माज्या इमान प्रवासाची बातमी
मंडळी नमस्कार.
व्हय ही बात्मीच हाय
नव्या वर्सात काय करायचं त्ये म्या ठरीवलच नव्हतं.
डायरी बियरी ल्हिनं काय आपल्या जमत न्हायी.
आन रोज काय ल्हायचं त्या डायरीत. सकाळी पोट साफझालं आज तीन विड्या ओडल्या. आज नानाची उधारी दिलप्या पडून पैशे उसने घीऊन भागवली
आसं कायतरी पुळकाट ल्हिऊ?
का...आज कारभारीन एकदम मस्त हासत हुती. तिने तिच्या भैनीचा इसारलेला झंपार न्येस्ला हुता. आस्लं ल्ह्यायचं
आपल्याला न्हाय जमत आस्लं.
रस्त्याने चालत रहाव चिच्चच्या झाडाला एकदम गाभुळलेल्या लै चिच्चा लागलेल्या दिसाव्यात. खीशात मिठाची पुडी अचानाक हाताला लागावी तसे काहीसे झालं.
मिसळपाव