Skip to main content

मराठी शब्दकोश कुठला घ्यावा? आणि काही शब्दार्थ विचारणा.

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 05/01/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, 'मराठी-मराठी ' चांगला शब्दकोश कोणी सुचवू शकेल काय? तुम्ही वापरला असल्यास कृपया आपले अनुभव जरूर सांगा. मी अ.ब.चौकात चौकशी केली होती खूप दिवस आधी - अनमोल चा उपलब्ध होता पण सांगण्यात आले की दुसरा कुठला तरी एक चांगला(प्रमाण म्हणता येईल असा) शब्दकोश आहे पण सध्या तो उपलब्ध नाही (out of print). काही शब्द इथे देत आहे, जाणकारांनी अर्थ सांगितल्यास बरे होईल :) - परवाचा : मला वाटते ह्याचा अर्थ श्लोकासारखे काही जे दिवेलागणी वेळी म्हटले जाते असा असावा. - नेणीव: अंतर्मनाशी जवळ जाणारा अर्थ असावा असे वाटतं.

मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!!

लेखक फिझा यांनी गुरुवार, 05/01/2012 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!! उधाणलेल्या समुद्राला सावरायचंय कोसळणाऱ्या पावसालाही झेलायचंय सूर्याचा रंग पांघरून स्वताला पाहायचंय कुणाचा निरोप तर कुणाचा आधार व्हायचंय किनाऱ्या.....मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!!

विश्वासघात करतो माणूस ना मुळी तो !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 05/01/2012 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस तोच माना, बोले विचार करुनी बोले जसा मुखाने चालून दाखवी जो - मदतीस धावुनी ये नात्यासही जपूनी सर्वांस आदरून मैत्रीस मानतो जो ! वेळेवरी स्तुतीला निर्व्याज कौतुकाला मागेपुढे न पाही, करि ना कधी ठणाणा - निंदा करी न कधिही अपशब्द बोलतो ना माणूस संगतीला सत्पात्र तोचि जाणा ! माणूस तो न माना व्यसनात गुंतला जो व्यसनात राहुनीया इतरांस ओढतो तो - अवसानघात करि जो मातापिता सख्याचा हक्कास फक्त जाणी, कर्तव्य टाळतो तो ! नात्यास आणु पाहे गोत्यात जी लबाडी तोंडावरीच गोडी पाठीवरी चहाडी - राहूनिया कृतघ्न निंदा सदा करी जो विश्वासघात करतो माणूस ना मुळी तो !

संशयकल्लोळ...सल्ला हवा आहे.

लेखक भिकापाटील यांनी गुरुवार, 05/01/2012 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मैत्रिणींनो, काकांनो, मावश्यांनो, आजी-आजोबाणो आणि इतर सर्वांनो, वरील सर्वांस हाय हॅल्लो, नमस्कार, दंडवत इ इ.. तर मला सल्ला हवा आहे. माझी बायको फार म्हणजे फारच संशयी वृत्तीची स्त्री आहे. ती नेहमी माझ्यावर उठसुट संशय घेत असते. माझ्या कार्यालयातील कोण्या स्त्री सहकार्याचा फोन आल्यास 'ही' माझ्याजवळ येउन प्राण काणात गोळा करुन सगळे बोळने ऐकते. नंतर त्यातील एखाद्या वाक्यावरुन मला फैलावर घेते. घराशेजारील कुणी स्त्री माझ्याशी बोलली अथवा माझे तिच्याशी बोलणे झाले तर 'ही' लगेच भांडते. इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही. रात्रंदिवस तीच्या मस्तकात संशयकल्लोळ झाला आहे.

काही किस्से...

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 05/01/2012 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या 'शब्दगाऽऽरवा २०११' मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतो आहे. माणूस हा किस्सेबाज असतो. त्याला किस्से ऐकायला, सांगायला फार आवडते. अरे हो, पण ते किस्से झाल्याशिवाय कसे ऐकणार, सांगणार? मग ते किस्से करणे हेही त्याचे आवडते काम बनले. असंख्य किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही किस्से आपण घडताना प्रत्यक्ष पाहतो.

अमेरिकेतील मराठी लोकांची राहणी

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 04/01/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील मराठी लोकांची राहणी ... अमेरिकेत असलेली मराठी तिकडे कशीकाय राहतात, काय काय करतात, त्यांना सुरुवातीला वा नंतरही काय काय अडचणी येतात वा येऊ शकतात, तिकडील श्वेत व अश्वेत लोकांशी कसे आणि कितपत संबंध जुळतात ? तिकडे रहाताना काय सावधगिरी बाळगावे लागते ? तिकडील लोकांच्या सवयी व आवडीनिवडी, खाणेपिणे, घरे, सण-उत्सव, वगैरे वगैरे विषयी माहिती (मराठी माणसाच्या दृष्टीतून) जालावर उपलब्ध आहे का ?

खरपूस आणि झणझणीत पेरी पेरी चिकन

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 04/01/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा या दालनात पाऊल टाकतोय कारण हा पदार्थ सर्वांनी (मांसाहारी लोकांनी) एकदा चाखावा असा आहे म्हणून. या चिकनच्या विविध रेसिपी उपलब्ध आहेत. सानिका आणि गणपा यांच्या पाकृंसमोर ही पाकृ जरा प्रेझेंटेशन आणि तपशील मधे मार खाईल यात वाद नाही. :) तर मग घ्या साहित्य. २ टे.स्पून पेरी पेरी सॉस ( मी तयार आणला होता, घरी करावयाचा झाल्यास कृती ही इथे ) २ मोठे चमचे लिंबाचा रस १ चमचा आलं पेस्ट २ चमचे लसूण पेस्ट १/२ कप लोणी मीठ चवीनुसार १/२ किलो चिकन .