"पेरेण्टस का इन-लॉज"
कंपनीत आत्ता अर्ध्या तासापूर्वी एक चांगली बातमी मिळाली. आत्तापर्यन्त आम्हाला ग्रूप मेडिक्लेम पॉलिसी मधे फक्त जोडीदार आणि मुले यांचाच अंतर्भाव करता यायचा मात्र त्यात आता पालकांचाही समावेश करता येईल. ही बातमी ऐकल्या ऐकल्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे "पेरेण्टस का इन-लॉज".
माझे आई-वडिल आणि सासरे (सासूबाई नाहियेत) तिघेही स्वावलंबी आहेत. दोन्ही "पालक संचांना" समाविष्ट करता येणार नाहीए त्यामुळे आता मला या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत ना॑हिए.
म्हणून मी आपल्या सूज्ञ मिपाकरांना मदत मागावी असा विचार केला. आता तुम्ही सांगा मी कुणाला समाविष्ट करावे?
मिसळपाव