Skip to main content

आम्ही कविता करतो

लेखक असुर यांनी शुक्रवार, 14/01/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सरळ काही सुचत नाही एक वाक्य धड लिहीता येत नाही पण व्याकरणावर रण माजवतो सध्या आम्ही कविता करतो चार ओळी इकडून उचलून चार ओळी तिकडून उचलून तरीही वामनाचे आम्हीच वारस आम्हीदेखील कविता करतो कुणी वाचो, अथवा न वाचो कुणी निंदो, कुणी वंदो घंटा कुणाला फरक पडतो म्हणूनच आम्ही कविता करतो मदत, कौल, काथ्याकुटाचा आता जरी का कंटाळा आला वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो त्यासाठीच तर आम्ही कविता करतो कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य 'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो कवितेच्या खेळात या लेख जगती, लेख मरती चांगल्या
काव्यरस

[ज्योतिष] दिलगीरी

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 14/01/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अमावस्येवरील लेखात अनवधानाने अमावस्या सायन मिथुन राशीत आहे असा उल्लेख झाला आहे. कट न पेस्ट केलेला मजकूर नजरचूकीने पूर्ण संपादित झाला नाही. त्याबद्दल दिलगीर आहे. कुंभ रास बरोबर आहे. मिपा च्या नवीन अवतारात लेख संपादित कसा करायचा हे माहित नसल्याने ती चूक दूरूस्त करता आली नाही. त्याबद्दल क्षमस्व!

आपले काय मत ?

लेखक रोमना यांनी शुक्रवार, 14/01/2011 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मिपाकरांनो, सर्वप्रथम मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. साधारण १० ते १२ वर्षापासून काही धार्मिक साधना सुरु केली. नंतर मांसाहाराचे आकर्षण वाटेनासे झाले, पुढे कितीहि जन्म आले तरी मांस खायचे नाही हा निर्धार केला. म्हणून दिले सोडून. हे माहित असतानही कि मांसाहारातून सर्वात जास्त शक्ती, प्रथिने वगैरे मिळतात (घरचे सर्व मांसाहारी पण वार सण पाळून आहेत). परंतु आपण प्राण्याला मारुन खावे हे काही मनाला पटत नव्हते. यानिमित्ताने काही कट्टर मासभक्षक नातेवाईकांचा मी मांसाहाराकडे पुन्हा वळावे म्हणून प्रयत्न सुरु झाला.

[ज्योतिष] दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजीची अपघातदर्शक अमावस्या

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 14/01/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजी सायन मिथुन राशीत १३ अंश ५१ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी युती करते. मंगळ हर्षल बरोबर अर्धकेंद्र योग करत असल्याने अमावस्या प्रामुख्याने अपघातदर्शक बनली आहे. ज्या जन्म दिनांकाना ही अमावस्या विशेष त्रास देउ शकते त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत.

आमंत्रण सहलीचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे. काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे. साधारण प्लॅन असा आहे, १६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.

लखोबा लोखंडे हरपले!!!

लेखक निखिल देशपांडे यांनी गुरुवार, 13/01/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती.

आपण असं करु शकतो का?

लेखक चिगो यांनी गुरुवार, 13/01/2011 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... आज माझ्या आयुष्यातली पहीली परदेश वारी केली.. काही नाही हो, जरा भूटानला जाऊन परत आलो. (आसाममध्ये असल्याने ही मौज परवडते.) जेवढा पाहीला (फक्त दोन-तीन तास) तेवढ्यात हा भाग आवडला.
तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो असतांना तिथल्या बाथरुममधे गेलो. तिथे आत भिंतीवर एका छोट्याच्या लॅमिनेटेड पानावर "एच.आय.व्ही आणि एड्स"ची माहीती दिलेली होती.

उभ्या उभ्या विनोदः कॅन्सास सिटी आणि आल्बनी (न्यू यॉर्क)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 13/01/2011 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर ! येत्या शनिवारी (दि. १५ जानेवारी २०११) संध्याकाळी आम्ही 'उभ्या उभ्या विनोद' (अर्थात मराठीत 'स्टँड अप कॉमेडी'!) 'कॅन्सास सिटी - कॅन्सास' इथे सादर करत आहोत. त्याचप्रमाणे शनिवार (दि. ५ फेब्रुवारी २०११) ह्या दिवशी आम्ही 'आल्बनी - न्यू यॉर्क' इथे हा कार्यक्रम सादर करणार आहोत. कॅन्सास सिटी आणि आसपासचा भाग तसेच आल्बनी आणि आसपासचा भाग इथे राहणारे कुणी मिपाकर असतील आणि ते कार्यक्रमाला येणार असतील तर भेटायला नक्की आवडेल. कार्यक्रमाची वेळ इ. अधिक माहितीसाठी कृपया त्या भागातील मराठी मंडळांना संपर्क साधावा.

मकरसंक्रांती पेश्शल - प्पत्तंग उडवीत होते..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/01/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. तीळगुळ घ्या अन् ग्वाड बोला..! मकरसंक्रांती दाराशी उभी आहे. या दिवसाचं आणि पतंग उडवण्याचं काही वेगळंच नातं. खास करून अहमदाबाद आदी गुज्जू शहरात याचं खास महत्व. त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात कमी.

काय असते कविता ?

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 13/01/2011 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य मग ..शब्द काय आहेत ? बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्‍या ..दुसरे काय .. आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..? अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन..? की मनात काहीच नाही म्हनुन विचार करणारे एक चलन ? काहीच कळत नाही... भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ? की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ? अस असेल तर काय असत मग .. वृत्त ..लय .. मुक्तछंद.. ? मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़टलय .. या नियमात का नाही कळल मला.. आयुष्य .. अन आयुष्याची कविता...?