Skip to main content

झ्ट्पट पि़झ्झा,,,,,

लेखक शार्दुल यांनी शनिवार, 13/03/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर!!!!!!!!!!!!!!!!!!! बर्‍याच दिवसानी नवरोबाला पि़झ्झा बनवायची लहर आली,,,,,,, तेव्हा कालच्या विकांताचा मुहुर्त साधला आणि मस्त पि़झ्झा चापला,,,,,,, त्याची पा.क्रु. फोटोसहित ,,,,,, :> रेसिपी नवरोबाकडून मि.पा. स समर्पित. साहित्यः १. पि़झ्झा बेस (बाजारात तयार मिळतो) २. चिज ३. टोम्याटो केचप ४. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो ५. अमूल बटर ६. चिमूटभर गरम मसाला, मीठ १.

बेघर

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 13/03/2010 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं या पावसातही तुझ्या आठवणींना लपेटून घेतलं मी कवितेत. हळूच दुडले काही दिवस एकमेकांसोबतचे शाकारली स्वप्नांची कौलं नि पडलो जरासा वाचत मजेत नव्या छपराखाली त्याची वाट बघत चवदार शब्दांचे घुटके घेत पण वाचता वाचता डोळा लागताच हा कोसळून गेला धबाधबा माझी फिरकी घेत. जाग येऊन बेघर झालो पुन्हा नि फुटक्या कौलांचा तो ढीग घेतला पुन्हा कवेत. आता आधी कौलं घालू की वाचन संपवू इतकाच प्रश्न आहे. पुन्हा बेघर व्हायची भीती वाटते ना!
काव्यरस

एक टुमदार गाव - माझे माधवनगर

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक टुमदार गाव - माझे माधवनगर भाग १- (सन १९६० ते १९७०च्या आसपासच्या आठवणी) माधवनगर गाव तस फार लहान. पण आखीव आणि टुमदार. सांगली व बुधगाव संस्थानांच्या मधे पुणे-बंगलोर मीटर गेजलाईनवर मिरजेच्या आधीचे स्टेशन. तर दुसऱ्या बाजूला किर्लोस्करवाडी जवळचे. पुण्याहून सांगलीला उतरणाऱ्यांना सोईचे म्हणून रेल्वेस्टेशनवर गर्दी. तरतरीत घोड्याचे व गोंडेदार टांगे, एसटी बस वाहतुकीची साधने तर बाकीचे सायकल स्वार. बुधगावच्या वाटेवर स्व. गंगाधर नातू शेठजींची माधवनगर कॉटन मिल तर सांगलीच्या रस्यावर स्व.

बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो,

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या नाडीग्रंथांवरील अदभूत कथनाच्या धाग्यावरील माझा प्रतिसाद इतका खोल गेला की त्या मुळे दुर्लक्ष होऊन मी प्रतिसादाला उत्तर दिले नाही असा संशय येऊ नये. म्हणून येथे नवा धागा टाकत आहे. राग नसावा.
ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत.

घर

लेखक sur_nair यांनी शनिवार, 13/03/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
घर घर, एक वास्तू विटा मातीची घर, एक कल्पना प्रत्येकाच्या मनाची घर थारा निवारा कष्टाचे अन घामाचे घर इच्छा आशा सुखद आठवणींचे घर महाल वाडा झोपडे वारूळ गुहा खोपटे कधी कपार उंच कड्याची कधी भुयार पोखरलेले घर बालपणीचे भातुकलीतल्या खेळातले गोष्टीतल्या चिऊ काऊचे एक मेणाचे एक शेणाचे घर तारुण्याचे जिद्ध अपेक्षा आकांक्षेचे भविष्याच्या ओढीचे गोड गुलाबी स्वप्नांचे घर वार्धक्याचे आश्रयाचे आधाराचे स्मरीत, काही विस्मरीत, अशा आठवणींच्या गोतावळयाचे घर प्रेमाचे, विश्वासाचे नाती - गोती, जुळलेल्या मनांचे घर संशयाचे, विरल्या स्वप्नांचे दुभंगल

दत्तकविधान-१०

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 13/03/2010 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वी त्याला कशी स्वीकारणार, हा आमच्यापुढे मोठा प्रश्‍न होता. तिची घरातली एकट्याची सद्दी संपेल, तिच्या कौतुकात, लाडांत वाटेकरी आल्यानं ती बिथरेल, टोकाची प्रतिक्रिया देईल अशी आम्हाला शंका होती. तिनं हा प्रश्‍न तिच्या निरागसपणानं आणि मनस्वितेनं चुटकीसरशी सोडवून टाकला आणि आम्हाला तोंडघशी पाडलं. आपल्याला भाऊ मिळाल्याचा केवढा आनंद झाला होता तिला! "त्याला आणायला आपण हॉस्पिटलमध्ये कसं गेलो नाही, आईला तिथे का ठेवावं लागलं नाही,' वगैरे कुठलेही प्रश्‍न तिला पडले नाहीत. किंबहुना, पडले असले, तरी तिला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. तिला खेळायला एक हक्काचं बाळ मिळालं होतं, बस्स!

दत्तकविधान-९

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या तपश्‍चर्यापूर्तीचा दिवस! सकाळी दहा वाजता निमिषला घरी आणण्यासाठी जायचं होतं. मनस्वी आज तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहणार होती. तिच्या प्रतिक्रियेविषयी प्रचंड उत्सुकता होती. एवढे दिवस तिच्यासाठी ती केवळ दंतकथा होती. शाळेत, शेजारीपाजारी चर्चा करून झाली होती. आता प्रत्यक्ष घरी आल्यानंतर ती त्याला कसं स्वीकारते, हे पाहण्याची आम्हाला उत्कंठा होती. आधी संस्थेच्या कार्यालयात गेलो. निमिषला पाहून मनस्वीची प्रतिक्रिया अतिशय नॉर्मल होती. अगदी कुठल्याही बाळाला पाहावं, अशीच. मी आलो, तोपर्यंत आमच्या स्वागताची आणि सत्काराची तयारी झाली होती. संस्थेत पाट, रांगोळी काढण्यात आली होती.

दत्तकविधान-८

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा आपल्या फॅमिली डॉक्‍टरांकडे जाण्याची औपचारिकताच बाकी आहे, असा आमचा समज होता. ...पण प्रत्यक्षात तो खोटा आहे, हे कळायला पुढचे चार दिवस जावे लागले. बाळाला डॉक्‍टरांकडे घेऊन जाण्यासाठी मी संस्थेत गेलो, तेव्हा तर मोठी धमालच झाली! बाळाला न्यायचं, त्याला पहिल्यांदाच छातीशी धरायचं, उन्हातान्हाचा त्रास नको, म्हणून मारे कार घेऊन गेलो होतो. सोबत सासूबाई होत्या. त्याला पाहून त्या त्यांच्या कामासाठी दापोडीला जाणार होत्या. गाडी पार्क करून उतरताना नेमका एका कुठल्याशा पीआरचा फोन आला. त्याला त्याचं कसलंतरी "दुकान' छापून आणायचं होतं. फोनवर बोलता बोलता मी गाडीतून उतरलो आणि अगदी आठवणीनं दार लॉक करून टाकलं.

अढळपद

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 12/03/2010 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
************* अढळपद ************ 'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?' हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं. पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?' 'गोष्टी वाचत बसले होते. रात्री सायली जेवणापूर्वी गोष्टीचा हट्ट धरणारच.