Skip to main content

प्रेम कळत नाहि मला....

लेखक निश यांनी बुधवार, 04/01/2012 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कस कराव हे खरच कळत नाहि मला म्हणुन तर येता जाता प्रेमाचा देखावा करणार हे जग ढ म्हणत मला..... कारण.... मी कधिच करत नाहि तिला चंद्र सुर्य तारे आणुन देईन म्हणुन वादे, अन नाहि सांगत माळिन केसात तुझ्या गजरा म्हणुन मोतियाचे दाणे... मि कधिच नाहि दाखवत तिला खोटी आशा सोन्याने सजवायचि देत नाहि सतत खोट वचन ति खुश बघावि म्हणुन जिव देण्याचि..... मि देत असतो तिला सतत एक विश्वास नेहमि देईन साथ सुख आणि दुखात. सुख असेल तेव्हा आनंद देइनच पण जेव्हा असेल खुप दुख तेव्हा काळजि घेइन खरच तुझि जिवापाड.... तिच्यावर येणार प्रत्येक आघात झेलिन माझ्यावर सतत करुन तिच्या आणि फक्त तिच्या सुखाचि आस. देणार नाहि अं

सुचना + चर्चा = आमंत्रण कट्ट्याचं

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 04/01/2012 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप. येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे.

अशी गाणी पाठवा.

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 03/01/2012 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक चित्रपटात मानवी शरिरांच्या विविध अवयवांवरून गाणी लिहिली गेली आहेत,मित्रानो चित्रपट म्हटला कि दिल शब्द असलेले गाणे त्यात हमखास असते.दिल वगळता ईतर अवयवांवरून लिहिलेली गाणी आपण शेअर करुया .हिंदी, मराठी दोन्ही भाषा चालतील. आपल्या मराठी गाण्यावरून सुरुवात करतो.या गाण्यात डोळे अवयव आला आहे. डोळे कशासाठी ? कशासाठी ? तुला साठवून मिटून घेण्यासाठी

डाळ/दाल मखनी

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 03/01/2012 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य: १ वाटी अख्खे काळे उडीद+ २ टेस्पून राजमा रात्री भिजवून, सकाळी कुकरला थोडे मीठ घालून शिजवून घेणे. १ कांदा बारीक चिरलेला २ टोमॅटोची प्युरे १ टेस्पून आले+लसूण पेस्ट १ टीस्पून जीरे २ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून धणेपूड १ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार २ टेस्पून साजूक तूप ३-४ टेस्पून क्रीम

मॅच

लेखक चाफा यांनी मंगळवार, 03/01/2012 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या सहामाहीत आपण पुण्याच्या टीम बरोबर मॅच घेतोय" सकाळच्या प्लॅनिंग मीटिंग नावाच्या टाईमपास सेशनमधे बॉसनं तोफ डागली. " आँ " " कसली ?" आणि काहीश्या चमत्कारिक आवाजात प्रतिक्रिया उमटल्या " आपण येत्या सहामाहीत पुण्यातल्या कंपनीच्या टीम बरोबर क्रिकेटची मॅच घेणार आहोत " बॉसच्या या निवेदनावर आमच्या गोटात उत्साह सळसळला. " मॅच स्टेडियमवर असेल, किमान पन्नास ओव्हर्सची आणि सीझन बॉलवर खेळायची आहे " उत्साह आणखी वाढला " आपल्याला ट्रेनिंग द्यायला एक प्रशिक्षक बोलावला आहे तो परवा येईल, त्याच्या बरोबर रोज किमान दोन तास सराव करणं गरजेचं आहे " उत्साह चरमसीमेला भिडला. " पण ते ऑफीसअवर्स नंतर " उत्साहावर पाणी पडल

कां वागतो माणूस असा?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 03/01/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कां वागतो माणूस असा? कां नाही जगत माणूस म्हणून? . आयुष्यभर सावल्यांशी खेळतो, सावल्यांमध्येच रमतो सगळीच आंधळी कोशिंबीर, सावलीचा संसार सावलीशीच लख्ख सूर्यासारखे सत्य डावलून सावलीचा आभास आपलासा करतो कां? कां वागतो माणूस असा? सत्य तरी किती खरे, कुणास ठाऊक!! कुठेतरी मनात साठवलेले काही क्षण हे कां सत्य? कातड्याच्या डोळ्यांनी पाहिलेले, अन मांसाच्या कानाने ऐकलेले हे जर सत्य तर मग प्रत्येक माणूस "हरिश्चंद्र" कां नाही? उगाचं काही माणसे सत्य शोधण्यात आयुष्य वाया कां घालवतात? त्यांच्या आयुष्याचे हे सत्य त्यांना कळत कां नाही!! कां?
काव्यरस

ती .....

लेखक फिझा यांनी मंगळवार, 03/01/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
ती ..... जमलेच होते तिला मस्त जगायला आखून दिलेल्या चौकटीत मुक्त फिरायला खंत नव्हती कसली आभाळ तिचेच होते दोरी असली तरीही, पतंगाचे रंग तिचेच होते ..... होईलच पहाट वाट बघुनी होईलच सकाळ मग रंग भरुनी आकाश कधी झोपते का असे विचारायची उगीचच हसून हसून मग रडायची ...... जमलेच होते तिला हसायला आणि खोटे खोटे रुसायला संगतीला बरेच होते पण .. साथ कुणाचीच नव्हती जगायला........ पतंग असूनही पक्षासारखी उडायची दुरूनच मग क्षितीज पहायची जगण्यासाठी धडपड नसायची तिची हसण्यासाठी मात्र ......कारणे शोधायची ती....... हातात येईपर्यंत प्रत्येक गोष्ट निसटायची हट्ट नव्हता कसलाच, पण तगमग मात्र व

कळसुबाई नळीच्या वाटेने

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 03/01/2012 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
कळसुबाईला बारी गावाच्या व्यतिरिक्त आणखी दोन वाटांनी जाता येत अशी माहिती होती, बरेच दिवस जाण्याचा विचार देखील होता पण योग काही जुळुन येत न्हवता. शेवटी नाक्य़ाच्या मुलांनी ३१ डिसेंबरला मज्जा करण्यासाठी भंडारद-याला एम.टी.डी.सी.त जाण्याच नक्की केलं, २० जणांच बुकींग सुध्दा झालं, आणि आम्ही सुध्दा एका दगडात दोन पक्शी होतील म्हणुन कळसुबाई नळीच्या वाटेने आणि नंतर भंडारदरा असा बेत नक्की केला. नाक्याची काही मुलं तर ३० तारखेला दुपारीच एम.टी.डी.सी.त थडकले, ऊगीच चांगल्य़ा (?) कामाला ऊशीर नको.

सर आले दुरुनी

लेखक विदेश यांनी मंगळवार, 03/01/2012 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
(चालः स्वर आले दुरुनी ) सर आले दुरुनी गेल्या सगळ्या त्या मैतरणी || खुर्चीत उसासे साऱ्यांचे होस्टेलमधील त्या पोरांचे कुजबुजही नव्हती पोरींची धुसफुसही नव्हती कोणाची ऐशा रमलेल्या त्या स्थानी || वर्गात मनोरथ किति रचले गालावर हासू पाघळले काही हृदयातचि ते घुसले बाणांतुनी स्पंदन जाणवले झेली सुंदर मैत्रीण कुणी || प्रतिसाद सरांचा तो न कळे अवसान परी का पूर्ण गळे संधीच न मिळता पोरांचे घबराट पुन्हा सर ते दिसले चहाडी चुगली का केली कुणी || (पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)