Skip to main content

मी निघालो हो कळफलक घेऊन..

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 18/04/2012 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी निघालो हो कळफलक घेऊन हो रस्त्यावर हो मार्गावर ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. देवालाच माहिती नक्की कोणती कविता होती जे न देखे मध्ये भावानुवाद करून घेतला एक संस्थळ आले मी काथ्या पण कुटून घेतला.. त्या संस्थळावर मला ती भेटली तिला पाहून माझी सटकली तिच्या कवितेत लैला दिसली मी मजनू बनून आलो रसग्रहण करून आलो सगळ्या निंदा आणि नालस्त्या मी फाट्यावरती मारून आलो ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. मग एकदा संपादक आला धाग्यावरती काठ मारून गेला काय माहिती कोण होता मला मात्र कंपूबाज वाटला मी अन्यायाला वाचा फोडली अजून एक जिलबी पाडली जिलबीने पुन्हा युद्ध पेटली ओ काही संस्थळ आली..
काव्यरस

अंधारात जाता जाता उगीच

लेखक वडा खालचा वडा यांनी बुधवार, 18/04/2012 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात जाता जाता उगीच प्रकाशाकडे तिरकस पणे पाहावे | मी तुझीच आहे रे "राजा " असे म्हणून दुसर्या सोबतच निघून जावे || मोरया .....
काव्यरस

दिसला गं बाई दिसला!

लेखक अन्नू यांनी मंगळवार, 17/04/2012 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
(जगदीश खेबूडकर यांची मनस्वी क्षमा मागून.) दिसला गं बाई दिसला महीला मुक्ती (क्रांती) सॉंग स्पेशल प्रथम, गाण्याची चाल नीट समजण्यासाठी ते ओरिजनल गाणे येथे पहा व ऐकून घ्या.
काव्यरस

कोकणस्थ माणूस मागे का...

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 17/04/2012 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट, आमचे काका मिलिटरीमधून निवृत्ती घेउन कोकणातल्या आपल्या गावी जाऊन राहीले. परिस्थिती अशी की बसून खाणे शक्य कारण अनेक आंबे फणस काजु कोकमाच्या स्वतःच्या बागा. पण स्वस्थ बसवेना... घराच्या पुढील बाजूस एक छोटंसं दुकान टाकलं. गिर्‍हाइक येऊ लागलं... लोकांच्या अपेक्षा वाढू लागल्या मग दुकानात अधिक वस्तु ठेवणे सुरु झाले. दुध, आइस्क्रीम, कोल्ड ड्रींक सार्‍याच्या एजन्सी घेतल्या. हे एका बाजूला पण तिथल्या स्थानिक लोकांचं वागणं अजब. शक्यतो काही काम सांगितलं की चेहेरा वाकडा.

मिपाकरांची वारी: शिवतीर्थ रायगडावर

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 17/04/2012 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
शिवतीर्थ रायगडवारीची बीजे ३ महिन्यांपूर्वीच रोवली गेली होती. पुण्याहून मी आणि मोदक निघालो ते सकाळी ६.३० च्या पिंपरी चिंचवड-दापोली एसटी बसने. स्वारगेटला धनाजीराव आणि प्यारे त्याच बसमध्ये आम्हांस येऊन मिळाले. वप्याला ऐनवेळी हापिसात काम निघाल्यामुळे येता आले नाही. भरपूर गप्पा टप्पा करतच ११.३० च्या सुमारास महाडमध्ये पोहोचलो.

लग्नाचा घोळ ...एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!

लेखक प्राध्यापक यांनी मंगळवार, 17/04/2012 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाचा घोळ ...एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १ (आदरणीय यक्कू यांची माफी मागुन....) .. एक लग्न होउन सुरळीत संसार चालु असताना दुसर्‍या लग्नाची दुर्बुध्दी झाली,आणी दुसरे लग्न केले.(झक मारली अनं दुसरं लग्न केल..

नकार

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 17/04/2012 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नकार तू, तू मला जन्म दे तुझ्या शिवाय कोण झेलेल हा प्रसव कल्लोळ? अन तुझ्याशिवाय कोण करेल हा अट्टाहास?

<<<ठेल्याचा घोळ - एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!>>>

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 17/04/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक डेअरीचा व्यवसाय नीट सुरु असतानाही मी डेअरीच्या ठिकाणीच पान सुपारीचा ठेला स्थापित केला होता. (झक मारलीन ठेला सुरु केला असं झालंय, कारण पैसे देऊनही ठेल्याचं अधिकृत लायसन्स मिळू शकत नाहीय ) त्यात धंद्याच्या जागेत पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही व्यवसाय व्यवस्थित चालू होते. पण गेल्या काही दिवसात ठेल्यावरच्या गांज्याने गोंधळ झाला , आणि त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी धाड पड्ल्यानं ठेला आणि डेअरी पण बंद करावी लागली. आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक माननीय (पक्षी एजन्ट, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि मनपा नि पोलिस ठेसनासमोर अनुष्टाणाला बसवला.

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.