Skip to main content

मराठी रॅप ...

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 28/09/2010 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तु-नळी वर "मराठी रॅप" बघायला मिळाला. Colors चॅनल वर "India's Got Talent" मधे प्रदिप काशीकर हा पोरगा लय भारी मराठी रॅप गातो. http://www.youtube.com/results?search_query=pradip+kashikar&aq=f सोनाली, साजिद (जज्ज) यांना त्याचा परफॉर्मन्स खूप अवडला. आता चर्चेचा मुद्दा: पण किरण खेर (तिसरी जज्ज) ने मात्र त्याच्या "भाषेवर" टीका केली. तिच्या प्रमाणे, प्रदीप ने मुंबईय्या-हिन्दि भाषेत रॅप केला असता तर "आम्हाला पण" कळला असता. आम्ही म्हणजे साजिद आणि ती !! (साजिद खान ला मराठी कळते ..) तुमच काय म्हणणे आहे ?

भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्र

लेखक नितिन थत्ते यांनी मंगळवार, 28/09/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच विकास यांच्या "गोईंग फॉरवर्ड" या धाग्यावर जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्यानिमित्ताने इंजिनिअरिंगच्या व्यवसायाविषयी आणि शिक्षणा*विषयीचे माझ्या मनात आलेले फुटकळ विचार. इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अ‍ॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही.

संधी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/09/2010 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला नाही वाटत, की मी कधी कुणाच्या उपयोगी पडेन ! पण मिळालीच मला संधी पाय घालून पाडण्याची कुणाला तर मात्र ... मी नक्की पाडेन त्याला कारण ..... एवढं तरी केलं पाहिजे आपण कुणासाठी तरी असं नेहमी वाटतं मला एक माणूस म्हणून.....!!

शर्यत

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 28/09/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमरचे डोळे ' रिसर्च टुडे 'मासिकामधल्या एका बातमीवर खिळले होते- जुलै २००७ उंदरांना जवळ जवळ ३५ कॉन्सन्ट्रेटेड बाटल्या खास द्राक्षासव पाजले की त्यांचे आयुष्य वाढते असे असे पाहणीत आढळले आहे. उंदरांची पाहणी केली असता त्या खास द्राक्षासवातील काही घटक विशेषतः 'लाइफसेवर ' हे आयुष्यमान वाढवण्यात सक्रिय असतात असे सुद्धा एका अभ्यासात आढळले आहे. या ओळी वाचूनच अमर थबकला. त्याच्यापेक्षा अधिक वेगाने कोणीतरी हाच धागा पकडून संशोधन करत होते तर...

माहिती तंत्रज्ञानातील धडाडीची ५ वर्षे

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 28/09/2010 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आताच ही दिव्य पाटी आमच्या मेल बॉक्स मध्ये ढकलपत्राद्वारे येउन पडली. ती तुम्हा मिपाकरांसमोर ठेवत आहे. धोरणात बसत नसल्यास उडवली तरी चालेल. अशी ही पाटी--

ओले अश्रू

लेखक स्वप्निल मन यांनी मंगळवार, 28/09/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधी येशील तू? मी तुझी वाट बघतोय आभाळ भरून आलंय ढगही गडगडताहेत माझ्या मनातला टाहो जणू तेच व्यक्त करताहेत बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय तु नाही आलीस तर लवकरच ते रडायला लागेल त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल पण मी रडणार नाही त्याला साथ देणार नाही आणि जर आलच रडायला तर सरळ पावसात भिजत राहीन कोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही कारण माझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं मला सहन होणार नाही
काव्यरस