Skip to main content

प्रिय मित्र...!गणपती बाप्पा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 19/09/2011 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली आपली घट्ट दोस्ती होऊन नाव तर ऐकून होतो नवसाला पावतोस म्हणून मग अचानक ओळख झाली ७ -८ वर्षाचा होतो तेव्हापासून तेव्हाच तुला मी मित्र केला परीक्षेच्या दिवशी तुला नमस्कार केला नि पेपर मला सोपा गेला शप्पत ...! हे अगदी खरे सांगतोय बाप्पा तुला ...! अगदी मनापासून...
काव्यरस

माझ्या वाचक मित्रांनो....................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 18/09/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचक मित्रांनो व मैत्रिणींनो, मी दोन महिने वाचनमात्र राहणार आहे. हिटलरच्या सेनापती व मंत्र्यांबद्दल मी लिहायचे कबूल केले होते ते जरा मागे पडणार आहे. मला आशा आहे आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा कराल व माझ्या पुढील लेखनाची वाट बघाल. पुढील भाग असे असतील - ( दोन महिन्यांनंतर) अल्बर्ट स्पीअर पूर्ण करायचे अंदाजे ५ भाग अजून. हाईन्झ गुडेरिअन मुसोलिनी. मी हे लिहिणार हे निश्चित ! कारण हा माझा आणि आपला आवडता विषय आहे. अर्थात मधेच मी माझ्या छायाचित्रांचे धागे टाकीनच म्हणजे मी जिवंत आहे हे ही आपल्याला कळेल. :-) आपला, वाट चुकणारा, परंतू परत वाटेवर येणारा, जयंत कुलकर्णी.

पाठीवरले बिर्‍हाड

लेखक चित्रा यांनी रविवार, 18/09/2011 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/19173 येथून पुढे नगरीजनांचे काय झाले ते पुढच्या काही काव्यसदृश पंक्तींमध्ये. मागील शैलीशी काही संबंध नाही.

देवळातला शंकर

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/09/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा शंकर देवळात कान उघडुन बसला भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन खुदकन मनात हसला भं...भोले..ही अरोळी खरोखरच छप्परतोड कुणाच्या मनाची जखम तर कुणाचा नुसताच फोड माझ्याकडे येणारे असेच कुणी शांत,कुणी भेदरलेले आयुष्याच्या कलहात कुणी मिटलेले,कुणी विटलेले होते काहो ती अरोळी.. जीवनरोगाचे औषध? का थोड्या वेळाचं मलम नी शेवटी नुसतीच खदखद तुंम्ही म्हणाल या खेरीज दुसरा जालीम उपाय काय? का तुंम्हीही अमच्यासारखेच..? समस्या आली...की बाय बाय मी तुम्हाला सांगेन...की मीही तुमच्यातलाच आहे फार पूर्वी माणुस होतो अता मात्र 'देव' आहे मोडुन टाका ते देऊळ अणी मुक्त करा मला माझा आधार..कशाला? एकमेकांचा घेऊ...चला..! पुरे झालं म

कल्पनेतली ती

लेखक पुष्कर यांनी रविवार, 18/09/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या कल्पने जाहली खल्बली अन् नजर ती तुझी मखमली काहिशी तुला पाहता वाहता शीतळी अन् - तरी जाहली काहिली ही अशी तुझी सावली पावली मावली अन् पुढे धावली कावली ती किती मला अंगणी पाहुनी थांबली अन् क्षणार्धात ती होतसे चोरटी तुझ्या दर्शनाला नभी चंद्रयाने किती सांग मी तेथ धाडायची? तुझा चेहरा चंद्र नसला तरीही तुझ्या भोवती तीच हिंडायची कशाला फुकाची कुणाच्या मनाची भिती किल्मिषांची उरी घ्यायची? खुली रंगवू या आकाशात नक्षी गुजे सावकाशीत सांगायची

श्लील अश्लील

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 18/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्लील अश्लील जन्मताक्षणी मी आईला विचारलं माते माझा जन्म श्लील की अश्लील माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील ते एकरवानं उद्गारले अश्लील अश्लील

जुन्या वस्तू

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 18/09/2011 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच लोकाना वापरलेल्या जुन्या वस्तू विकत घेण्यास आवडतात.. तर काही लोकांना ते फारसे पटत नाही..जुन्या वस्तूत मूळ मालकाच्या वासना अडकलेल्या असतात अशी एक समजूत आहे. त्याचा फटका सेकंड ओनरला बसू शकतो, विशेषतः वाहन आणि वास्तू या दोन गोष्टी जुन्या / वापरलेल्या असू नयेत असा सर्वसामान्य संकेत असतो.

भारताचे भावी पंतप्रधान...

लेखक कोदरकर यांनी रविवार, 18/09/2011 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो सध्या एक चर्चा आपल्या देशात रुजत आहे ती म्हणजे कोण असेल भारताचा भावी पंतप्रधान... राहुल गांधी चा तो जन्मसिध्द अधिकार आहे असे देशाला समजविले जात आहे आणि बहुतांश लोक हे ग्राह्य मानतात .. निदान सत्ताधारी नेते हाच विचार करत असावेत की अजुन ५ वर्ष मंत्री पद राहुल राहुल करत उप भोगावे.. जन्मसिध्द अधिकार या व्यतिरिक्त बाकी लायकी वादग्रस्त असुनही... त्यातुन च नरेन्द्र मोदी यांचे नाव ही काही जन वजनदार मानतात.. त्यांच्या मागे एक राज्य व्यवस्थित संभाळण्याचा अनुभव आणि प्रशासनावरील मजबुत पकड हा जमेचा भाग.. आज देशाला असलेली मजबुत नेत्याची गरज पाहता..

जवसाची खमंग चटणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 18/09/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ वाटी जवस/ अळशी/ Flax Seeds १२-१५ कढीपत्ता ३ टीस्पून तीळ १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून जिरेपूड मीठ व साखर चवीपुरतं तेल . पा़कृ: पॅनमध्ये थोडया तेलात (साधारण १/२ टीस्पून) कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा. .