वसई किल्ला, मिपाकरांसोबत
वसई किल्ला- तीन्ही बाजूंनी पाणी व जमिनीवरून चिंचोळा रस्ता अशी याची रचना. मूळ मराठी सरदाराने उभारलेला व पुढे गुजराथच्या सुलतानाच्या ताब्यात आलेला व त्यापुढे पोर्तुगीजांनी बळकावलेला व त्याची भक्कम पुनर्बांधणी केलेला एक अभेद्य दुर्ग. पुढे चिमाजीअप्पांच्या अतुलनीय शौर्याने हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.
रविवार करावे लागणारे हापिसचे काम ऐनवेळी पुढे ढकलेले गेल्यामुळे माझा मुंबई प्रवासाचा मार्ग सुकर झाला व मी आणि मोदक पिंपरीला भल्या सकाळी सिंहगड एक्सप्रेस मध्ये चढलो, सूड पुण्याहून बसलेलाच होता. तिघांच्या मस्त गप्पा रंगल्या. सूड बदलापूरला जाऊन ठाण्याला आम्हाला जॉईन होणार होता.
मिसळपाव