Skip to main content

विकिचा दहावा वाढदिवस

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 16/01/2011 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
काल विकिपिडियाचा दहावा वाढदिवस जगभरात साजरा करण्यात आला. भारतात खुद्द मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी, पुणे, बंगळूरू, म्हैसूर, कोलकाता अशा नव्वदएक ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. त्यातल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग मला लाभला.

१३ वी रास...

लेखक नन्दादीप यांनी रविवार, 16/01/2011 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
१३ वी रास आल्याने प्रत्येकाच्या आधीच्या (जुन्या) राशी बदलल्या. आता प्रश्न असे की... १. राशी बदलल्या मुळे भविष्य पण बदलले का??? २. जर बदलते तर ललाट रेषांचे काय ? (म्हणजे लहान पणी ऐकल्याप्रमाणे नशीब्/भाग्य/ललाट रेषा कधीच बदलत नाहीत, जे नशीबात असत ते होत.) ३. जर भविष्य बदलत नसेल किंवा थोडेफार बदलत असेल तर "सर्व राशींचे भविष्य इकडून तिकडून सारखेच असते काय??? ४. या आधी १३वी रास का वगळली गेली?? (१३ क्रमांक अशुभ म्हणून?) ५. जर ती वगळली होती होती तर ती आत्ता परत का सामाविष्ट केली?

उंदीरमामा आणि मनीमावशी -

लेखक विदेश यांनी रविवार, 16/01/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी ! उंदीरमामा हसले मिशीत , टेबलावरती चढले खुषीत - फोन लावला कानाला जोरात लागले बोलायला - " उंदीरमामा मी इकडे ; कोण बोलतय हो तिकडे ? " - विचारले मामानी झटकन उत्तर आले की पटकन- " मी तुमची मनीमावशी, कालपासून आहे उपाशी ." - मनीमावशी भलती हुषार , टुणकन मामा बिळात पसार !!
काव्यरस

काव्यक्षण (कविता संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 16/01/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे. - निमिष न.

मदत पाहीजे....VOIP

लेखक नरेशकुमार यांनी रविवार, 16/01/2011 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नमस्कार ! मिपाकर ह्या भूतलावर सगळीकडे पसरलेले आहेत. याची पूर्ण जाण आहे. सर्व आपापल्या नातेवैकांशी कोणत्या न कोणत्या माध्यमातून संपर्कात असतातच. यासाठी मिपाकर कोणते माध्यम वापरतात याची माहिती हवी आहे. पुढील काळात पूर्वेला जसे चीन, जपान, थायलंड येथे कुटुंबासोबत कामानिमित्त दीड-दोन वर्षे वास्तव्य करण्यासे जाने होणार आहे. तिथून फिरतीवर असताना जर्मनी, फ्रांस, अमेरिका, आणि प्रिय आपुला देश येथील सर्व मित्रांशी संपर्कात कसे राहू याची गेले काही दिवस खूप चिंता वाटत आहे.

माणुस घडवलेली इव्हेंट

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 15/01/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही ठरवलं तरी त्यावर लिहीताच येत नाही.. डोक्यात येतं, ''साला, यावर लिहिलं पाहिजें" पण विचारांची आणि पेनाची एकत्र भेट टळत राहते ती कायमचीच.. '' माझी आजी, मी बघितलेलं हॉस्पिटलायजेशन" हे त्यातलेच काही विषय .. पोटातलं ओठावर आणताच येत नाही ,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .. असाच एक विषय म्हणजे ''नाटय महोत्सव''.. आम्ही केलेला एक इव्हेंट.. म्हटलं तर मोठा बदल वगैरे घडवणारा आणि म्हटल तर कोणालाही काहीही फरक पडत नाही असा फक्त आमचा आमच्यापुरता कार्यक्रम.. ते काहीही असो , या घटनेने मला मात्र खुप काही दिलं,शिकवल .

मटारच्या शेंगा

लेखक यकु यांनी शनिवार, 15/01/2011 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाककृती नाही. हा प्रकार मी पहिल्यांदा कुठे खाल्ला होता आठवत नाही; पण अत्यंत चविष्ट असतो. आणि करायला अत्यंत सोपा. हिवाळा संपताना मटारच्या शेंगा निबर होऊन बाजारात येणे बंद होईपर्यंत हा प्रकार सतत आमच्याकडे चालू असतो. या संकरीत मटार ऐवजी गावरान मटार जर मिळाली तर क्या कहने! साहित्य १. किलोभर मटारच्या शेंगा २. तेल दोन चमचे ३. मीठ सर्वप्रथम मटारच्या शेंगांची देठे काढून टाकावीत. फक्त हिरव्या असणार्याच शेंगा निवडाव्यात, निबर बाजूला काढाव्यात. या शेंगांमध्ये बिलकुल ओळखू न येणार्या हिरव्या आळ्या असू शकतात.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!... भोगीच्या दुसर्‍या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली! संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा! आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा.... हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका... स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-? पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम! "जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!