काळ.........
विचारामागे
येती विचारं
मन बिचारं
थांबेचिना
धाऊन दमले
दमून थांबले
असे काहीसे
होईचना
विचारं हेच
अस्तित्व माझे
परत्तत्व मला
ठाउक नाही
मनाबिनाच्या
पलीकडले ते
असे काहीसे
असते काही...?
असते नसते
ठाउक नाही
उगा कशाला
मोहक भास
उगा कशाला
मनात अपुल्या
"आहे- नाही" चा
द्वंद्व समास
कळी काळाची
उलटी गिनती
अंक अखेरचा
ठाउक नाही
श्वासही आहे
चालू परंतू
थांबेल कधी
विश्वास नाही
क्षणं आताचा
निव्वळ संधी
अहा , मिळाली
व्हा आनंदी
स्वप्न उद्याचे
बघण्या मध्ये
क्षण आताचा
उगा दवडती
समोर ठेवले
ताट वाढूनी
नको उद्याची
चिंता चित्ती
दिन संपला
रात्
काव्यरस
मिसळपाव
