खूप दिवस मनात होते नॉर्थ कॅरोलिना झू पहायला जाउया, पिल्लूला पण मजा येईल झू पहायला. पण हिवाळ्यामुळे थांबावं लागत होतं. खूप थंडी ,बोचरं वारं आणि लहान दिवस यामुळं इतके दिवस हा बेत पुढे ढकलला जात होता.पण एप्रिलमध्ये टेंपरेचर चांगल सुधारू लागलं, पारा वर चढू लागला आणि दिवसही छान मोठा होत गेला. मग वेदर पाहिलं आणि एकदा ठरवलं की या विकांताला झू पहायचं.
झू ची साइट पाहिली. अगदी सविस्तर माहिती दिली होती. इथलं हे आवडतं आपल्याला.