Skip to main content

हिमेजी

लेखक नंदू यांनी रविवार, 14/02/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त जपानला (ओसाका) जाण्याचा योग आला. ओसाका विमानतळावरून काकोगावा शहरात पोहोचून हॉटेल मध्ये चेक-इन करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. हाच एक अर्धा दिवस साईट-सीइंगला मिळणार होता त्यामुळे वेळ न दवडता सरळ हिमेजीकडे प्रस्थान ठेवले. हिमेजी स्टेशन ओसाका पासून साधारण एक तासाच्या अंतरावर आहे आणि तिथून कासल चालत केवळ 20 मिनिटं. सुदैवाने आम्ही ज्यादिवशी तिथे गेलो तो दिवस जपानचा राष्ट्रीय खेळ दिवस (ऑक्टोबरचा दुसरा सोमवार) असूनही कासल पब्लिक व्हुइन्गसाठी ओपन होता. सोळाव्या शतकात शोगुन हिदेयोशीने बांधलेली ही इमारत आज वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केली आहे.

गुलाबाचा सण होता

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 14/02/2010 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
काव्यरस

प्रेमदिन

लेखक जयवी यांनी रविवार, 14/02/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमदिन आला म्हणून करतात प्रेम प्रेमदिन सरला की पळतं प्रेम प्रेमदिन सरला की ओसरतं प्रेम प्रेमदिन सरला की विसरतं प्रेम कशाला हवी ही प्रेमाची कसरत प्रेमदिन संपला की बसायचं हात हलवत प्रेम करा, प्रेम करा.... म्हणून होतं का प्रेम प्रेमदिन आला म्हणून करता येतं का प्रेम सगळा नुसता दिखावा.... सगळं प्रेम उथळ एक दिवसाची टिमकी, बाकी थापा निव्वळ जयश्री

व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेम दिवस

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 14/02/2010 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध..... उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो. निसर्गापरी आयुष्यहि किती सुंदर आहे..... अर्थ ह्याचा ह्या गुलाबांकडे पाहिल्यावर कळतो.

आजची परिस्थिती (माय नेम ईज खान)

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 14/02/2010 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा माय नेम ईज खान बघा. नाही तर.... विरोधी पक्ष : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा माय नेम ईज खान बघाल तर याद राखा. मिडीया : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा फक्त माय नेम ईज खान विषयीच चर्चा करा. सामान्य जनता कुठे दिसते आहे का हो या सगळ्यामधे ?????????????? आहो जनता आहे कुठे ??? ती कालच्या स्फोटात.................................................

शेवटी आम्ही चंडोलच ..

लेखक चंडोल यांनी रविवार, 14/02/2010 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावरील वेगवेगळ्या संस्थळांवर हिंडताना आम्ही अनेक बरे वाईट लेख वाचले आणि विचार केला आपणही काही मोजक्या स्थळांचे सभासदत्व घेऊन थोडे लिहून पाहावे. पण हे सभासदत्व घेताना सर्वात महत्वाचा प्रश्न होता माझ्या खात्याला द्यायच्या नावाचा, पुन्हा एकदा आमची जालवारी सुरु झाली, काहींनी आपल्या नावाला अनुसरून नाव दिली होती काहींनी स्वभावाला, पण स्वतःला नावं ठेवायचे जास्त प्रसंग मी माझ्यावर येऊ दिले नसल्यामुळे मला काही नाव सुचेना.

स्वर-गंध - कॅनडा

लेखक सुमीत भातखंडे यांनी रविवार, 14/02/2010 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, आज यूट्यूबवर फिरता-फिरता काही व्हिडिओज सापडले. २००८ मधे टोरँटो येथे झालेल्या स्वर-गंध या कार्यक्रमाचे हे काही विडिओज आहेत. १) समिधा जोगळेकर - युवती मना http://www.youtube.com/watch?v=h4G12bXuS8o&feature=PlayList&p=838ED0E1D… २) रवि दातार - श्रीरंगा कमलाकांता http://www.youtube.com/watch?v=0CLjVMU_m4k&feature=related अजूनही काही लिंक्स आहेत.