Skip to main content

'घुटे'

लेखक इष्टुर फाकडा यांनी बुधवार, 09/02/2011 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो... गेल सुमारे वर्षभर मी मिपावरच लेखन, पाककृती सगळ वाचतो आहे. आज पहिल्यांदाच काही लिहिण्याची (अशुद्ध मराठीत) हिम्मत करतो आहे. मिपावरच लेखन, प्रतिक्रिया या सगळ्या उच्च कोटीतल्या असल्याने पहिल्याच प्रयत्नात तस उंच काही लिहिता येईल अस नाही. पण बर्याच दिवसांपासूनचा किडा आज इतक मस्त (झणझणीत) जेवण झाल्यामुळे बाहेर पडू पाहत आहे. त्याला वाट द्या :) मी आज 'घुटे' या अस्सल मराठी (मावळी) आमटीच्या प्रकाराची पाककृती देत आहे. ही आमटी मी मिपावरच कधीतरी वाचली आहे पण हा फक्त (माझ्यादृष्टीने) पाककृतीत सांगून संपवायचा पदार्थ नाहीये, याला एक सुंदर गावाकडची पार्श्वभूमी आहे.

मेल्टिंग मोमेन्ट्स (कोकोनट कुकीज)

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 09/02/2011 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - १२० ग्रॅम बटर - १०० ग्रॅम साखर - ९० ग्रॅम अंडे - १/२ (पांढरे+बलक) व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन डेसिगेटेड कोकोनट - ५० ग्रॅम कृति : १. रुम temperature ला आलेले बटर व साखर एकत्र फेटुन घ्यावे. २. १/२ अंडे व्हॅनिला इसेन्स टाकुन फेटावे. ३. हे अंडे बटर व साखर मधे टाकुन मिक्स करावे. ४. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. ५. मैदा बटर मधे टाकुन त्याचा rubber spatula वापरुन गोळा करुन घ्यावा. ६. हा गोळा १५-२० मिनिटे फ्रिज मधे ठेवावा. ७. १५-२० मिनिटांनी गोळा बाहेर काढुन त्याचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत. ८.

केक करताना..

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 08/02/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
केक करणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे, मी आजवर अनेक केकृ येथे दिल्या (काही जणांची जळजळ होत असली तरी अजूनही केकृ देणार आहे, हे काही निरोपाचे भाषण नाहीये.. ) आणि त्यात काही शंका बर्‍याच लोकांनी बरेचदा विचारल्या असे लक्षात आले. उदा- मला केक करणे कसे जमेल? मायक्रोव्हेव मध्ये केक कसा करायचा? आमच्याकडे अवन नाही.. आम्ही अंडी खात नाही.. वाटी/चमचा/कप .. असे प्रमाण नाही का देता येणार? इ.इ.

स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 08/02/2011 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला. * किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या.

जोगवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 08/02/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती.

फुलपाखरु

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 08/02/2011 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवांचे फुलपाखरु: फुलपाखरु - गणपा भाऊ ने विशेष मदत करुनही मला येथे मीपा वर text format मध्ये हे फुलपाखरु व्यवस्थीत देता आले नाही, खाली मुळ text देतो आहे, माझ्या येथे जेंव्हा मी हे पोस्ट करतो तेंव्हा मराठी शब्द चौकोन म्हणुन दिसतात , बाकीच्यांकडे मधील स्पेस विस्कळीत होते. असो येथे देतो आहे, नीट नाही दिसले तर वरील इमेज नक्की दिसेन म्हणुन इमेज दिली आहे. text format:
मी                                       मी              

हस्तमुद्रा (तळहाताच्या रंगवलेल्या मुद्रा)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 08/02/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
From Mario
कलादालनामध्ये फक्त आपण निर्माण केलेल्या कलाकृती टाकण्याची परवनगी आहे म्हणून येथे या कलेचा उल्लेख करत आ

ब्रोकोली सुप

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 08/02/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ब्रोकोली - १ गड्डा Extra Virgin Olive Oil - ४-५ चमचे पाणी - ३-४ कप काळी मिरी पावडर - १ चमचा मिठ चवीनुसार चीज किंवा बटर सजवण्यासाठी कृती: १. पातेल्यामधे पाणी उकळुन घ्यावे. त्यात थोडे मिठ व ब्रोकोलीचे तुकडे करुन ५ मिनटे शिजवावे. २. मिक्सरचे ज्युस करायचे भांडे घेउन त्यात शिजवलेली ब्रोकोली, पातेल्यातील पाणी, मिठ, काळी मिरी पावडर व ऑलिव्ह ऑइल टाकुन गरम असतानाच एकदम बारीक सुपच्या consistency प्रमाणे वाटुन घ्यावे. ३. सुप serve करायच्या बाउल मधे कढावे. ४.

आंबेजोगाई देवळा शेजारील लेण्या

लेखक सुकामेवा यांनी मंगळवार, 08/02/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस माहूर च्या देवीच्या दर्शनासाठी जायचे ठरवले होते, मी मित्राला विचारले आणि २७ जानेवारीला सकाळी निघायचे ठरवले. जाता जाता आंबेजोगाईला दर्शनासाठी थांबलो होतो, तेव्हां मित्र म्हणाला देवाशेजारी चांगल्या लेण्या आहेत त्या बघायच्या असतील तर जाऊयात फ़क़्त तिथे जायचा रस्ता थोडा घाणीतून पार करावा लागतो. आम्ही हो म्हणाल्यावर त्यांनी वाट दाखवली मग आम्ही अडथळ्यांची शर्यत पार करून लेण्यांपाशी पोहचलो. तिथे लेण्यांम्ध्ये स्वछ्ता तर अप्रतिमच होती. त्यातीलच काही काढलेली छायाचित्रे सर्व मिपा परिवारातील मित्रांकारिता. एक छोटी लेणी रस्त्याच्या बाजुलाच आहे त्यातला हत्तीचे छायाचित्र