Skip to main content

! पांडुरंग !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 29/06/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली बघा पंढरीची वारी भेट उराउरी पांडुरंग ! आनंद सोहळा क्षण हा विरळा सौभाग्याचा मेळा पांडुरंग ! सगुण निर्गुण दोहोंचे मिलन मन वा "नमन" पांडुरंग काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! जाहलो निशब्द थांबले भजन नाद सनातन पांडुरंग ! चाललो चाललो आता नाही येणे श्वासांचे थांबणे पांडुरंग !

बकलावा

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 29/06/2009 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
बकलावा हे एक अफगाणी गोड पदार्थ आहे. मी एका अफगाणी हॉटेलात खाल्ला होता, तसा फार गोड असतो पण मला आवडला होता. साहीत्यः १ पाकिट फायलो डो (phylo Dough) , या अगदी पातळ मैद्याच्या पोळी सारखं असतं, घरी बनवायला खुप कठीण आहे त्यामुळे विकत च आणावे. फायलो डो चे पाकीट एक दिवस आधी फ्रीजर मधुन फ्रीज मध्य ठेवावे म्हणजे तुटणार नाही. १ कप कापलेले किंवा जाडसर कुटलेले आक्रोड + बदाम + पिस्ता चे मिश्रण २ टे. स्पू. + ३/४ कप साखर ३/४ कप पाणी १ तुकडा दालचिनी १/२ टी. स्पू.

भांडा सौख्यभरे!!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 29/06/2009 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट जरा नाजुक आहे. अडचणीची आहे. खासगीतली आहे. पण सांगणं मनोरंजक आहे. शेअरिंगनं दुःख हलकंच होणार आहे. मनावरचा ताण कमी होणार आहे. खटके कमी होण्याची संधी मिळणार आहे. घरात भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग काही नवे नाहीत. नव्याची नवलाई संपल्यानंतर, कधी संपायच्या आधीच, तर कधी सुरूही व्हायच्या आधी घरात या वाक्‌युद्धाला सुरवात होते. चूक कोण, बरोबर कोण, याला अर्थ नसतो. भांडण्याची खुमखुमी जिरवणं महत्त्वाचं असतं. आपल्या भांडण्याच्या मुद्द्याला काही विशेष अर्थ नाही हे कळत असतं, पण आयत्या वेळी माघार घेणं परवडणारं नसतं. मग कधीतरी टिपलेली निरीक्षणांची हुकमी अस्त्रं बाहेर काढली जातात.

पनीर चिली

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 28/06/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- ३,४ हिरव्या भोपळी मिरच्या, १ लहान लाल व १ लहान पिवळी भोपळी मिरची,१मध्यम कांदा, ५/६ हिरव्या मिरच्या, बोटभर आलं, ६/७ लसूण पाकळ्या, १चमचा आलं लसूण पेस्ट,१.५ ते २ टेबलस्पून सोया सॉस, १चहाचा चमचा मिरपूड,१.५ चहाचा चमचा कॉर्न फ्लोअर, १ चहाचा चमचा मैदा, मीठ,अजोनोमोटो,तेल, २५० ते ३०० ग्राम पनीर.

पहिल्या पावसाच्या नावानं.....

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 28/06/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
बाहेर भकास शांतता पसरली होती.. दूरवर एखादी घार घिरट्या घालत होती.. बाकी ऑफिसच्या बाजूचा सगळा परिसर रिकामा होता.. अगदी दुपारी बागडणारे सगळे कळबडवे ऑफिस नावाच्या खुराड्यात लपले होते. सभोवतीच काय, तर कँटिनबाहेर नेमाने टोळक्याने हिंडणार्‍या काही मैनादेखील गायब होत्या... याचं कारण सूर्यराज आज कडक ड्यूटीवर होते.. अश्या बोरिंग आणि गरम दुपारी माझा फोन किरकिरला.. "काय रे! जवळ बॉस आहे... टवाळक्या नकोत... बोल पटापट.." .. हो.. मी ओळखीच्या नंबरला अशीच सुरवात करतो ;) "मिटीरिओलॉजिकल डिपार्टमेंटची साईट पाहिलीस का?" "म्हंजे?" "म्हंजे वेधशाळेची" "अरे यार, काय मला दुसरे उद्योग नाहीत का?" "अरे बघ!

गुंतवणूक करावी कुठे ?

लेखक रामदास यांनी रविवार, 28/06/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढीच्या वारकर्‍यांचं वारं आता मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्स लागलं आहे असं मला काही दिवस वाटत आहे. ग्यानबा म्ह्टल्यावर दोन पावलं पुढे आणि तुकाराम म्हटल्यावर एक पाऊल मागे. सेन्सेक्स पंधरा हजाराच्या जवळ जाउन मागे येतो आणि पुढे जातो आहे. बाजारातले अस्सल मंदीवाले रामदेव अगरवाल आणि शंकर शर्मा यांच्या सारखी मंडळी ही नव्या तेजीची सुरुवात आहे असं म्हणायला लागले आहेत.(हा सापळा तर नाही ना ?) चार्टीस्ट मंडळी पण येत्या तीन वर्षात तीस हजाराचा इंडेक्स नक्की असं छातीठोक सांगायला लागले आहेत. अशा वेळी सामान्य गुंतवणूकदारानी काय करावे?

एक हलके फुलके गाणे.

लेखक रामदास यांनी रविवार, 28/06/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही महीन्यांपूर्वी रोहीत राऊत या बालकलाकाराचे गाणे ऐकले होते तेव्हा असे वाटले की या (रोहीतच्या)पिढीसाठी गेय कविता लिहायची तर कशी लिहावी लागेल ? मग लक्षात आलं की यांच्या साठी गेय असं काही लिहायचं झालं तर यांचा रीदम अनुभवून मग लिहावं लागेल.संगीताची समज कमी आहे तरी एक प्रयत्न करून पाहीला .तुमच्या पुढे ठेवतो आहे. कल्पना अशी आहे की नोकरी नसलेला एखादा तरुण मुलगा आसपासच्या मुलीकडे रोज बघतो . त्याला ती ज्याम आवडतेय, पण नोकरीचा पत्ता नाही विचारायचं कसं ? कोरस : टफ लूकींग गाय पण डेरींगच नाय गूड लूकींग गाय पण नोकरीच नाय. चेहेरा गोरामोरा का झाला सांग ना. गजरा चुरगळला का गळल्या पाकळ्या क

अजूनही

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 28/06/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
ठाव ना तुझा तुला अजूनही काय शोधसी मला अजूनही? जागल्या कळ्या; सुकून चालल्या, गंध मात्र राहिला अजूनही ओळखू कसा तुझा स्वभाव रे? जाणले न मी मला अजूनही लांब जात सावल्याहि पांगल्या तू दिवा न लावला अजूनही सावळा न राधिका, न गोपिका एकटा रिता झुला अजूनही मीच जिंकले तरी हरायचा डाव का न संपला अजूनही? तोच नांदतो म्हणे चराचरी का मला न भेटला अजूनही?
Taxonomy upgrade extras

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १५

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 28/06/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.