Skip to main content

देव आणि धर्म, माझे मत

लेखक शरद यांनी मंगळवार, 19/06/2012 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
देव आणि धर्म श्री. वालावलकर यांच्या पुस्तकासंबंधित प्रतिसादात बरेच जणांनी देव व धर्म यावर आपले विचार प्रगट केले आहेत. हिन्दू धर्म व देव याबाबत मी वाचलेल्या ग्रंथांवरून बनलेले माझे मत येथे देत आहे. हिन्दू हा शब्दच बाराव्या शतकात मुसलमान आक्रमकांनी सिन्धू नदीच्या काठी राहणारे, गुलाम या अर्थाने वापरला आहे. त्या आधी हिन्दू हा शब्दच नव्हता तर मग हिन्दू धर्म तरी कोठून असणार ? तर मग त्यापूर्वीच्या काळामध्ये धर्म नव्हताच काय ? या करिता प्रथम धर्म याची एक व्याख्या बनवू. लोकांचे आचार विचार, श्रद्धा,भावना , अभ्यास, परंपरा इ.

अदला-बदली

लेखक सौरभ उप्स यांनी मंगळवार, 19/06/2012 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नमस्कार, चौकट राजांच्या http://www.misalpav.com/node/२१९३१ या धाग्यात चित्र्गुप्तानी विचारलेल्या रंगाची अदला बदली करता येते का या प्रश्नाला उत्तर दिलेल्या त्या फोटोशोप च्या किमयेची मकिंग आपल्यासाठी या धाग्यात टाकत आहे... मी वापरलेले सॉफ्टवेर photoshop CS5 on mac आहे म्हणून तुम्हाला बघताना जरा वेगळ वाटेल....

काही 'जपानी' अनुभव

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 18/06/2012 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक. अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता.

फलश्रुती

लेखक चाफा यांनी सोमवार, 18/06/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सतत मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिडीया अर्थात टेलीव्हीजन वर झी टि.व्ही. मराठीच्या डब्बा गुल या कार्यक्रमातुन पदार्पण केलं आहे. अद्याप जास्त प्रगती नसली तरी एव्हाना तीन स्किट प्रक्षेपीत झालेली आहेत. त्यांची लिंक देतोय अर्थातच श्रेय तुम्हा आश्रयदात्यांनाच जाते. http://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE http://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu पुन्हा एकदा धन्यवाद :)

स्वप्नांचे..

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/06/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
भेटीला ये नकोच देऊ कारण स्वप्नांचे उगाच होते सत्याशी मग भांडण स्वप्नांचे नशेमधे असतानाही मी बरळलोच नाही कल्पनेस बहुतेक असावे कुंपण स्वप्नांचे हलक्याफुलक्या स्वप्नांचा तो काळ कुठे गेला ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे चटई निर्देशांक तयांच्या आयुष्याला द्या तुमच्यासाठी तुटले ज्यांचे अंगण स्वप्नांचे मेल्यानंतर हाल न झाले असते आत्म्यांचे जर का करता आले असते तर्पण स्वप्नांचे माझ्यासाठी उल्का कुठली निखळलीच नाही रिते तरीही पहाटेस तारांगण स्वप्नांचे - उपटसुंभ

सायोनारा s s

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी सोमवार, 18/06/2012 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
सायोनारा s s नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते.

शेअर बाजाराची प्राथमिक माहिती

लेखक सदानंद ठाकूर यांनी सोमवार, 18/06/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी म्युच्युअल फंड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर शेअर बाजारासंबंधी माहिती देणारी दिर्घ लेखमाला सुरु केली असून दर सोमवारी व गुरुवारी एक लेख या प्रमाणे पुढील सहा महिन्यात एकूण सुमारे ५० ते ५५ लेखातून शेअर बाजाराशी निगडीत – भांडवली बाजार, फ्युचर्स, ऑपशन्स व म्युच्युअल फंडाची माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

सायलेंट गाणी

लेखक मीनाक्षी देवरुखकर यांनी सोमवार, 18/06/2012 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
सायलेंट गाणी सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का? बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात.. मला एक librari बनवायची आहे , मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे