Skip to main content

तो, हा आणि मी

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 02/12/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मला त्याचे दर्शन दुर्मिळच झाले आहे...... गेल्या काही दिवसात तर तो दिसलाच नाही... कुठे गेला असेल तो??? आज काल का मला भेटत नाही??? आधी नेहमी माझ्या बाजूला उभा असायचा.... कधीही साथ न सोडणारा तो असा अचानक कुठे गेलाय???? दंगा घालतानाही त्याची साथ असायची, ऑफिसात काम करताना पण त्याची साथ असायची.... सर्व मित्रांसोबत असतानाही त्याचीच साथ असायची.... तो असताना कधीच कुठले काम करणे जिवावर आले नाही. सुखातही तो माझ्या सोबतीला व दुखा:तही तो माझा साथी!!!! काय झाले असेल त्याची माझी साथ सुटण्यासारखे...???? कदाचित हा दुसरा जो सध्या माझ्या साथीला असतो त्यामुळे असेल का?? कोण 'हा'???

चायनिज रोल

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी बुधवार, 02/12/2009 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : कोबी ( लांबडा कापून ), फरसबी ( डायमंड शेप ), गाजर ( लांबडं किसून ), कांदा( लांबडा कापून ), पातिचा कांदा ( फक्त मागची पात घेणे ), सिमला मिरची ( लांबडी पातळ कापून ), सोया सास , चिली सास , पांढरी मिरी पावडर मीठ, तेल, नूडल्स . कृती : सर्व भाज्या स्वच्छ धुवून तेलावर शिजेपर्यंत परतून घेणे. नंतर त्यात शिजवलेल्या नूडल्स घालून थोडा वेळ परतावे. मग त्यात चवीनुसार मीठ , मिरी पावडर , सोया व चिली सास घालून १० मि.

मत्सर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 02/12/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्याने ओंजळ भरली चंद्र नयनी सामावला मत्सराने धुमसणारा, तो... सुर्य सखे मी पाहीला पसरले पंख मयुराने उन्मुक्त सुखे तो नाचला थांबला नभी खगराज पाहता नर्तन कोमेजला विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी भागवतींचा हर्ष गर्जला कमरेवरती हात ठेवूनी विठू सावळा हिरमुसला तुझे आहे ते तुझ्याचपाशी हेवा मना हवा कशाला? तुझ्यासारखा तुच राजा मत्सर का मनी आला ? विशाल. ०२/१२/२००९

सुट्टी

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 02/12/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसाची सुरवात तर मस्त झाली होती. खुप दिवसानी पुर्ण दिवस सुट्टीचा योग जुळुन आला होता. आंघोळ करुन परत ताणुन देण्याचा विचार होता. खमंग थालीपीठाचा वास खुणावत होता. "पाणी काढलय, ब्रेकफास्ट करुन घे" आतुन साद आली. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' हे आवडते गाणे गुणगुणत तो स्नान गृहाकडे निघाला. देवपुजेला तुळस आणि फुले काढताना अंथरुणावर ठेवलेला लेंगा झब्बा त्याला दिसला. कुणीतरी पाहूणे येतात की काय? कालच ठरल होते. विझीट टु पास्ट विदाउट एनी कॉम्प्रमाईज. " अरे अल्पी येतेय" ??? "माझी शाळेतली मैत्रीण. लग्नाला आली होती. तु तीला 'सुबक उंच' म्हणाला होतास आठवते.

बुधवारची कविता: (टारोबा तुज शहीद केले)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 02/12/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेची प्रेरणा मिसळपावावरच्या तर्रीत तिखट कांदा खाडकन उडवतो रेवडी करतो वांदा त्या झालेल्या वांद्याची चुगली झाली न् टारोबा , तुज शहिद केले हलक्या हलक्याश्या खसखशी पिकवणारे, सहीतच हाणोनी विडंबन करणारे ते प्रतिसाद लोपूनी दुर्मिळ झाले टारोबा , तुज शहिद केले बाईवत वरवर भासवणारी आयडी, गजबजलेल्या खवत खरड पाडी, तू हिणकसलेल्या संतापाने त्यांस ठोकले टारोबा , तुज शहिद केले तू हवाहवासा, शान टार्‍यासमर्थकांची तू नडशी के व ळ मस्त कॅलेंडर्वडीशी तुजला जे नडले सगळे चुलीत गेले टारोबा , तुज शहिद केले तू एक दिनी आलास टेंपरवारी तू पुरावेच ठेवलेस माल
काव्यरस

कविते, तुज शोधित आले

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 01/12/2009 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले कविते, तुज शोधित आले इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे, झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले कविते, तुज शोधित आले मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची, कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची, मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले कविते, तुज शोधित आले तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची, तू तन्मय मीरा दासी हरिचरणाची, तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले, कविते, तुज शोधित आले तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी तू सांजवात तेवतेस संध्याकाळी त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले कविते, तुज शोधित आले
काव्यरस

पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 01/12/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याचा वाहतूक व्यवस्थेविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. या संदर्भात शासनावर अबलंबून राहून काहीतरी बरे होईल या आशेतला फोलपणा आता ध्यानात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन सुरु केलेली एक योजना / चळवळ नुकतीच वाचनात आली. पुण्यात राहाणार्‍या आणि पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेबाबत काही चाड असणार्‍या जबाबदार नागरिकांनी यात भाग घ्यावा म्हणून हे लिखाण. www.savepunetraffic.com या संकेतस्थळावर जाऊन या मोहिमेचा भाग व्हा. मी नुकतेच या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे. सन्जोप राव

पुणेरी मिसळ

लेखक जानकी यांनी मंगळवार, 01/12/2009 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी वाटाणे तासभर भिजत घालून कुकरमध्ये ३ शिटया देणे १ वाटी मोड आलेली मटकी घेऊन कुकरमध्ये ३ शिटया देणे २ कांदे बारीक चिरून घेणे १ टोमॅटो बारीक चिरून घेणे छोटी अर्धी वाटी दाणे भाजून ठेवणे १ वाटी कोथिंबीर बारीक चिरून ठेवणे मध्यम आकाराचे २ बटाटे उकडून, सोलून, मध्यम आकाराच्या फोडी करणे १ वाटी नायलॉन चे पोहे १ वाटी तिखट जाड शेव १ वाटी फरसाण १ डावभर तुरीची शिजवलेली डाळ कृती: पोह्यांचा चिवडा: कढईत १ छोटा टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहोरीच्या फोडणीत २ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, १ टीस्पून डाळं, चिमुटभर हिंग, २ ट

भरली वांगी

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 01/12/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ६ छोटी वांगी , १ वाटी भाजलेले शेंगदाणे, ६ लसुण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कांदा लसुण चटणी २ चमचे, मीठ चवीप्रमाणे, फ़ोडणीसाठी तेल आणि फ़ोडणीचे साहित्य... कृती : प्रथम वांग्याची देठे थोडी काढुन टाकावीत.. म्हणजे साधारण वांग्याला वर अर्धा इंच देठ ठेवले तरी चालतील. वांग्याला खालील बाजुने (+) अशा आकारात चिरा द्याव्यात आणि वांगी पाण्यात बुडवुन ठेवावीत. मिक्सर मधे शेंगदाणे,लसुण, थोडी कोथिंबीर,चटणी, मीठ घालुन जरा जाडसर काढावे. आता पाण्यातुन वांगी बाहेर काढुन घ्यावीत. मिक्सर मधुन काढलेला मसाला वांग्यामधे भरावा.