मुंजा
"दोन चार दिवसाकरता सर्व बाजुला ठेव आणि जाउन ये.
पण करु काय तिकडे जाउन?
"माहीत असलेले काहीही करु नकोस. फक्त जा. जे होइल ते आत्तपर्यंत जे झाले त्यापेक्षा वेगळे असेल."
अरे बाबा, डोक्यावर ४ कलर ब्रोशर ची डिलीवरी आहे. ते सोडुन ३ दिवस....? एक्झिबिशन ची डेड लाइन आहे."
" विझ्युअलायझेशन झाले आहे ना?तु फायनल कॉपी ओके कर. प्रिंटींग मी बघुन घेतो. प्रेस ला अॅडवान्स दे म्हणजे ऐनवेळी नडणार नाहीत".
नंतर गेले तर चालणार नाही का?
"आठ दिवसानी बँगलोर. मग २५ डीसेंबर ला मुंबई. जाणार का तु बॅगलोर ला.?"
नको. च्यायला यायला जायला ३ दिवस. पण..
"आता पण बिण काहीही नाही. हे ठरले. आर्टीस्टला दोनशे रुपये जास्त दे.
मिसळपाव