गोभी मंचुरीयन - गोभी ६५
काल अंगारिका संकष्टी चतुर्थी होती.
ऑफिस मध्ये गेले २-४ दिवस बरच काम होत. त्यामुळे लंच टाइम मध्ये घरी येउन साबुडाण्याची खिचडी वगैरे करायला फुरसत नव्हती.
त्यामुळे काल निर्जळी उपवासाच पुण्य आयतच पदरात पडल.
संध्याकाळी घरात पाऊल ठेवल्यावर पोटातल्या कावळ्यांनी आवाज दिला. देवाला नैवेद्य तर ठेवायचा पण नेहमी सारख साग्रसंगीत ताट करण्याच त्राण नव्हत. त्यामुळे पटकन होणार चायनीज करायच ठरवल. म्हटल तेवढच देवालापण जरा चेंज ;)
फ्रिज मधल्या कच्च्या मालाचा अंदाज घेतला. जास्त भाज्या नव्हत्या पण फ्लॉवर, भोपळी मिरची, पाती कांदा दिसला.
मिसळपाव
शंख