Skip to main content

मुंजा

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/09/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
"दोन चार दिवसाकरता सर्व बाजुला ठेव आणि जाउन ये. पण करु काय तिकडे जाउन? "माहीत असलेले काहीही करु नकोस. फक्त जा. जे होइल ते आत्तपर्यंत जे झाले त्यापेक्षा वेगळे असेल." अरे बाबा, डोक्यावर ४ कलर ब्रोशर ची डिलीवरी आहे. ते सोडुन ३ दिवस....? एक्झिबिशन ची डेड लाइन आहे." " विझ्युअलायझेशन झाले आहे ना?तु फायनल कॉपी ओके कर. प्रिंटींग मी बघुन घेतो. प्रेस ला अ‍ॅडवान्स दे म्हणजे ऐनवेळी नडणार नाहीत". नंतर गेले तर चालणार नाही का? "आठ दिवसानी बँगलोर. मग २५ डीसेंबर ला मुंबई. जाणार का तु बॅगलोर ला.?" नको. च्यायला यायला जायला ३ दिवस. पण.. "आता पण बिण काहीही नाही. हे ठरले. आर्टीस्टला दोनशे रुपये जास्त दे.

कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 28/09/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन. मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच.

मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 28/09/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.

काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल  आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री

पुरुषांचा छळ आणि आत्महत्या : ताजी बातमी

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 28/09/2010 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषांचा छ्ळ किती होतो असा प्रश्न वारंवार विचारला जातो. सकाळ सारखी वृत्तपत्रे अशा छळाची दखल घेत आहेत हे विशेष. ही बातमी वाचा... http://72.78.249.107/esakal/20100928/4868143190742493441.htm

आयुष्यातील वळणे....

लेखक अथांग यांनी मंगळवार, 28/09/2010 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही नाती ओली-हळवी- काही फक्तं दळणॆ ! कित्ती सारे मोसम आलेले, भोगलेले, क्वचित – उपभोगलेले... काही फुले फुललेली तनात – काही करपून गेलेले ! तरी पण पुढच्या क्षणात, क्षणातील एक-एक कणात... खूप काही जपण्याचे – पण मनातल्या मनात ! आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही कोडी सुटल्यासारखी, अन.. काही कधीच न कळणे... कधीच न कळणे !!!