Skip to main content

देखणी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 01/03/2012 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
नवी पालवी अन नवे अंतराणे जुन्या ओळखीचे नवे तेच गाणे उराशी किती भोवले पाहुणे हे गळाले आता जीर्ण शीण दीनवाणे पुन्हा पाखरे आळवीती तराणे जरेल्या तरूंचे उभरले कणे साद घाली कुणी देइ आमंत्रणे बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे मनाची कुपी उलगडी आवरणे गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे देखणी सुप्तशी उंबराची फुले अमृताच्या सरी द्वैत पारायणे .......................अज्ञात
काव्यरस

अमृतानुभव

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 01/03/2012 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशित) स्प्रिंग फेस्टचा पहिला दिवस. सकाळपासूनच विविध वर्कशॉप्सची रेलचेल होती. सकाळी काही कुठे गेलो नव्हतो; पण संध्याकाळी मात्र "अनुभव"(फ्युजन संगीत मैफल) ला जायचेच असे ठरवले होते. दुपारी कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो. कॉन्सर्टला पंडित विश्वमोहन भट येणार असल्याने त्याला माझ्या लेखी विशेष महत्त्व होते. संध्याकाळी ५ वाजता असणारी कॉन्सर्ट ६ वाजता चालू झाली. प्रचंड मोठ्ठी रांग बघून मला आत जायला मिळेल की नाही याची चिंता लागली होती. रांगेतच एक मित्र गाठ पडल्याने रांगेत मध्येच घुसणे शक्य झाले.

एक संध्याकाळ "संतूर"लेली

लेखक जयवी यांनी गुरुवार, 01/03/2012 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ..... कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !! संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर.... ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल ..... ? मंचावर ७४ वर्षे वयाचा अतिशय देखणा तरुण ..... आपल्या सुरांनी समोर जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तरुणाई अजून वेगळी काय असेल ? कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले शिवाकुमारजी आपल्या आदबशीर बोलण्यानं मैफिलीची सुरवात करतात. फक्त कान नाही तर डोळे सुद्धा आसुसून वाट बघायला लागतात. काय पेश करणार आहेत ते छानपैकी समजावून सांगतात.

संत्र्याची खीर / कमलालेबु खीर (बंगाली पा़कृ)

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 29/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ लिटर दूध ४ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी - जास्त) २ छोटी संत्री १ टीस्पून वेलचीपूड १/२ टीस्पून केशर सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप . पाकृ: प्रथम दूध एका नॉन-स्टीक भांड्यात तापवायला ठेवावे. दूधाला एक उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटु द्यावे.

मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा.

लेखक कोल्हापुरवाले यांनी बुधवार, 29/02/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा. दोन ऑप्शन आहेत १ . Sony Cybershot DSC-H70 Point & Shoot . ( किंमत ९८०० ) २. Nikon Coolpix L120 Point & Shoot ( किंमत १३,५३२ ) या दोन्ही पैकी कोणता घ्यावा? फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा. किमती मधील फरक सांगू नये .. :) खूप कन्फ्युज राव..... सल्याची नितांत गरज !!!

चालुक्यांची बदामी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 29/02/2012 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
बदामी. हंपी, ऐहोळे, बदामी इत्यादी ठिकाणांची मधे जे फोटो काढले ते आत्ता टाकत आहे. लिनाबाईंचे आभार मानायला पाहिजे कारण मी हे फोटो विसरलो होतो. बरेच आहेत पण त्यातील काही निवडकच टाकतो नाहीतर खूपच पाने भरतील. दुसरे म्हणजे यात इतिहास अजिबात लिहीत नाही कारण मग लेख नेहमीप्रमाणे “क्रमश:” करावा लागेल. सध्या मुसोलिनी पूर्ण करायचे असल्यामुळे तो मोह टाळला आहे. :-) गेल्या गेल्या हा गुलाबीसर रंगाचा दगड नजरेत भरतो.

पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?

लेखक सागर यांनी बुधवार, 29/02/2012 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात? खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना? तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे? अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल. तर आपल्या आवडत्या बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात आणि तेही सर्व माध्यमांतील (मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, इत्यादी) उपलब्ध करुन दिलेली आहेत. आहे की नाही मज्जा? :) येथे टिचकवा आणि हवी ती शाळेतील पुस्तके उतरवून घ्या मी सध्या आठवीचे बालभारती वाचतो आहे ;) तुम्ही???