Skip to main content

प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 20/04/2012 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत. "माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले. 'मग, विस्तव पेटणार का पाच?' "हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे.

पोळीचा लाडू

लेखक पूनम ब यांनी शुक्रवार, 20/04/2012 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य ४-५ पोळ्या (शिळ्या पोळ्या) १/२ कप खिसलेला गुळ २ टेबल स्पून तूप ३ टेबल स्पून दूध ५-६ बदाम १/२ टीस्पून वेलची पूड पोळ्या चे तुकडे करून घ्यावे आणि ते तव्या वर कमी आचेवर भाजून घ्यावे किंवा ओव्हन मध्ये २५० डिग्री फ वरती २० मिनिट बेक करावे आणि थंड

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

लेखक रमताराम यांनी शुक्रवार, 20/04/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच.

एक विनंती

लेखक राजो यांनी शुक्रवार, 20/04/2012 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाव चा नियमित वाचक आहे. इथले साहित्य खरंच अत्यंत वाचनीय असते. काही लेखक आपले लेख एकापेक्षा अधिक भागांमध्ये प्रकाशित करतात. हे भाग प्रकाशित होण्यास काही दिवसांचा/आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. नवीन वाचकांना आधीचे भाग शोधण्यासाठी सर्व साहित्य धुंडाळावे लागते. (इथे हे खेदाने नमूद करू इच्छितो कि मिपाचे सर्च अतिशय unreliable आहे) काही लेखक लेखाच्या नवीन भागामध्ये आधीच्या सर्व भागांचे दुवे देतातही (त्यासाठी त्यांना दुवा देतो :) ) तर नवीन लेख प्रकाशित करण्याआधी अशी काही सोय करण्यात येउ शकते का? (i.e.

पर्यटन आणि मी.

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 20/04/2012 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, मी विनोद बाणखेले , राहणार मंचर ,तालुका -आंबेगाव, जिल्हा- पुणे, सध्या सायबर कॅफे चालवतोय, कामाच्या व्यापामुळे गेले दोन महिने मी माझ्या कुटुंबियांना कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकलो नाही , मंचरच्या जवळ भरपूर ठिकाणे आहेत जसे भीमाशंकर , आहुपे , भोरगिरी, ओझर ,लेण्याद्री, शिवनेरी ,चावंड, जीवधन ,नाणेघाट,दार्याघाट, माणिकडोह, निमगिरी, हडसर,नारायणगड,माळशेज घाट , हरिश्चंद्रगड ,खोडद ,गिरवली, पिंपळगाव ,मोराची चिंचोली, पारुंढे , आणे,चास कमान एक न दोन अनेक. माझ्या परिवाराला मी सोबत नसताना अगदी काळजी काट्याने आपल्या घरातील लोक असल्या सारखे सांभाळून व्यवस्थित मा

स्पंदन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/04/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
एकांत; क्षणाच्या भवती क्षण; उभा जणू की सवती द्वय पाश; लटकती नाती मन अस्थिर झोक्यावरती वाटे जग सारे हलते पण तिथेच स्थित ते असते फांदीवर गोत ऋणांचे मातीवर पाउल नसते पेटत्या अजून मशाली वार्‍यावर प्रतिमा झुलते कधि दूर दूरचे दिसते हृदयी स्पंदन काहुरते ..........................अज्ञात
काव्यरस

रोज म रे त्याला कोण रडे

लेखक लीलाधर यांनी शुक्रवार, 20/04/2012 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
मध्य रेल्वेवर झालेल्या फायर ब्लॉकची घटना ताजी असतांनाच काल एक गंभीर घटना घडून आली. बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी प्रवाशांनी खच्चून भरली होती. आणि नाहूर, भांडुप स्थानकांदरम्यान सिग्नलच्या खांबाला जी शिडी होती त्यावर मेंटेनन्ससाटी उभे राहण्याचा जो भाग होता तो थोडा झुकलेला होता त्यामुळे दाराबाहेर किंवा दारावर जे प्रवासी उभे राहून प्रवास करत होते त्यांची ह्या भागाला धडक लागून अपघात घडला आणि त्यातल्या तीन जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. सिग्नल यंत्रणेत होणार्र्या वारंवार बिघाडामुळे प्रवासी संतप्त तर आहेतच शिवाय अपघातही घडून येत आहेत.

व्यर्थ शब्द

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 20/04/2012 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
व्यर्थ जाळले शब्द धुरात त्यांच्या चुरचुरले नाही डोळे अंधार दिला भाड्याने अशा चेहऱ्यावर मिणमिणत्या खिडक्या... (म्हणे) व्यर्थ आहेत शब्द ज्याला सुराची साथ नाही मस्तवाल रसिकतेला त्यांच्या विषाचा तिरकट दात आहे.... सजवायला ? बघा दुसरे शब्द ना माझे गुलाबचंदी अघोर साधनेत ह्यांच्या काळिजे कोवळी कटणार आहेत व्यर्थ तुमची भीक माझ्या हात काटलेल्या शब्दांना संगमरवरी ताज त्यांनी केव्हाच बांधला आहे. ---- पुर्वप्रकाशित

कोकोनट मार्बल केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 20/04/2012 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १-३/४ वाटी मैदा १ वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस (डेसीकेटेड कोकोनट) १ वाटी साखर १/२ वाटी बटर (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे) २ अंडी (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे) १-१/२ वाटी दूध २ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टीस्पून खायचा / बेकिंग सोडा १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स २-३ थेंब खायचा गुलाबी रंग २-३ टेस्पून कोको पावडर

आर्त

लेखक सागरलहरी यांनी शुक्रवार, 20/04/2012 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
चांदव्याचे प्रीत गाणे ऐकता नभ रंगते | कुणी येथे विरहिणी अन वाट त्याची पाहते || .... क्षितीज पार सांज धून सूर अनवट छेडते | अंतरात कुणी माझ्या जीव गोंदून ठेवते || आर्त माझ्या मन्मनीचे सख्या तुला समजेल का | विरह व्याकूळ वेदनेचा अर्थ तुज उमगेल का || सांडते घरदार मागे सोडते जनरीत ही | अंतरीची संगिनी मज सांग तू करशील का || --सागर लहरी