चिकन फहिटा
इथे आल्यावर पहिल्यांदी चाखलेला मेक्सिकन पदार्थ म्हणजे चिकन फहिटा. स्पॅनिशमधे 'J' चा उच्चार 'ह' होतो हे महित नसल्याने ' हे फजिटा काय आहे' अस विचारुन स्वतःची फजिती करुन घेतलेली आजही आठवते. मात्र माझ्या फजितीला कारण झालेला हा फहिटा त्याच्या चटकदार चवीमुळे माझा लाडका आहे. खरा फहिटा हा बीफचा स्कर्ट स्टेक हा भाग येतो त्या पासून करतात. पण माझ्या सारख्या बीफ न खाणार्यांसाठी चिकन फहिटा हा प्रकार आहे.
या चिकन फहिटा साठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे चिकन मुरवायला लागणारे मॅरिनेड.
मिसळपाव
