Skip to main content

मृगजळ-२

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/06/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
मृगजळ - १ "न्हाय पोरी.. जे सांगते ते नीट ऐक्.. ह्यो आबा.. त्यो तुझा बा न्हाई... मी त्याची घरवाली बी न्हाई.. रखेली हाय. " असं सांगून माय पुन्हा बांध फुटल्यासारखी रडायला लागली.. राणीवर वीज कोसळली होती... "माऽऽऽऽऽय... .. अगं काय सांगतियास ह्ये?? कोन हाय माझा बा? माऽऽय्..कोन हाय गं माझा बा?" राणीने अकांत मांडला.. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "माऽऽय बोल गं... ए माऽऽय!!" राणीचं सर्वांग कापत होतं.

माझा जलप्रवास!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 26/06/2009 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
"नाना, उद्यापासून ह्यालाही घेऊन जाल का पोहायला?" मला नानांच्यापुढे उभे करत आईने विचारले. "हो गं त्यात काय, दे उद्या सकाळी ७ वाजता पाठवून. काढतो ह्यालाही सगळ्या पोरांबरोबर पोहायला!" नाना माझ्याकडे पाहत तोंडभर हसत म्हणाले. नाना आणि इन्ना कुलकर्णी म्हणजे मिरजेच्या माझ्या आजोळच्या वाड्यातलं एक जगमित्र कुटुंब होतं. माझ्या आई, मामा, मावशींच्या पिढीला तर नानांनी पोहायला शिकवलं होतंच आणि आता ते त्यापुढच्या पिढीला म्हणजे आम्हा मावस, आत्ते-मामे भावंडांनाही पोहायला शिकवत होते. मी ८-१० वर्षांचाच असेन त्यावेळी.

टनेल व्हिजन V/S पेरिफेरल व्हिजन किंवा टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 26/06/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/8342#comment-128443 विप्र सरांनी ''टनेलवर चर्चा करायला आवडेल' असे सांगीतल्याने या धाग्याचा उदय झाला आहे. आता काहीजण म्हणतील की फुटकळ चर्चा आहे, हात धुवुन घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे वगैरे वगैरे. किंवा माननीय संपादकांपैकी काही जण या धाग्याला आक्षेप घेवून हा धागाच गायब करु शकतात. (माझी त्यांना तसे न करण्याची विनंती आहे. (परत्येकाचा ईगो सांबाळाया लागतू.

अपचन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 26/06/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे चौपाटीवरची मजा पाहुन मी परत चाललो होतो. एका कोप-यात एक माणुस तळमळत बसलेला दिसला. सारखा पोटाला हात लावुन तोंडाने खुर्क खुर्क आवाज काढत होता. जवळ जावुन पाहिले तर आपला नाना! 'नाना? काय रे काय झाले ?' 'काही नाही यार ! त्या समोरच्या भेळवाल्याकडची भेळ खावुन पोटात दुखत आहे... सारखे करपट ढेकर येत आहेत.... साला काय बकवास भेळ बनवतो.. अग आईग...खुर्क' 'छ्या ! नाना ! काहीतरीच काय बोलतोस? बघ किती गर्दी आहे त्याच्या दुकानात... कुणाचेही काही पोट दुखत नाही अन तुझेच कसे काय दुखते?' 'अरे खोटारडे आहेत ते...

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १४

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 26/06/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

लगाम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2009 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आणि माझा संवाद तसा जुनाच आहे संवाद तरी कसे म्हणायचे बर्‍याचदा फक्त तोच बोलतो मी नेहेमीच फक्त श्रोता असतो नाही म्हणायला शंका असतात माझ्या परवाच विचारले त्याला हा कॅनव्हास बघितलास? पांढराशुभ्र ..... रंगवायचाय मला ! हंसला ..... हळुवारपणे म्हणाला वेड्या ....! अरे आत्माच तो जणु ...! निर्लेप असतो .... निर्विकार ना रंग, ना रुप, ना कसल्या अभिलाषा त्या फलकाची चौकट आहे ना... तो देह रे ! कुठलेतरी बंधन हवेच ना? हा ...

अण्णांचा आशीर्वाद

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 26/06/2009 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्डीहून संगमनेरकडे परतताना निमगाव जाळीजवळ आमच्या लाल-पिवळ्या मारुती ओम्नीनं झटका घेतला आणि मी एकदम जागा झालो. गाडी पट्टी सोडून रस्त्याच्या कडेला आली होती. ड्रायव्हर भेदरलेला दिसत होता. थोडेसे सैलावलेले दहा-बारा प्रवासीही झटक्‍यात जागे झाले होते. एक अवजड ट्रक आम्हाला हूल देऊन भन्नाट वेगानं पुढे गेला होता...

मायकेल जॅक्सन गेला

लेखक पक्या यांनी शुक्रवार, 26/06/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच (गुरुवार दुपार ) समजले की पॉप संगीताचा बादशाह समजला जाणारा मायकेल जॅक्सन गेला. राहत्या घरीच श्वास बंद पडून त्याचे निधन झाले. http://news.yahoo.com/s/ap/us_obit_michael_jackson