आशियाड बसेसबद्दल काही
रामदाससरांचा हा लेख वाचला. मागे मी एसटी पुराण हा लेख लिहीला होता. त्यात प्रस्तूत लेखात आलेले मुद्दे विस्ताराने कधीतरी लिहीण्याची मनिषा व्यक्त केली होती. हा लेख प्रतिसाद म्हणून तेथेच टाकणार होतो पण प्रस्तूत लेख अन रामदाससरांचा लेख यांचा विषय वेगळा असल्याने हा लेख वेगळा म्हणून लिहीत आहे. असो.
राज्य परिवहन महामंडळ सार्या राज्यात सेवा देते. केवळ पुणे मुंबई म्हणजेच महाराष्ट्र नाही. ग्रामिण भागात अजूनही लाल बसेचच धावतात. तेथे सुखकर प्रवासाची अपेक्षा नसली तरी प्रवास हा गरजेचा असतो.
मिसळपाव