Skip to main content

गंधार घेतले तू

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 27/06/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू आईस रडवण्याचे, आभार घेतले तू वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू मातीत वेदना ही, का उगवते अजूनी झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू - संध्या
काव्यरस

फेसबुकवर ज्ञानाचं थिल्लरीकरण!

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 27/06/2012 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकवरची संस्कृती ही स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी आहे. कुठलेही गंभीर प्रश्न इथे हाताळले जात नाहीत. इथल्या सुमारे ९८ टक्के लोकांना चांगलं वाचावं , संगीताचा आस्वाद घ्यावा , चर्चा करावी असे वाटत नाही. इथे ज्ञानाचं थिल्लरीकरण चालतं , अशा शब्दांत प्रख्यात आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी फेसबुक संस्कृतीवर टीका केली आहे. अधिक माहिती - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14420186.cms १) वरील आक्षेप तसेच सदर लेखात आलेले मुद्दे तुम्हाला मान्य आहेत का? असल्यास तुम्ही काय उपाय सुचवता?

वाडा

लेखक पेशवा यांनी बुधवार, 27/06/2012 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वाड्यांच्या दारावरील सायकलींच्या ढिगासारखे एकात एक गुंतून पडलेले विचार घेऊन बसलो आहे... अर्गोनोमिक साहित्य लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या 'मान द्या (नाहीतर कापून घेईन)' अशा जाड अक्षरांनी पार वाकलेल्या नवी कल्पना निसर्गत:च वस्त्रविरहित की बघितल्यावर विसरता विसरत नाही शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फॉन्ट अशावेळी कधीही सापडत नाही... वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान डोक्यात उघडून बसलो आहे आजची जाहिरात - ' लाज वापरून झाली असेल तर आणून द्या टॅक्स मध्ये सूट किंवा लंगोटी तरी मिळवा ' हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला तुम्ही वापरलेलं हसणं; पुन्हा वापरलंत? जुन्या वाड्याच्या अंगणांसारखं का

असा आमचा गाव

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 27/06/2012 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ्पाव मंड्ळी, नमस्कार आमच्या गावाला यायचे का ? आता पुण्यातल्या काही गावांची नावे पहा - पण , पण हसु नका १)हडपसर - काय पसर ?

किंकर सेन्सेई

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 26/06/2012 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक लोकांशी आपल्या ओळखी होतात, भेटीगाठी होतात. त्यापैकी काही खास व्यक्तींशी झालेली भेट ही आपल्या मागल्या जन्माच्या पुण्यसंचितामुळेच झाल्याची जाणीव होते. तर काही जणांशी आपली भेट होणे किंबहुना 'गाठ' पडणे हा दैवी संकेत वा ईश्वरी संकेत असतो. त्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यावर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. अंधारात चाचपडताना अचानक त्यांच्या रूपाने एक प्रकाशाची तिरीप येते आणि अंधार विरून आयुष्य एका वेगळ्याच प्रकारे दृष्टिगोचर होते.

आर्थिक अराजकता

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 26/06/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
'स्टँडर्ड व पुअर्स' या जगातील सर्वात मोठय़ा पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन निगेटिव्हमध्ये घटवून 'भारत हा गुंतवणूक करण्यायोग्य देश नाही' असा शिक्का मारला आहे. 'मूडी' या संस्थेने मात्र थोडासा दिलासा देत 'भारतीय अर्थव्यवस्था फार वाईट स्थितीत नाही' असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांवर संयुक्त पुरोगामी आघाडीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवून कळस चढविला आहे. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे देश आर्थिक अराजकतेच्या मार्गावर उभा असून आर्थिक सुधारणांच्या रुतून बसलेल्या गाडीला धक्का देणे फार गरजेचे आहे. भारताचा विकासदर ९.५ टक्क्याहून(मार्च २००७) घसरून आता ५.३ टक्क्यावर(मार्च २०१२) आला आहे.

बोगदा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बोगद्यामध्ये कितीही अंधार असला तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच एकाबाजूने येणारा अन् दुसर्‍याबाजुने जाणारा . मी बर्‍याचदा जाणार्‍या उजेडाकडे उभा राहतो विरुद्ध दिशेला . येणार्‍या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही न करकरता बिनविरोध चालू आहे . पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता . बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन् डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड" या दोघांना ओलांडून येणारा अनुभवाची शाल पांघरलेला "जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही? |- मिसळलेला काव्यप्रेम
काव्यरस

शाळा व त्यांचे अजब निर्णय

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्स मंडळी, मागील वर्षी माझ्या मुलीला मी ठाण्यातील एका प्रतिथयश शाळेत के.जी त प्रवेश घेवून दिला. नुकतेच सिनीयर के.जी. चे वर्ग सुरु झाले. या शाळेत मुलांना रोजच्या डब्यात काय द्यायचे याचे नियम आहेत ( आजकाल हा प्रकार सगळी कडेच असतो म्हणे, असो. त्याला काही हरकत नाही.) त्यानुसार प्रत्येक दिवसासाठी काही पदार्थ ठरवलेले आहेत. त्यात, सोमवारसाठी "इडली/डोसा" असा मेन्यु आहे. काल माझ्या बायकोनी सकाळी ६:३० ला उठून, खपून तिच्यासाठी मसाला इडली केली आणि डब्यात दिली. संध्याकाळी तिने विचारले मुलीला "बाळा, इडली आवडली कां?" तर तिचे उत्तर ऐकून मी तीन ताड उडालोच.

राजर्षी शाहू महाराज

लेखक अजातशत्रु यांनी मंगळवार, 26/06/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
लोक कल्याणकारी,आरक्षणाचे जनक,बहुजनांचे प्रेरणास्थान रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १३८ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्य, कर्तुत्व, क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!