मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक
मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते
म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले.
इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी
कार्यक्रम होत असतात.
या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात.
लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात.
प्रचंड संख्येने हजर असतात.
मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात.
मिसळपाव
