Skip to main content

मोबाईल फोन

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 18/01/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
त्या गावांत चौघेजण चौघांकडेही मोबाईल फोन वेगवेगळे हॅण्डसेट, अन् वेगवेगळे रिंगटोन कायम कामात असतात ते त्यात फारसा 'चेंज' नाही एकाच गावात असूनसुध्दा भेटण्यासाठी 'रेंज' नाही बोलतात, भेटतात फोनवरच एसेमेसमधून पडते गाठ "हाय.. हॅलो .. कसं काय" (हे फोनलादेखील झालंय पाठ) एके दिवशी एकजण वैतागूनच गेला फार गप्पा मारु, भेटू तरी काहीतरी करु यार त्याने मग सगळ्यांना एके दिवशी एसेमेस केले दिवस ठरवला, रानात गेले फोनसुध्दा फेकून दिले गप्पा झाल्या, खूप हिंडले, हसले, खेळले, खूप रडले, वेळाचेही नव्हते भान मजा केली त्यांनी छान. . . . . . . . . . . . . . . . . .

[आघात ] : एक उल्लेखनीय प्रयत्न

लेखक पारा यांनी मंगळवार, 18/01/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच विक्रम जोशी दिग्दर्शित 'आघात' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो.

पांढरा हत्ती

लेखक असहकार यांनी मंगळवार, 18/01/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा हत्ती म्हणजे काय रे भाऊ ? न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च ? का न झेपणार्‍या , न पटणार्‍या पण प्रवाहासोबत राहण्याकरता अंगीकारलेल्या सवयी ? का न झेपणारी, पण पटणारी पण प्रवाहाविरुध्द पोहण्याची धड्पड ? का मुल्यांशी केलेली तडजोड जी जीवाला बोचणी लावते ? --------------------------------------------------------------------------------------------------------------- ( मा़झा पहिला धागा) ---------------------------------------------------------------------------------------------------------------

आवर्तन.....

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 18/01/2011 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार. राधेची व्यक्तीरेखा मला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. जरी काव्य समजल तरी या व्यक्तीरेखेला त्या काव्यातही कुठेच पुर्णत्व वा 'न्याय' म्हणता येइल तो नाही मिळालेला अस मला मनापासुन वाटत. इतक जीव ओवाळुन टाकुन , सर्वस्वाला विसरुन केलेल्या प्रेमाला, पुढे कृष्णाच्या वाढत्या सामाजिक,राजकिय महत्वात अगदी नामोनिशाणी न राखता अनुल्लेखात विलीन व्हाव लागण हे एक दुर्दैवच नाही का? नुकताच प्राजुचा 'वनराणी....' वाचला. या शबरीच्या भोळ्या भक्तीवर भाळुन तिला पुढील जन्मी पुन्हा भेटण्याच आश्वासन श्रीरामानी दिले, तीच ही राधा! या वचनावर आधारित ही कविता.
काव्यरस

[खुलासा] एकोळी धागे

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 18/01/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एकोळी धाग्यांचे मिसळपावावर एवढे वावडे का आहे कळायला मार्ग नाही. एकोळी धागा अनेक कारणांनी निघू शकतो. - फेसबुक वर असलेल्या स्टेटस आणि लिंक च्या सुविधा या एकोळी धाग्यांशी साधर्म्य दाखवतात. त्याच धर्तीवर माझे एकोळी धागे असतात. यात फार मोठा अपराध आहे असे मला वाटत नाही. मिसळ्पाव हे फेसबुक नाही असा युक्तीवाद काहीजण करतील पण पुण्यात गाडी चालवायची ज्याना सवय आहे ते मुंबईत (सहसा) पुण्यासारखीच गाडी चालवतात आणि त्याउलट मुंबईत गाडी चालविणारे पुण्यात गोंधळून जातात. - फालतु चर्चा टाळायला कमीत कमी शब्दात माहिती शेअर करणे मला श्रेयस्कर वाटते.

वनराणी..२

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 18/01/2011 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी १ आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग? ********************** पुढे.. मी नुसतीच बघत राहिले त्यांच्याकडे. असं वाटतंय की मला माझा मार्ग मिळाला आहे. ती अज्ञात शक्ती म्हणजे हे मुनी तर नव्हेत!! आज.. हो आज..