३२ रुपये आहेत मग तुम्ही गरीब नाही
तुमच्या खिशात ३२ रुपये असतील तर तुम्ही गरीब नाहीत, असा आपल्या सरकारचा म्हणाना आहे . आयोगाच्या मते, देशातील शहरात राहणारी व्यक्ती ३२ रुपयांत तर ग्रामीण भागातील व्यक्ती २६ रुपयांत सहज एका दिवसाची गुजराण करू शकतो.
पूर्ण हिशोब केला असता शहरात राहणार्या एका माणसाला एका महिन्याच्या खर्चासाठी ९६५ रुपये पुरेसे आहेत. ग्रामीण भागात असाल, तर खर्च ७८१ रुपये इतका होऊ शकतो.
मिसळपाव
अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता.