Skip to main content

देव वाटला- असुर निपजला !!

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/06/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म लाज संस्कार शरम सोडुन बनला कसा नराधम - फासुन व्यवसायास काळिमा पैसा-पैसा करसी अधमा ! अर्भक दिसले- शस्त्र उचलले माणुसकीचे नांव न उरले ! जिरला टाहो गर्भातच तो माउलीस ना पान्हा फुटतो - स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी कशी कळावी मातृथोरवी ! धन्य होतसे का तव माता - कृष्णकृत्य तव तिजला कळता ? म्हणेल माता नक्की तुजला, देव वाटला- असुर निपजला !!

या आगीमदी काय दडलय काय....

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 21/06/2012 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज म्हणे मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली. दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते संध्याकाळी बंद केले गेले - आग विझविणार्‍या यंत्रणेला मार्ग मिळावा म्हणुन. आग कशी लागली. कुठुन लागली वगैरे चर्चांचे गुर्‍हाळ अनेक वाहिन्यांवर धडाक्यात सुरू आहे. आगीत नक्की काय काय जळलय? - अर्थातच फायली! चला मंडळी पाहुया आता कुणा कुणाचं नशिब उघडतय ते. शहर रचना विभागातले नकाशे आणि फायली गेल्या तर मज्जाच मज्जा! बनवा हवे ते नकाशे आणि पाडा नवे भूखंड. उगाच कुणावर नोंदी फिरवल्याचे आरोप नकोत. झालं गेलं आगीला मिळाल.

मिपा म्हणी

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 21/06/2012 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
या मागची प्रेरणा मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय. चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया. हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन उदा :
  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर

चावडीवरच्या गप्पा

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 21/06/2012 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
' 'हा चक्क अन्याय आहे', सकाळी सकाळी तणतणत नारुतात्यांनी चावडीवर हजेरी लावली. नेहमीचे सिनियर सिटीझन्स आधच हजर होते. 'काय झाले?', कोणीतरी विचारले. 'अरे त्या बिचार्‍या संगगम राजीनामा द्यावा लागला, त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातुन, हे काही ठीक नाही! हे तर त्या स्टीव्ह जॉबसारखे झाले', नारूतात्या.

वऱ्हाडी लोकगीत -उचाट नागोबुढा

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 21/06/2012 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
इयत्ता पाचवीत शाळेतल्या संगीत शिक्षकांकडून शिकलेलं व आजही तोंडपाठ असलेलं एक वऱ्हाडी लोकगीत. माझे योगदान केवळ टंकण्याचे. ------------------------------ पावसानं इचीबहीन कहरच केला गावच्या नदीले पूरच काय आला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला बुढीबी बाप्पा भल्ली गया काढून रडे अन खोपड्यामध्ये इचीबहीन उठू उठू पडे यक जन पलीकडे जाऊन बी आला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला नागोबुढा पोरीच्या घरीबी गेला अन तुपासंगं पोयी खाऊन बी आला तरी म्हने यक रस राहूनच गेला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला पायटी पायटी बुढा कानी गावातची दिसे अन लोकाईकडे पाहून गालातची हसे लोक म्हने काबे काऊन नाही मेला अन लोक म्हणत न
काव्यरस

दही खस्ता कचोरी

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 21/06/2012 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य कचोरीचे सारणः १ वाटी पिवळी मुगाची डाळ चांगली धुवून, ४ तास भिजवून, निथळून घेणे दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून भरडसर धणेपूड १ टीस्पून बडीशेप पावडर १ टीस्पून जीरेपूड १/२ टीस्पून गरम-मसाला १/२ टीस्पून आमचुर पावडर मीठ चवीनुसार कढीपत्ता बारीक चिरलेली कोथींबीर तेल