Skip to main content

कविता पुर्ण करुन हवी आहे...

लेखक धन्या यांनी बुधवार, 28/09/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. कसं काय बरं हाय ना? काही नाही हो, जरा एक कविता लिहित होतो. छ्या. तुमचं आपलं काहीतरीच. फक्त दहा वीस टक्के कवींनाच कविता स्फुरते. बाकीचे कविता पाडतात. आम्हीही या रटरट कवींपैकीच. म्हणजे र ला र आणि ट ला ट जुळवून कविता पाडणारे. कुणा थोरामोठयाने आमच्यासारख्या कवींना यमक्या कवी म्हणून उचित सन्मान केला आहे. काय म्हणता, रामदास की मोरोपंत यापैकी कुणीतरी ते म्हटलंय? जाउ द्या हो. इथे चावडीवर एकापेक्षा एक अभ्यासू लोकं आहेत. संदर्भ चुकला तर उगाच आपली पुजा बांधून आनंद शिंदेची रेकॉर्ड वाजवायचे. तुम्हाला चालेल का अशी द्विअर्थी गाणी वाजवून चावडीची प्रतिमा खालावलेली? अच्छा ते होय?

(आणखी एक) सर्वपित्रि पेश्शल ... नरकभेट !

लेखक मस्तानी यांनी बुधवार, 28/09/2011 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
जर मी तुम्हाला सांगितल की "एकदा किनई आम्ही नरकात गेलो होतो" तर तुम्ही नक्कीच मला 'भूतबाधा झालेली दिसतेय हिला' किंवा 'सर्वपित्रिचा परिणाम काय हो' किंवा तत्सम काहीतरी म्हणाल. पण जरा थांबा, मी अगदी खर तेच सांगते आहे. हा बघा पुरावा ... http://www.hell2u.com/ गेले काही दिवस इथे भूतांविषयी 'चर्चा' चालू आहे ती वाचताना आठवण झाली तीन वर्षांपूर्वी जिथे भेट दिली होती अशा एका छोट्याश्या जागेची.

एक दिवस पंक्चरलेला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/09/2011 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस पंक्चरलेला
गेलेल्या रविवारच्या दिवसाची ही सत्यकथा आहे. रविवार म्हणजे सुट्टी वैगेरे काही नाही. कारण मला साप्ताहीक सुटी शनिवारची असते. सध्या रात्रपाळी असल्याने रविवारी रात्री कामाला ११ वाजता जायचे होते. कालची सुटी असल्याने आदल्या रात्री झोप झालेली होती. त्यामुळे रविवारच्या सकाळी लवकर उठलो. रुग्णालयात भरती झालेले एक जवळच्या नातेवाईकांना दुपारी रजा देणार असल्याने त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जायचे होते. कालपासून मुलगा 'सायकलमध्ये हवा भरून आणा' 'सायकलमध्ये हवा भरून आणा' अशी भुणभुण करत होता.

हळूच तू मला पाहीलेले

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/09/2011 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच तू मला पाहीलेले
हळूच तू मला पाहीलेले मी तुला पाहीले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||धृ|| कधीतरी ओळखीचे हासू पाहीले तुझ्या ओठी नकळत स्मित माझे आले त्याच्या उत्तररासाठी कळले का रे तेव्हा हृदयात काही झाले? नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||१|| पुस्तके देता घेता थरथरती भेट झाली अलवार स्पर्श होता काटा फुले शरीरी प्रित पुष्पे अशी कितीतरी मी मनी माळले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||२|| ठेवले वहीत मी पिंपळपान आठवांचे बघ ते आता झाले बदलून जाळीचे तेवढेच जून झाले प्रेम पहील
काव्यरस

गुरूत्वाकर्षण नव्हे, कर्मविपाकातून अधःपतन

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 28/09/2011 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच वाचलेल्या एका संशोधनानुसार गुरूत्वाकर्षण हे खरे बल नसून ते सर्वव्यापी परमेश्वराने निर्माण केलेले कर्मविपाकामुळे होणारे अधःपतन असते. शाळांमधे भौतिकशास्त्र, उत्क्रांती, अणूरासायनिक प्रक्रिया इत्यादी पाश्चात्य विज्ञान शिकवावे का नाही यावरून चर्चा सुरू असताना, कांदा संस्थानाच्या माजी संस्थानिकांच्या देणगीतून सुरू असणार्‍या संशोधनसंस्थेतील पदार्थविज्ञानिक आचार्य दीपांकर भिर्टाचारजी यांनी त्यांच्या या नव्या 'कर्मविपाकामुळे अधःपतन' या संशोधनाची माहिती दिली.

७) एका खेळियाने - "युनायटेड" वुई स्टॅन्ड

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 27/09/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच आमच्या पराचं "भन्नाट" वाचत होतो... सु.शि. म्हणजे आधीच आपला वीक पॉईंट. त्यात पराच्या कन्सेप्टनीच डोक्याला शॉट दिला. दारा, मंदार, फिरोज आणि अमर विश्वास एकत्र?? एकेकाच्या "परा"क्रमाच्या कथा वाचताना सुद्धा भान हरपायला होतं. आणि हिथंतर पराभाऊ काय सांगून राहिले? दाराची अमानवी ताकद, अमरचं अफाट डोकं, मंदारचा स्मार्टनेस आणि फिरोजचं बैदुल एकत्र?? "अब्ब आयेगा मजा"। हे म्हणजे एका बाजूनी मॅक्ग्रा, दुसर्‍या बाजूनी वॉर्न, मागे गिलख्रिस्ट आणि स्लिप्समध्ये पाँटिंग झालं की राव ! च्यायला....

विद्यार्थ्यांची पटपडताळणी आणि कार्यवाही किती योग्य आहे ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 27/09/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटपडताळणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सध्या सुरु आहे. शाळेत बोगस पटसंख्या दाखवून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटणार्‍या शिक्षणसंस्थांचा शोध घेतला जाणार आहे. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, केवळ नावाला संस्था आणि त्यांच्या शाळा आहेत. नावाला केवळ शिक्षक आहेत. आणि शासनाचे कोट्यवधी रुपये या शाळांवर खर्च होत आहे. विद्यार्थी नसतांना शाळेवर प्रचंड खर्च करावा लागतो, असे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे पट्पडताळ्णीची मोहीम सुरु करण्यात आली आहे.

व्वा! क्या बात!

लेखक मन यांनी मंगळवार, 27/09/2011 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच "हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने" हे http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY इथे पूर्ण ऐकलं. मूळचा मी राहणारा औरंगाबादचा. जुनं औरंगाबाद म्हणजे धाकटं हैद्राबादच म्हणता येइल. निजामाची मराठवाडा प्रांताची राजधानी. नवीन औरंगाबाद मध्ये राहिलो तरी तिथली ती खास मोगलाइ ष्टाइल, नवाबी कारभार ह्याचं थोडं थोडं दर्शनही झालच; . पण ती तिथली खास अशी वाटणारी मुसलमानी भाषा, त्या त्यांच्या टपर्‍यांवर लागलेल्या वेगवेगळ्या कव्वाल्या.... पुण्यात पोटापाण्यासाठी आल्यापासून कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं.