Skip to main content

गाजर सूप

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 17/01/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बाजारात उत्तम गाजरे आहेत, सारखी कोशिंबिर किती करणार? आणि फिल्मी गाजर का हलवा सुध्दा वजन आणि साखरेला मारकच ना.. म्हणून आमच्या सुझानची खासियत हे गाजर सूप- साहित्य- ५-६ मध्यम गाजरे, १ लहान कांदा, २ पेरं आल्याचा तुकडा, ३-४ मिरे, २ लवंगा, दालचिनीची एक मोठी काडी,ड्राय बेसल लिव्ह्ज,मीठ कृती- गाजरांची सालं काढा. मोठे तुकडे करा. कांदा सालं काढून अर्धा करा. गाजराचे तुकडे आणि कांदा एका मोठ्या उभट पातेल्यात किवा कुकरात घ्या. त्यात आले,मिरी,दालचिनी,लवंगा इ. सर्व मसाला घाला आणि उकडा. हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या किवा हँड ब्लेंडरने घोटा. दाट, रवाळ पल्प तयार होईल. गरजेनुसार गरम पाणी घाला.

करायला गेलो एक आणि..

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 17/01/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा विकांत हा नेहमी स्पेशल असतो (कसला डोंबलाचा स्पेशल काय माहीत ? पण आपल ते स्पेशल आण दुसर्‍याच ते ... असो असे म्हणायची पध्दत आहे ) तर, या शुक्रवारी, मी सुरुवात केली तीच मुळात रात्री नउ वाजता (तेच ते आयटी वाल्यांच सुप्रसिध्द कारण ). घरी भाजी नव्हती आणि भाज्यांची दुकाने बंद !! जाताना आमच नेहमीच राशनवालं खोपड उघड दिसलं आणि त्यात दोन ढब्बु मिरच्या दिसल्या .म्हटल शेंगदाण्याचा कुट घालुन ढब्बु मिरची अगदीच काही वाइट लागत नाही. पण विकांत म्हणजे स्पेश्शलच पाहिजे . आणि घरी आल्यावर मी जे काही केले ते कागदावर उतरवत आहे.

तुमचे शोकेसमध्ये ठेवल्यासारखे आयुष्य ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 17/01/2011 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
काल तुम्ही लांबून तुमची गाडी दाखविली म्हातार्याला काय मस्त रंग होता हो तिचा गाडीच नाव काय तुम्ही घेतले डोक्यावरून गेले बघां त्याच्या त्याला वाटले आपण पण फिरवावा जरासा हात तुमच्या नजरेत त्याच्या हाताची किमंत दिसली नि हिमंत नाय झाली बघा म्हातार्याची तिला कुरवाळायला... मायच्यान ..!! शेती करणारां म्हातारा आयुष्यभर तेच केले कसा लावणार तुमच्या गाडीला हात रस्त्यात तुम्हाला तुमचा मित्र भेटला तेव्हा तुम्हाला लई लाज वाटली डोळ्यात दिसत व्हतं पाक तुमच्या...
काव्यरस

भज्जी पार्टी

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/01/2011 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नव्हती तशी, हवा थंडगार होती सुर्याने कापसाची रजाई ओढली होती हवेच्या झुळूका गुदगुल्या करून जाती ग्लासांनी भज्यांची ऑर्डर सोडली होती नाकाने इकडेतिकडे पाहीले थोडे हुंगून पिणारे केव्हाचेच गेले होते रंगून पेय ओरडले भजी!

ह्या नंतरची कथा काय असावी ?

लेखक अभिसरिका यांनी रविवार, 16/01/2011 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांनो, धुवाधार पावसात अशीच सुचलेली ( अर्धवट, ) एका कथेची सुरवात.....जरा मदत कराल ? दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......

कायद्याचे पुस्तक आणि "copyright"

लेखक विश्नापा यांनी रविवार, 16/01/2011 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बाजारात मिळणारी कायद्याची पुस्तके विकत घेतो. त्या पुस्तकावर "copyright" हा लेखकाच्या नावे दिलेला असतो. माझे म्हणणे असे आहे की कायद्याचे कोणतेही पुस्तक हे मूळ "act"/code" चे सरळसरळ भाषान्तर असते. सर्व प्रकाशकान्नी छापलेल्या कायद्यावरील पुस्तकातील भाषा ही जवळ्जवळ सारखीच असते लेखक हा जितका निष्णात कायदे पण्डीत असेल्,तेवढ्या प्रमाणात "commentries" चे स्वरुप बदलु शकते .परन्तु आपण त्या अधिक महिती बद्दल पैसे देत असतो. कायदा हा "constitution"चा भाग असतो. लोकशाही मधे जनता ही सार्वभोम आहे. त्या मुळे कायद्याच्या पुस्तकान्चे "copyright" लेखकाच्या नावे नसावेत असे मला वाटते.

मसाला एग्स.. केसू स्टाईल

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 16/01/2011 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
८ जानेवारी पासून डायेट सुरू झाले (१ आठवड्यात एक पण केक घशाखाली उतरवला नाही.. खरच..वाढलेल्या वजनाची शप्पथ.. )त्यामुळे शीतकपाटातील पदार्थांची हालचाल मंद झाली, शीतकपाटात शिल्लक असलेली अंडी गेले २-३ दिवस सारखी वाकुल्या दाखवत होती.. शेवटी १५ जानेवारीला डायेटला १-२ दिवस विश्रांती द्यावी असा निर्णय मी आणि दिनेशनी एकमुखांने मंजूर केला.. आणि मसाला एग्स आणि ब्रेड बेत पक्का केला चला तर मग साहित्य लिहून घ्या..

देवा, येऊ देत आता अजून एक विमान...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 16/01/2011 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
देवा परमेश्वरा, आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..! देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..! ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्‍याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत. माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत.. आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..! याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा..! त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!