोअमेरिकन वसाहतीतल्या लोकांची माहिती गोळा करून दस्ताऐवज बनवायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी काही आस्तेक जमातींशी संपर्क साधला. या जमाती स्वत:ला “Tzapotecatl “ असं म्हणत. Tzapotecatl चा अर्थ "People of the place of Sapote".
काकस्पर्श
नशीबाने वारंवार पेकाटात लाथ घातली
तरी लाळघोट्या कुत्र्यासारखं पुन्हा पुन्हा
शेपूट कधी पायात घालून
तर कधी हलवत हलवत
त्याच्याच मागे मागे फिरणं..
संपलं एकदाचं ते मरत मरत जगणं !
तसा मी प्रयत्न बऱ्याचदा केला होता
काळाचं लक्ष वेधून घेण्याचा
त्याला जवळ बोलावण्याचा
पण त्यालाही कधी वाटलं नाही
मान वर करून पाहावंसं
मला मुक्त करावंसं..
आणि मी फक्त लाथाच खाल्ल्या...
कधी शेपूट पायात घालून
कधी हलवून... हलवून...
आज मात्र त्याचं कसं कोण जाणे, लक्ष गेलं
(म्हणाला असावा - "अरे!
मिसळपाव