Skip to main content

प्रार्थना

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 22/06/2012 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
जसे जसे बाबांचे गाव जवळ येत होते तशी येणा-या प्रत्येक स्टेशनवर गाडीतली भक्तांची गर्दी वाढतच होती. छातीला लटकणारे बिल्ले, गळ्यातले गमछे, खांद्यावरील बाबांच्या नाव लिहिलेल्या थैल्या, हातातील पोथ्या ह्यावरून बाबांचे भक्त चटकन ओळखू येत होते. डब्यात आता त्यांचीच संख्या जास्त झाली होती. " किती डॉक्टरांना दाखवलं, कोणत्याही उपचारांचा, कुठल्याही औषधांचा परिणाम झाला नाही, नुसता पाण्यासारखा पैसा खर्च झाला, मात्र फायदा काहीच झाला नाही, किती प्रार्थना केली, किती देवांना नवस बोललो असेल, त्याची गणतीच नाही. काहीही फायदा झाला नाही, सगळीकडून निराशाच हाताला लागली, काय करावं कळेनासं झालंय, त्रास बघवत नाही हो!

भळभळती हृदये

लेखक प्रदीप यांनी शुक्रवार, 22/06/2012 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी 'न्यूयॉर्क टाईम्स' मधे संपादकीय पानावर 'बोको हराम' ह्या नायजेरीयातील दहशतवादी संघटनेवर, न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीतील इतिहासाच्या एका प्राध्यापिकेचा लेख वाचनात आला. सदर प्राध्यापिका नायजेरियन राजकारणात पारंगत आहे, असे लेखाखाली म्हटले आहे.

एका गाण्याची गोष्ट

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 22/06/2012 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
रॉन फेअर आता काहीसा दडपणाखाली येऊ लागला होता. म्हंटलं तर तो तसा काही दडपण घेणारा माणूस नव्हता, नव्हे त्याची वृत्तीच तशी नव्हती. रॉन एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ध्वनि-मुद्रण अभियंता होता. संगीताची दुनिया, त्याने अगदी लहानपणापासून पाहिलेली. त्याच्या आजोबांनी राहत्या गावात एक छोटेखानी रेडियो स्टेशनच सुरू केलेलं. वयाच्या दोन अडीच वर्षाचा असल्यापासून रॉन मायक्रोफोनच्या अवती भवती गाणी गात खेळत असे. त्याची संगीतामधली आवड त्याच्या पालकांनी चांगली जोपासली. त्याच्यासाठी उत्तमोत्तम संगीत शिक्षक नेमून त्यांनी त्याच्या संगीत विषयक जाणीवा रुंदावल्या होत्या.

मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याची काळजी घ्या!!

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 22/06/2012 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, डिस्क्लेमरः प्रेषक किंवा त्याचे कुटुंब स्वतः कोणत्याही आजाराचा बळी नाही, उगाच कल्पनाविस्तार नको. आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनमानात आपले शरीर आणि मन सुदृढ रहाण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे वाटते. शरीरस्वास्थ्यासाठी हजारो औषधे असली तरी त्यापासून दूर कसे रहाता येईल हे जास्त महत्वाचे. मानसिक विकारांसाठी ईतरांची गरज लागते, आपल्या आजुबाजुच्या लोकांची काळजी घ्या.

प्रभू मास्तरांचे अभिनंदन

लेखक सरपंच यांनी शुक्रवार, 22/06/2012 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव सुरू झालं आणि इथे अनेक लोक येऊ लागले. त्यातले काही अगदी शांतपणे इथे राहू लागले तर काहींनी अल्पावधीत स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले. आमचे प्रभू मास्तर ऊर्फ विनायक प्रभू हे त्यातलेच एक भन्नाट व्यक्तिमत्व. (http://www.misalpav.com/user/1235/guestbook) इथे आल्यावर त्यांच्या क्रिप्टिक बोलण्यामुळे चक्रावला नाही असा एकही सदस्य नसेल. पण आज प्रभू मास्तर हे स्वतःच एक इन्स्टिट्युशन होऊन बसले आहेत. अनेक क्षेत्रांची जाण असलेला पण मन खर्‍या अर्थाने शिक्षण क्षेत्रात रमणारा हा कलंदर माणूस.

पैसा

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 22/06/2012 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास; श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास? स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील.

नेत्यांना शिक्षणाची अट हवी का?

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 22/06/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपण अनेकदा ऐकतो की अशिक्षित मंत्र्यांमुळे पुढार्‍यांमुळे देशाचे कसे वाट्टोळे झाले आहे. आमदार, खासदार यांना निवडणूकीला उभे रहाण्यासाठी शिक्षणाची अट कशी आवश्यक आहे वगैरे वगैरे. आता आपण काही आजी-माजी मंत्र्यांच्या/आमदारांचे/खासदारांचे/नेत्यांचे शिक्षण बघुया डॉ. मनमोहन सिंग (माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, सध्या पंतप्रधान):अर्थशास्त्रात बॅचलर आनि मग मास्टर्स (संपूर्ण कारकिर्दीत प्रथम क्रमांक). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट अटल बिहारी वाजपेयी: (माजी पंतप्रधान, माजी परराष्ट्र मंत्री): एम. ए. शरद पवार: बी.

तीट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 22/06/2012 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
तनुवेलीवर यौवन फुलले, पाहुनिया तुज हे जग भुलले, हरले! सगळे प्रयत्न हरले ! सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला, शिकावी कुठे कलंदर कला ? नुकती सरली वर्षे सोळा ज्वानीचा ह्या नूर निराळा... भाव कसा मग असेल भोळा? नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥ सावळकांती, आखिव बांधा, चालीमधला झोक न साधा, मदनालाही होइल बाधा तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥ पदराआडुन हसते काही, बघणार्‍या मग भानच नाही, तुझाच तो होउनिया राही संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥ मनी तुझ्या जे काही दडले, ओठ सांगताना अवघडले, ते न इथे कोणाला कळले. ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥ - चैतन्य दीक्षित
काव्यरस