लेखकअविनाशकुलकर्णीयांनी रविवार, 08/01/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
माननिय शिवसेना प्रमुखांची मुलाखत वाचताना या हे मुद्दे लक्ष वेधुन घेतात ....
प्रश्णास उत्तर देताना ते म्हणतात...
दूषित? दूषित हवेमुळे सगळेच त्रस्त आहेत.
- इतर सगळे त्रस्त आहेत. पण मी त्रस्त नाही, तर व्यस्त आहे. या सगळ्यांचं काय
होणार? शेवट काय होणार? इतका हा देश नासवलाय सगळ्यांनी. विशेष करून कॉंग्रेसने.
भयानक केलंय. म्हणजे त्याला काही अर्थच नाही. म्हणून मी नेहमीच सांगत असतो
की, आपण अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. केव्हाही काही तोंड फुटेल. मग हे
सारं निस्तरणार कोण? हा प्रश्न तुमच्यासमोर येईल.
- असं का वाटतं?
- का वाटतं म्हणजे? तुम्हीच पहा काय चाललंय.
लेखकपियुशायांनी रविवार, 08/01/2012 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार
सांबर
साहित्य :
तुरीची डाळ १ वाटी.
२ छोटी वांगी .( काप )
१ बटाटा ( काप )
१ शेवग्याची शेंग .( तुकडे करून )
२ कांदे चिरून
२ टोमॅटो चिरून
चिंचेचा कोळ १ चमचा.
लेखकप्रचेतसयांनी रविवार, 08/01/2012 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या
मित्र हो,
चितळेबंधू मिठाईवाले आपणास माहीतच आहेत. त्यांच्याबद्दल आपण अनेकदा वाचले आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू सादर करत आहे.
दरवर्षी अनेकवेळा तुम्ही चितळेबंधूंकडे मिठाई आणायला जाता, अर्थात दुपारी १ ते ४ ही वेळ टाळून कारण ही वेळ त्यांच्या झोपेची असते. सणांच्या दिवशी तुम्ही तर अधिकच गर्दी करता, २०११ च्या दिवाळीत मात्र चितळ्यांकडे लांबच लांब रांग लागली होती. पार पंचक्रोशीतून लोक गर्दी करत होते.
लेखकमराठमोळायांनी रविवार, 08/01/2012 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
मराठी शिर्षक सुचले नाही म्हणून ईंग्रजीमधेच लिहिले त्याबद्दल माफी असावी.
काल एका क्लिष्ट विषयावर चर्चा पाहिली आणि त्याबददल इथे लिहावसं, चर्चा करावीशी वाटली.
सध्या हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि केवळ उच्चभ्रू/अतिश्रिमंत समाजाशी निगडीत न रहाता सर्वसामान्यांच्या घरात देखील घुसू पाह्तो आहे. हा मुद्दा विवाहित, अविवाहित लग्नाळू मुला-मुलींचे पालक या सर्वांनाच लागू होतो. आजकाल घटस्फोटांचे वाढते प्रमाण आपण पहातोच आहे. त्याचप्रमाणे लग्न न करणार्यांची संख्या देखील झपाट्याने वाढते आहे.
लेखकशशिकांत ओकयांनी शनिवार, 07/01/2012 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो,
पुज्य चितळेबाबांच्या गिरनारची यात्रा आपण वाचलीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सादर करत आहे.
दरवर्षी चितळेबाबा आमच्याकडे गणेशोत्सवात आरास व मुर्तीच्या दर्शनाला येतात. २०११ मधील उत्सवात, त्यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्याच सजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते.
लेखकविदेशयांनी शनिवार, 07/01/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: बाई माझी, करंगळी मोडली)
ऐन दुपारी, नमुना फेरी,
गाडी नवी काढली - काढली
बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ ||
झणी मारून मी कट वळताना
कुठून अचानक आला श्वान हा
गुपचुप येऊन, पाठीमागून
माझी साडी ओढली || बाई माझी ...
समोर भुंके कसा आडवा
पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा
मी ओरडले, तिथेच पडले,
उठताना मोडली || बाई माझी ...
लेखकगणपायांनी शनिवार, 07/01/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच.
या भाताच्या जोडीला येते ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी).
थोडक्यात सांगायच तर जेलोफ राईस म्हणजे आपला टॉमेटो राईसच पण किंचीत बदल.